Skip to main content

बरसणाऱ्या सरी|

लेखक Bhakti यांनी शुक्रवार, 16/09/2022 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
नभावरची साय ऊतू ऊतू जाई, गंधवेडी अवनी बहरली रानो वनी||१|| फेसाळला नदीकाठ ऋतू फुलांची गर्दी दाट हिरव्या पदरावरती दव मोती भरती ||२|| भिरभिरणाऱ्या अंगणात फडफडती भिंगोरी पंखात बरसणाऱ्या सरी धारा काळजाचा गार निवारा||३|| -भक्ती

तमिळनाडूचा इतिहास भाग-८

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी गुरुवार, 15/09/2022 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
घृणा देखील एक प्रक्रिया आहे. जन्माने कूणीही कोणाचीही घृणा करत नाही. लहाम मुलाला आपल्या विष्ठेचीही घृणा वाटत नाही आणि मुलाला फटकारून पालकांना हात लावू नको असं सांगावं लागतं. पेरियार यांच्यातील द्वेष एका दिवसात जन्माला आलेला नव्हता. ती एक प्रक्रिया होती. गांधी मद्रासला आले तेव्हा पेरियार यांचे नाव ई.व्ही. रामास्वामी नायकर असे होते. ते एका श्रीमंत व्यापारी कुटुंबातील होते. त्यांच्या घरी ब्राह्मण नियमित येत असत. त्यांच्याशी शिवा-अशिवी सारखा प्रकार होत नव्हता. सुरुवातीला त्यांची टीका खोडी काढण्यापासून ते प्रामाणिक कुतूहलापर्यंत होती. खरे तर धर्मावर सकारात्मक टीका ही भारताची प्राचीन परंपरा होती.

आठवणीतला गणेशोत्सव

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 15/09/2022 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीचे साडेअकरा वाजले, आणि मी फोनाफोनी सुरू केली. पोलीस कंट्रोल, महापालिका, फायर ब्रिगेड, अन्य वर्तमानपत्रातल्या रात्रपाळीच्या रिपोर्टरांशीही फोनवर बोललो. नवी एडिशन काढावी लागेल असं काही फारसं घडलं नाहीये, याची खात्री करून घेतली, आणि मी आवराआवर केली. तो १९८९ सालातला गणेशचतुर्थीच्या आधीचा दिवस होता. चतुर्थीला सुट्टी होती. ‘उद्या अंक नाही’ अशी चौकट पेपरात ज्या मोजक्याच दिवशी छापली जाते, त्यापैकी हा एक दिवस! मी तयार होऊन थांबलो आणि काही वेळातच एक जाडजूड पिशवी खांद्यावर घेऊन सन्मित्र तानाजी कोलते Tanaji Kolte दाखल झाले. तानाजी तेव्हा माझा सीनियर सहकारी होता.

नेताजीचे सहवासात - भाग २ - अ

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 15/09/2022 18:28 या दिवशी प्रकाशित केले.

नेताजीचे सहवासात - भाग २ - अ

१

नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर नेताजी सुभाष चंद्र बोस यांची भव्य प्रतिमा विराजमान झाली आहे. त्यानिमित्ताने नेताजींचे काही स्वभाव पैलूंवर प्रकाश

नेताजींचे सहवासात लेखक -कॅप्टन पुरुषोत्तम नागेश ओक

        

कै . पुरुषोत्तम ना. ओकांच्या नेताजींचे सहवासात पुस्तकांचा परिचय करून देताना त्यांचा चुलत पुतण्या म्हणून अभिमान वाटतो.

कै.

डोन्ट वरी, बी हंपी..!! भाग -२

लेखक नागनिका यांनी बुधवार, 14/09/2022 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
कार्यबाहुल्यामुळे हा भाग लिहिण्यास खूपच उशीर झाला.. पहिल्या भागाची लिंक देत आहे.. डोन्ट वरी, बी हंपी..!! भाग- १ संध्याकाळी ७:०० च्या दरम्यान हंपीमधून बाहेर पडलो. मुक्कामाच्या हॉटेलमध्ये परततानाच वाटेतील एका छोट्या हॉटेलमध्ये उत्तप्पा खाल्ला, कारण जेवण करण्याइतपत भूक कोणालाच नव्हती. दिवसभराचा प्रवास आणि भटकंतीमुळे सगळेच खूप दमले होते. त्यामुळे रात्री थोड्याफार गप्पा मारून ९:०० वाजता सर्वजण झोपी गेलो. पहाटे ५:३० ला मला जाग आली. झोप व्यवस्थित झाल्यामुळे फ्रेश वाटत होते. हॉटेल मध्ये एक फेरफटका मारला.

गडकरींनी पुण्यात केले 'हे' वक्तव्य... खड्ड्यात वाहन गेले की...

