अंतरीची हूरहूर ....
अंतरीही हूरहूर वाटे
तू माझी होशिल का ?
जीवनाच्या गीताला या
सूर तू देशील का ?
वाळवंटासम आयुष्याचा
नूर तू होशिल का ?
बावरलेल्या या मनाला
धीर तू देशिल का ?
अंतरीही हूरहूर वाटे
सखे तू माझी होशिल का ?
जीवनाच्या हर क्षणास
अर्थ तू देशील का ?
अमावस्येच्या आंधारातील
चांदणे तू होशिल का ?
अंतरीही हूरहूर वाटे
प्रिये तू माझी.......... होशिल का ?
तातडीने मदत हवी आहे
मला टाटाडोकोमोच्या सेवेतील त्रुटीची तक्रार करायची आहे.
माझा प्रीपेड मोबाइल क्रमांक मी १४ मे २०१२ ला आयडिया मधून टाटाडोकोमो मध्ये MNP द्वारे वाहून नेला. त्यासंबंधीच्या सर्व कागदपत्रांची वेळोवेळी पूर्तता करूनही मी उत्तर भारतात गेलेलो असताना माझी सेवा २२ जून २०१२ ला अपूर्ण कागदपत्रांचे कारण देऊन बंद करण्यात आली. यासंदर्भात मी listen@tatadocomo.com आणि appellate.ap@tatadocomo.com यांना याआधी मेल लिहिले पण काही उपयोग झाला नाही.
अंडाकरी - काय सुधारणा करता येईल
खरं तर हा प्रश्न व्यनि मधून काही सुग्रणींना व बल्लवाचार्यांना विचारता आला असता पण जास्तीत जास्त ,मोलाचा सल्ला मिळावा या आशेने, धागा काढण्यात आला आहे.
कालांतराने धागा उडविल्यास हरकत नाही.
४ जुलाई - अमेरीकेचा वाढदिवस. सध्या अमेरीकन मंडळींच्या बारबेक्यू, पार्ट्यांना ऊत आलेला आहे. आमचे ऑफीस यात मागे नाही. आमच्याकडे ३ जुलईला पॉटलक आहे.
कॅकटसव्ररचे चांदणे
आज गुरुवारच्या मुहुर्तावर ब्रम्हकमळ नावाने ओळखले जाणारे २४ कॅकटस आमच्याइथे फुलले. हे फुलले म्हणजे सण असल्यासारखे आम्ही सगळे बाहेर असतो फुलांना पहात. बाहेर ह्या फुलांच्या सुगंधाने वातावरणही धुंद केलेले असते.
नेमक काय कराल?
अभिनंदन, शुभेच्छाबद्दल सर्व वाचकांचे धन्यवाद.
हा कार्यक्रम ३ वर्षापुर्वी सुरु झाला.
आर्थिक परिस्थितीचा बाउ न करता १० वी तील यश १२वी आणि स्पर्धात्मक परिक्षेत टीकवण्यात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या भरारी साठी शिष्यवृत्ती देणे हा मुळ उद्देश.
हा कार्यक्रम फक्त मुंबई पुरता मर्यादित होता.
परा आणि प्रसन्न केसकर ह्यांनी पुढाकार घेतला.
कार्यक्रम पुण्यात पोचला.
मग प्रश्न आला जर का पुण्यात पोचु शकतो तर सर्व महाराष्ट्रात का नाही.
पण मुंबई मधे बसुन चंद्रपुर मधल्या एखाद्या विद्यार्थ्याच्या आर्थिक परिस्थितीची पडताळणी शक्य नाही.
ह्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवण्यात कार्यकर्त्यांची फळी
प्रणाम अनाम वीरांना...
|| श्री गुरवे नम: ||
शुक्रवारी (२२ जून) मंत्रालयाला भीषण आग लागली. ती विझवायला अनेकांनी जिवाचं रान केलं आणि स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता मंत्रालयाच्या कर्मचार्यांचे आणि अभ्यागतांचे प्राण वाचवले. काही जण यात जखमी झाले. मात्र, नेहमीप्रमाणे हे वीर अनामच राहिले. त्यांच्या शौर्याची कुठेही दखल नाही, कौतुक नाही.
आता तू येशील....
आता तू येशील...हळूच गालात हसशील
उगाच "फुरंगटून" मग शेजारी बसशील
लडिवाळ रागवताना पाठमोरी बसशील
हळूच चाफा माळताना अलगद लाजशील
बराच वेळ शब्दांविना खूप काही बोलशील
जमिनीकडे पाहता पाहता एकटीच हसशील
गार वारा तुझ्या कुंतलाशी झुलेल
उडणार्या बटांमध्ये जीव माझा भूलेल
हातात हात गुंफताना नशीब जुळवू पाहशील
गुंतलेल्या रेषात मग आयुष्य शोधशील
बोलके तुझे डोळे जेव्हा माझ्या डोळा भिडतील
चटकन लहानाची... मोठी मग होशील
वास्तवाची जाण होता हात अलगद सोडवशील
मग चेहरा लपवता लपवता डोळे ओलावशील
बराच वेळ शांत बसून हळूच हसशील
लाजर्या डोळ्यांनी मग निरोप माझा घेशील
पाठमोरी सुद्धा मग किती छान दिसशील
हाय...
काव्यरस
मिसळपाव