Skip to main content

जगणे

लेखक सागरसाथी यांनी मंगळवार, 01/11/2022 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
आला दिवस पुढे ढकलणे, जगणे नाही मरणा आधी जगत राहणे, जगणे नाही. जीवन म्हणजे ऊन सावल्यांचा खेळ सारा सावलीसाठी उन्हात पोळणे, जगणे नाही. करार मदार सजावट कागदावरची जूने शब्द उगाळत बसणे, जगणे नाही. होते ताटातूट किनारा आणि लाटांची इथे पुळणीवरची नक्षी जपणे, जगणे नाही हातावच्या रेघांना अर्थ नसतो प्रत्येक वेळी नेहमी नशीबाला बोल लावणे, जगणे नाही. ----- अभय बापट ३१/१०/२०२२
काव्यरस

मद्रासकथा - १

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी सोमवार, 31/10/2022 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
तमिळनाडूचा इतिहास- शेवटचा भाग पासून पुढे https://www.misalpav.com/node/50762 “आम्हा ब्राह्मणेतरांना ब्रिटीश असतानाच आपले हक्क मिळवावे लागतील. अन्यथा ही ब्राह्मण सत्ता कधीच संपणार नाही आणि आम्हा द्रविडांना कायम ब्राह्मणशाहीच्या जुलमात रहावे लागेल. - ई व्ही रामास्वामी 'पेरियार' [१९२४ साली सालेम येथील भाषणात] मी माझ्या लहानपणी एकदा बिहारमधील काँग्रेसच्या कार्यालयात गेलो होतो. त्या दिवसांत जगन्नाथ मिश्रा नावाच्या मुख्यमंत्र्यांचा शेवटचा काळ चालू होता. त्या जिल्हा कार्यालयात ब्राह्मणांचा मेळा लागला होता.

हॅलोविन हॅलोविन

लेखक चामुंडराय यांनी रविवार, 30/10/2022 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
one कोविड-१९ ची साथ जोरात असताना दोन वर्षांपूर्वी एका मराठी वृत्तपत्राच्या आंतरजालीय आवृत्तीत प्रसिद्ध झालेला हॅलोविन सणासंबंधित माझा लेख. हा लेख वाचताना कोविड साथीच्या परिप्रेक्ष्यातून वाचावा, हि विनंती. हॅलोविनच्या सणावर कोविड-१९ चे सावट हॅलोविन हा दरवर्षी ३१ ऑक्टोबरला साजरा होणारा पाश्चात्य जगातील आबालवृद्धांचा आवडता सण.

कांतारा ए लेजेंड

लेखक अनुस्वार यांनी रविवार, 30/10/2022 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
कटाक्ष - मुळ‌ कन्नड चित्रपट नाट्य, थरारपट वेळ - २ तास ३० मिनिटे हिंदी परभाषीकरण (डबिंग) ओळख - नावातल्या 'ए लेजेंड' नुसार चित्रपटाची कथा एका आख्यायिकेवर बेतलेली आहे. कर्नाटकातील काही ग्रामीण लोकसंस्कृतींमध्ये आढळणाऱ्या 'भूता कोला' या परंपरेशी संबंधित ही आख्यायिका सांगून चित्रपटाची सुरुवात होते. चित्रपटात या परंपरेचा केवळ 'कोला' असा उल्लेख असून या कार्यक्रमाच्या उत्सव मुर्तीला 'देव' म्हणतात. हे देव गावातील कुणीही व्यक्ती असू शकते. एरवी सामान्य माणूस म्हणून जगणाऱ्या या व्यक्तीच्या शरीरात 'कोला'च्या वेळी वनदेव संचारतात अशी मान्यता असते.