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 14/09/2022 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे वार्ताहर: दि. १४ सप्टेंबर. रस्त्यातील असलेले खड्डे दुरुस्ती करणे किंवा त्या जागी नवे रस्ते करणे सरकारला लगेचच अशक्य आहे. भारतावर चीन ने राज्य केले तरच ते शक्य आहे. अशा परिस्थितीत रस्त्यांत असलेले खड्डेच वाहनचालकांच्या मदतीस येतील, कारण असल्या खड्ड्यांतूनच वीजनिर्मिती भविष्यात करू अशी घोषणा रस्ते वाहतूक मंत्री श्री. गडकरी यांनी काल पुण्यात केली. गणपती विसर्जन झाल्यानंतर आलेल्या पावसाच्या पुराची पाहणी पुण्यात केल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलत होते. ही परिषद रात्री ११ वाजता शासकीय विश्रामगृहात झाली. गडकरी पुढे म्हणाले की, रस्त्यांवरील खड्डे हे आपले मित्रच आहेत. त्यांना वैरी संबोधू नका.

घाटरस्ता, निसर्ग आणि मी

लेखक चांदणे संदीप यांनी बुधवार, 14/09/2022 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच होऊन गेलेल्या वर्षावाला, निथळून टाकणारी हिरव्याकंच कांतीची गर्द वनराई. सकाळचे कोवळे ऊन पिऊन तजेलदार झालेली नवी पालवी. स्वच्छ धुऊन निघालेले, लाल मातीच्या चिखलावर, रेखीव छान वळणदार रांगोळीची जणू निळीशार रेघच असलेले रस्ते. त्यावरून वळणे घेत घेत मी निवांतपणे, आजूबाजूचा निसर्ग न्याहाळीत, मजेत आवडीचे गाणे गुणगुणत, घाटमाथ्यावर चढून जातो आणि, पुढे तसाच खाली उतरून जातो. दिवसभर राबायला, सिमेंटमध्ये वाळू, खडी मिसळायला. परत येताना पुन्हा तेच सारं. - संदीप चांदणे (मंगळवार, १३/०९/२०२२)

लघुकथा

लेखक मालविका यांनी मंगळवार, 13/09/2022 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
लघुकथा अलक 1 आजोबांपासून चालत आलेला गाण्याचा वारसा आपण समर्थपणे पुढे नेतोय याबद्दल गायत्रीताईना समाधान होते. एवढंच नव्हे तर पंतांची मुलगी अशी ओळख संपून गायत्री दांडेकर अशी ओळख निर्माण करण्यात आपण यशस्वी झालो याचा त्यांना अभिमानच होता. पण एक खंत मात्र होती. प्रेमाने ज्याच नाव त्यांनी गंधार ठेवलं होतं, दुर्दैवाने तो मुलगा मुका होता. आपला कलेचा वारसा इथेच संपला या जाणीवेने त्या अस्वस्थ होत. पण वयाच्या तिसर्या वर्षापासून गंधार आई रियाजाला बसली कि समोर बसायचा. खरं तर गायत्रीताईना ते आवडायचं नाही. पण आधीच व्यंग असलेल्या मुलाला आणखी काय बोलणार म्हणून सोडून द्यायच्या. गंधार बारा वर्षाचा झाला.

दावत-ए-बिर्याणी

लेखक पर्णिका यांनी मंगळवार, 13/09/2022 03:07 या दिवशी प्रकाशित केले.
पांचाली आपल्या आजी-आजोबांसोबत कोलकत्ता शहरांत राहत असते. त्या तिघांच्या नात्यांत प्रेम, आपुलकी, काळजी तर आहेच पण त्यापलीकडेही जाऊन मोकळी मैत्रीही आहे. उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील एका विद्यापीठात तिला प्रवेश मिळाला आहे. तिची अमेरिकेत येण्याची तयारी सुरु असतांनाच त्या कुटुंबाला एका दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जावे लागते. आणि खास आपल्या आजोबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी पांचाली लखनऊला येते. तिला तिच्या आजीची बिर्याणीची (सिक्रेट) रेसिपी शोधायची आहे. त्यासाठी ती तिच्या आजीच्या कुटुंबातील सदस्यांनाही भेटते. या प्रवासात तिला तिच्या आजी-आजोबांची प्रेमकहाणी हळुवारपणे उलगडत जाते.

ऐक..दरवाजा उघडू नकोस! (गूढकथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी सोमवार, 12/09/2022 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
ऐक.. दरवाजा उघडू नकोस! (गूढकथा) सायंकाळचा संधिप्रकाश आता, गडद जाणवायला लागला होता. अंधाराच्या छटा आता, अवतीभोवती विखुरल्या जात होत्या. त्या अंधाराच्या गडद छायेत एक एक वस्तू, अदृश्य होत होती. शेवटच्या गल्लीतला सगळ्यात पाठीमागचा तेरा नंबरचा बंगला, जो गल्लीच्या एकदम मागच्या टोकाला होता, तोही आता या अंधारात दिसेनासा झाला होता. जसा जसा अंधार वर चढू लागला, तसतशी भीती संथ गतीने माझ्या अंतर्मनात शिरत होती. या अशा बंगल्यात मी एकटीच होते.अगदी एकटीच.