टू बी ऑर नॉट टू बी (अर्थात या बी चे करायचे काय?)
"टू बी ऑर नॉट टू बी?" असा गहन प्रश्न रॉबर्ट वेलिंग्टनकर या माणसाला पडला होता म्हणे. अहो, "नावात काय आहे?" हेसुध्दा तोच म्हणाला होता ना!
पण हाच प्रश्न मला पोह्यांमध्ये लिंबू पिळतांना नेहेमी पडतो. पण मला पडलेल्या प्रश्नातील बी म्हणजे लिंबाची बी बरं का!
असो, तर मूळ मुद्दा असा आहे की पोह्यात लिंबू पिळण्याआधी बिया (कारल्याच्या सॉफ्ट बहिणी) निघून जाव्या म्हणून अर्धा कापलेला लिंबू जर आपण प्लेटबाहेर हलकाच दाबला तर हटकून त्यातील रस निघून वाया जातो पण बिया मात्र हट्टाने लिंबामध्येच राहतात.
मिसळपाव