Skip to main content

बंदूक भाग २

लेखक Deepak Pawar यांनी रविवार, 05/03/2023 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
घरी आलो तर आईनं तोंडाचा पट्टा सुरु केला. " कुठं गेला होतास, तुला घर दार हाय कि नाय, उन्हा-तान्हातून दिवसभर उंडगत असतोस, थांब तुझ्या तंगड्याच तोडून ठेवता, जनमभर पोसायला झालं तरी चालल, डोक्याला ताप तरी राहणार नाय." ती बोलत असलेला एक शब्दही आपल्याला ऐकू येत नाही, अशा अविर्भावात मी हात पाय धुवून जेवायला बसलो. जेवण उरकल्यावर खाटेवर शहाण्या मुलासारखा बसून राहिलो. थोड्या वेळानं आईच लक्ष नसल्याचं पाहून सटकलो. संज्याच घर वाटेत असल्यानं, तो घरी आहे का पाहावं? म्हणून त्याच्याकडे गेलो, तर तो जेवायला बसलेला. ओट्यावर कुणीतरी पायापासून डोक्यापर्यंत अंगावर घेऊन झोपलं होतं.

बंदूक भाग १.

लेखक Deepak Pawar यांनी शुक्रवार, 03/03/2023 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच पावसाळा संपून जिकडे तिकडे आनंदाचे वारे वाहू लागले.शेतकऱ्याची तर नुसती धांदल उडाली होती. कुणाची भात कापणी सुरु होती.कुणी नाचणीची कणसं वेचत होतं, तर कुणी कापून आणलेल्या धान्याच्या अडव्या घालत होतं. गुरं पोट टम्म भरेपर्यंत चरत होती. नुकत्याच कापून झालेल्या शेतात; कणसातून पडलेले दाणे टिपण्यात पाखरं मग्न होती. त्याची तर मजाच-मजा. धान्य टिपणारी पाखरं बघणं तर त्याहून मजेदार.म्हणजे ती दाणे टिपताना दोन-तीन दाणे टिपणार, मान वर करून आजूबाजूला टकामका बघणार,परत दोन-तीन दाणे टिपणार परत मान वर करून टकामका बघणार. काही धोका नसे पर्यंत हे न थकता सुरूच राहणार.

मक्याचे लॉलीपॉप

लेखक Bhakti यांनी शुक्रवार, 03/03/2023 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
खमंग थालिपीठ पाहून मलाही वेगळे थालिपीठ बनवायची इच्छा झाली.लुसलुशीत दाणे असलेले मक्याचे कणीस दुर्लक्षामुळे कोरडे व्हायला लागले होते.मक्याचे पीठ त्याच्या कार्ब ,फायबर मुळे अनेक पाककृतीमध्ये वापरले जाते.थालिपीठ तर बनवायचे होते पण लेक कालपासूनच म्हणत होती वेगळ खायचं आहे.तेव्हा लॉलीपॉप हा प्रकार कधीच केला नाही तो करावा म्हटलं. साहित्य: g दोन वाट्या उकडलेले मक्याचे दाणे एक वाटी उकडलेले मटार दोन उकडलेले बटाटे मिरची,लसूण,आलं,जिरे,कोथिंबीर वाटण दोन चमचे तिखट,चाट मसाला,गरम मसाला चवीपुरते मीठ दोन चम

वांग्याचे थालीपीठ आणि भरीत!

लेखक टर्मीनेटर यांनी गुरुवार, 02/03/2023 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : कर्नल साहेबांचा 'थालीपीठ-एक मराठमोळा पदार्थ' हा धागा आणि त्यावरचा गविंचा हा प्रतिसाद! दोन-तीन महिन्यांतून करावी लागणारी फार्मच्या रेग्युलर मेंटेनन्सची कामे तिन-चार दिवस चालणार असल्याने नेहमीप्रमाणे शुक्रवारी न येता ह्यावेळी मंगळवारी संध्याकाळीच पेण मुक्कामी येऊन थडकलो.

शशक- निवडणूक ३

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी गुरुवार, 02/03/2023 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचे भाग निवडणूक निवडणूक २ साहेब, नुसतेच काय शाहु,फुले,आंबेडकरांची नावे घ्यायची? यावेळी वॉर्डात बहुजन समाजाचा उमेदवार पाहीजे बघा लोकांना.आपले नाना कसे वाटतात? अरे बाबा निवडुन यायला मतांची बेरीज बघावी लागते. शिवाय तुझा ऊमेदवार पार्टीफंड किती देणार? पार्टीफंडाची काळजी नाही साहेब.तो पाहीजे तेव्हढा उभा करु . पण मतांसाठी जरा अडचण आहे बघा. अरे तेच तर महत्वाचे आहे, आधीच नोटाचे फलक लागलेत तुझ्या वॉर्डात.

