जिलचे देवदूत
एखादा वीकांत निवांत मिळावा, कामाच्या आठवड्याच्या व्यस्त दिनक्रमांपेक्षा सर्वार्थानेच निराळा यांसारखे सुख नाही. दोन-तीन महिन्यांतून एकदा असा योग जुळून येतोही. त्यावेळी मला मनसोक्त बागकाम करणे, विशलिस्टमधील बरेच दिवस खुणावणारे पुस्तक बे विंडोच्या आरामशीर बैठकीत बसून वाचणे, जवळपासच्या ठिकाणांना भेटी देणे, नाहीतर बरेच दिवस न केलेली ट्रेल करणे या आणि अशा बऱ्याच गोष्टी करायला आवडतात. मागच्या महिन्यांत अगदी ध्यानींमनीं नसतांना, " अरे! हा तर लंब वीकांत आहे." असा साक्षात्कार झाला. खरे तर आपण सर्वचजण सुट्ट्यांची नेहेमीच आतुरतेने वाट पाहत असतो, त्यानुसार नियोजनही करत असतो.
मिसळपाव
भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरू झाल्यावर डॉ. राजेंद्र प्रसाद सार्वभौम भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्यावेळी राष्ट्रपतींसाठी रेल्वेचा खास डबा असावा असा विचार पुढे आला नव्हता.