श्रावणही आला फिरूनी
लेखनविषय:
श्रावणही आला फिरूनी
सख्या तू ही ये फिरूनी
शालू हिरवा नेसूनी
ओली मेंदी रेखूनी
उभी ही सृष्टी अंगणी
श्रावणही आला फिरूनी
सख्या तू ही ये फिरूनी|
पायवाट मृदगंधी भिजूनी
इंद्रधनू कमान बांधूनी
डोळी श्रावण सरी भरूनी
श्रावणही आला फिरूनी
सख्या तू ही ये फिरूनी|
सरली शेतातली पेरणी
फुलले ताटवे जल धारांनी
पानांवर स्पर्शबिंदू गोठूनी
श्रावणही आला फिरूनी
सख्या तू ही ये फिरूनी|
उमलेल्या बकुल फुलांनी
कुठवर पहावे रुप दर्पणी
गंधगीत गाऊ विरघळूनी
श्रावणही आला फिरूनी
सख्या तू ही ये फिरूनी|
वाचने
3242
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
सख्या तू ही ये फिरूनी
In reply to सख्या तू ही ये फिरूनी by ज्ञानोबाचे पैजार
किंवा
In reply to किंवा by प्रसाद गोडबोले
षटकार...
In reply to किंवा by प्रसाद गोडबोले
थोडी अजून सुधारणा
In reply to सख्या तू ही ये फिरूनी by ज्ञानोबाचे पैजार
जे न देखे कवी, ते देखे विडंबन कवी
छान कविता...
In reply to छान कविता... by सतिश गावडे
फोटो गायब आहे...
In reply to फोटो गायब आहे... by Bhakti
इथे बघावा :)
In reply to इथे बघावा :) by सतिश गावडे
ओम मिसेस देशमुख!
In reply to ओम मिसेस देशमुख! by Bhakti
*ओह
श्रावणाचा आनंद सर्वांनी
छान.
जे न देखे....