स्टीमपंक चॅटरबॉक्स

लेखक भागो यांनी बुधवार, 01/03/2023 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
स्टीमपंक चॅटरबॉक्स डॉक्टर ननवरे बंगल्याच्या बागेत काहीतरी अचाट प्रयोग करत होते. त्यांनी जुन्या बाजारातून बरच काही लोखंडी सामान विकत आणले होते. त्यात काय नव्हते? त्यांत निरनिराळ्या गेजचे लोखंडी पत्रे होते, एम-५ पासून एम-३० पर्यंतचे बोल्ट होते, ओपन एंड, रिंग, सॉकेट, बॉक्स,आणि शेवटी अॅड्जस्टीबल असे स्पॅनरचे अनेक प्रकार. स्टील वायर्स. चेन्स, कप्प्या. बेअरीन्ग्स, पिस्टन आणि मॅचिंग सिलींडर, क्रॅंकशाफ्ट, क्रॅंकेस. आता मी कशाकशाची नावे लिहू डॉक्टरांनी मला ह्या सगळ्या स्टोरचा इन्चार्ज केलं. आणि हुद्दा दिला: भांडारगृह प्रमुख!

मुंबईत फ्लेमिंगो पक्षी बघणे.

लेखक कंजूस यांनी बुधवार, 01/03/2023 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
फ्लेमिंगो पक्षी बघणे.

फ्लेमिंगो पक्ष्यांनी मुंबईत येण्याची सुरुवात होऊन आता पंचवीस वर्षे तरी झाली असतील. अधुनमधून दरवर्षी ते पाहायला जात असतो. या आठवड्यात गेलो होतो त्याची थोडक्यात माहिती देत आहे. ते पक्षी डिसेंबरच्या सुरुवातीला कच्छ (गुजरात) आणि इतर ठिकाणांहून येऊ लागतात आणि मे महिन्यात परत जातात. मुंबईत ते ठाणे खाडीच्या कांदळवन किनाऱ्यावर येतात. दिवसा पाण्यातले शेवाळ खातात आणि रात्री जवळपासच्या चेंबूर,देवनार,तुर्भे इत्यादी ठिकाणी असलेल्या उंच कांदळवनांचा आश्रय घेतात.

घावन्/डोसा/आंबोळी

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 01/03/2023 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा मिपावरची खमंग चर्चा वाचुन म्हटले आपणही थालिपीठ करुन बघावे. पण आळशीपणा नडला. आणि "माकडाचे घर" गोष्टीप्रमाणे गॅस लावल्यावर एक एक गोष्टी बाजारात असल्याचा पत्ता लागला. मग अंगच्या आळशीपणाला जागुन दुसरेच काहितरी बनवले त्याची सोपी कृती- घरी तांदुळ पिठी आणि बेसन्/ज्वारी पीठ होते. हेल्मेट घालुन कांदा जमेल तितका बारीक कापला. कोथिंबीरही सापडली तीपण बारीक चिरली. सगळे एकत्र केले.चवीपुरते मीठ/मिरची घातले .पाणी घालुन मिश्रण तव्यावर ओतले जाईल ईतपत पातळ केले.

खलिस्तानी

लेखक चौकस२१२ यांनी बुधवार, 01/03/2023 07:46 या दिवशी प्रकाशित केले.
खलिस्तानी वाद्यांकडून भारताबाहेर हिंदू मंदिरांवर आणि भारतीय दूतावासवर हल्ले https://www.timesnownews.com/world/after-temples-khalistani-goons-targe… भारत तेरे तुकडे तुकडे / डेथ बाय थाऊसंड कट्स " वाल्यांचे हे कारनामे .. अतिउदारमतवादींना उकळ्या फुटत असतील .. (नवरा मेला तरी चालेल पण सवत विधवा झाली पाहिजे वा ली जमात ) चला भाजप वर अजून एक खापर फोडायला मोकळे .. ".... किनई आमचं काँग्रेस होतें न तेव्हा अस्से काही होत नवहते हो ..

शशक- खड्डे

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी मंगळवार, 28/02/2023 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
नर्स- डॉक्टर, एव्हढी नारळाची झाडे का लावताय तुम्ही अचानक? नारळाचा बिसनेस वगैरे करायचा विचार आहे का? डॉक्टर- नाही, वाईच्या फार्म हाऊसवर लावतोय एक एक करून. मागच्या बाजूला मोकळी जागा आहे ना तिथे. नर्स- तुमचे फार्म हाऊस फारच एका टोकाला आहे. नाही का आपण दोघेच गेलो होतो एका वीकेंडला?आजूबाजूला काहीच वस्ती नाही. कम्पाउंडला लागून एकदम धोम धरणच आहे.मला तर बाई भीतीच वाटली. डॉक्टर- मी मुद्दामच तशी जागा निवडली आहे. काम उरकायला बरे पडते तिकडे. नर्स-किती खड्डे खणलेत आतापर्यंत? डॉक्टर- ६ खणलेत, त्यातले ४ भरलेत. एक या आठवड्यात भरेल आणि त्यात नारळाचे झाड लागेल. नर्स- बापरे.