माझ्या कथा

लेखक भागो यांनी शुक्रवार, 28/10/2022 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाचा दिवाळी अंक येण्यास वेळ लागत आहे . ठीक आहे, तोपर्यंत दुधाची तहान ताकावर भागवा. माझ्या पाच कथांचा रंगीबेरंगी कथा संग्रह https://drive.google.com/file/d/1AZIkBa-18Q4w-rQIvh8fhnG7Emkwn9mQ/view? usp=sharing इथे आहे. विनामूल्य डाउनलोड करू शकता.

पायावर पाणी

लेखक पॉइंट ब्लँक यांनी शुक्रवार, 28/10/2022 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
पालखी मंदिरातून निघून जवळपास तीन तास झाले होते. पालखी निघाली ती देखील भर दुपारची. डोक्यापासून नखापर्यंत तो भंडाऱ्यात न्हाला होता. अंगातून निघणाऱ्या घामासोबत ओघळत भंडारा थोडा खाली सरकत होता. अनवाणी पायांना रस्त्यावरचे खडे टोचत होते. पण ती देवाची पालखी, ढोलाच्या तालावर, टाळाच्या चालीवर नामघोषसोबत पुढे सरकत राहिली. मानकरी आलटून पालटून पालखी घेत होते. पालखी पुन्हा एका चौकात येऊन थांबली, तसा देवाच्या नावाचा मोठा जयघोष झाला. ढोलाचा आवाज अजून वाढला, भंडारा आभाळाला भिडला. पुन्हा एकदा त्याला पालखी घ्यायचा मान मिळला.

जुन्नर भटकंती-१

लेखक Bhakti यांनी शुक्रवार, 28/10/2022 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
तसा घरून निघायला‌ उशीरच झाला.राष्ट्रीय महामार्ग ६१ ला‌ पोहचलो.हा रस्ता खुप चांगला असल्याने या‌ मार्गाचे प्रवास आवडतात.पिवळ्या फुलांनी बहरलेल्या मार्गांना‌ मागे टाकत जुन्नरच्या दिशेने निघालो. जुन्नर सुरू होताच खोडद गावातील रेडिओ दुर्बीण दुरुन नजरेस पडते.१९९० साली पुणे जिल्ह्यातील खोडद(ता.जुन्नर) गावात मीटर तरंगलांबीची महाकाय रेडिओ दुर्बीण उभारण्यात आली. कित्येक दिवसांपासून नाणेघाट पाहायची इच्छा फलद्रूप होणार होती.सातवाहन‌ काळातील मार्ग जो डोंगर फोडून व्यापारासाठी अंदाजे इसपु.२३०ला बनवला गेला(इतरत्र वाचलेल्या माहितीनुसार) नाणेघाटाला पोहचल्यावर पहिल्यांदा जो रांजण दिसला‌ ज्याचा वापर त्याकाळी

अवती भवती तरंगे.

लेखक Deepak Pawar यांनी मंगळवार, 25/10/2022 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
अवती भवती तरंगे तुझ्याच श्वासाचा दरवळ अंतरी फुलते आहे तुझ्याच प्रीतीची हिरवळ. रस्त्यावर पाऊल खुणा कि होई आभास तुझा वाऱ्यावर गंध फुलांचा कि दरवळे श्वास तुझा जिकडे तिकडे दाटली तुझ्याच पदराची सळसळ. संध्याकाळ ही उधळीत रंग तुझ्या आठवांचे रात्र दाटता का आठवे मज पळ चांदण्यांचे? उठता बसता सारखा तुझाच भास मला हरपल. छेडूनी दुखास माझ्या आता हे सूर लाविले तू ते माझेच शब्द होते येथे जे गीत गायिले तू कशास करशी मना तिचीच तू आता कळकळ.

दिवाळी विशेष – भायखळ्याचं स्टेशन

लेखक पराग१२२६३ यांनी रविवार, 23/10/2022 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
Byculla यंदाच्या दिवाळीच्या निमित्तानं मुंबईमधल्या भायखळा रेल्वेस्थानकाच्या ऐतिहासिक इमारतीविषयीचा हा विशेष लेख.