साहित्यः
१ वाटी शिळा भात
२-३ टेस्पून बारीक चिरलेला कांदा
२ टेस्पून बारीक चिरलेली कोथींबीर
१ टीस्पून जीरे
१ टीस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची
(आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१ टीस्पून बारीक चिरलेले आले
१ टीस्पून बारीक चिरलेला कढीपत्ता
मीठ चवीनुसार
२-३ टेस्पून बेसन
तेल तळण्यासाठी
पाकृ:
एका बाऊलमध्ये भात, कोथींबीर, कांदा, हिरवी मिरची, कढीपता, जीरे, आले व मीठ एकत्र करा.
हाताने चांगले ५-७ मिनिटे एकत्र कालवा म्हण्जे थोडा चिकटपणा येईल.

त्यात लागेल तसे २-३ चमचे बेसन घाला.कोरडे वाटल्यास थोडे पाणी शिंपडून चांगले मळा.
मिश्रणाचे चपटे पेढे करून घ्या.

मध्यम आचेवर तेलात सोनेरी रंगावर डीप फ्राय करा.

कुरकूरीत असे भाताचे पकोडे टोमॅटो सॉस किंवा कुठल्याही चटणी बरोबर सर्व्ह करा.

प्रतिक्रिया
नविन आणि सोप्पी पाकृ
छान! अता पावसाळ्यात भजी/पकोडे
छान आयडिया..ट्राय करणारच.. पण
सुपर्ब आयडीया
सुपर्ब आयडीया
(No subject)
अफलातून आयडियाची कल्पना!
हे आठवलं. यातलाच प्रकार आहे
फार मस्त लागतात हे.
आजच केले जातील
ओ सानिका तै, मागच्या वेळच्या
यावेळचे सादरीकरण मजेदार. पाकृ
बाकी नेहमीप्रमाणेच.
शॅलो फ्राय केलेत तरी चालते.
भाताची भजी खाऊन बघायला हवीत..
मस्त, शिर्षक मात्र खटकले
मस्त आहे आयडीयाची कल्पना