मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुंबईत फ्लेमिंगो पक्षी बघणे.

कंजूस · · भटकंती
फ्लेमिंगो पक्षी बघणे.

फ्लेमिंगो पक्ष्यांनी मुंबईत येण्याची सुरुवात होऊन आता पंचवीस वर्षे तरी झाली असतील. अधुनमधून दरवर्षी ते पाहायला जात असतो. या आठवड्यात गेलो होतो त्याची थोडक्यात माहिती देत आहे. ते पक्षी डिसेंबरच्या सुरुवातीला कच्छ (गुजरात) आणि इतर ठिकाणांहून येऊ लागतात आणि मे महिन्यात परत जातात. मुंबईत ते ठाणे खाडीच्या कांदळवन किनाऱ्यावर येतात. दिवसा पाण्यातले शेवाळ खातात आणि रात्री जवळपासच्या चेंबूर,देवनार,तुर्भे इत्यादी ठिकाणी असलेल्या उंच कांदळवनांचा आश्रय घेतात.

आहे त्या परिस्थितीत आपली जागा आणि खाणं शोधून थव्याने राहणारा सुंदर पक्षी म्हणजे फ्लेमिंगो/रोहित पक्षी असं वर्णन करता येईल.

त्यांना पाहण्यासाठी
१)शिवडी,
२)ऐरोली नवी मुंबई/ठाणे खाडी
३)भांडूप पंपिंग स्टेशन
या तीन विशेष जागा आहेत.

जावे कसे

शिवडी हे मुंबई हार्बर लाईन रेल्वेवरील एक स्टेशन आहे. इथे रेल्वे क्रॉसिंग फाटकही आहे. शिवडी पूर्व भागात आल्यावर कोळीवाडा रस्त्याने दहा मिनीटे चालत गेल्यावर ( इतके जवळ आहे) एक दर्गा प्रवेश कमान लागते. इथे उजवीकडे वळून पाच मिनिटांत आपण जेट्टीवर येतो. २०१८मध्ये इथे आलो होतो पक्षी बघायला तेव्हाच कळले की इथूनच 'कोस्टल रोड' समुद्रातून रेवस/मांडवाकडे जाणार आहे आणि तुम्हाला चार पाच वर्षे येता येणार नाही. तसेच झाले. मोठा पूल बांधत आहेत आणि जेट्टीवर जाऊन देत नाहीत. तर ही जागा आता बंद झाली.
अगोदरच्या वळणावरच्या दर्ग्याच्या कमानीच्या पायऱ्या चढून वर गेल्यावर शिवडी किल्लेदाराचा वाडा दिसेल.यालाच चिकटून डावीकडे दर्गा आहे आणि त्यालाच चिकटून डावीकडे शिवडी किल्ला आहे. तशी शिवडी किल्ल्यात जाण्यासाठी एक स्वतंत्र दगडी पायऱ्यांची वाटही आहेच. (३-४-५ मार्च २०२३ला दर्ग्यात उरुस उत्सव आहे. तेव्हा जाऊ नका.) हा किल्ला कुणी कशाला बांधला वगैरे नेटवर भरपूर माहिती आहेच ती इथे देत नाही.

फोटो १
शिवडी स्टेशन ते किल्ला, जेटी फेरी रूट नकाशा


विडिओ १

शिवडीचा किल्ला.Sewri Fort.
Sewri, Mumbai.
Recorded on 2023_02_27
https://youtu.be/SpSSu8t-ux8
_____________________

विडिओ २
शिवडी किल्लेदाराचा वाडा.
House of chief of Sewri fort
https://youtu.be/X7HKVCLf58M

विडिओ पाहिल्यावर कोठार कोणते याची कल्पना येईलच. किल्लेदारासाठीचा वाडा आता बराचसा पडलेला दिसतो आहे. पण पाच वर्षांपूर्वी उजव्या कोपऱ्यातला प्रशस्त लाकडी जिना, वरच्या मजल्यावरच्या खोल्या,छप्पर हे सुस्थितीत होते आणि मी वरती जाऊनही आलो होतो. विटा ,चुना आणि लाकूड वापरले आहे. लाकूड कुजल्यामुळे वाडा पडला. किल्ला मात्र चूना, वाळू आणि दगडी बांधकामाचा असल्याने भक्कम आहे. तर फ्लेमिंगोसाठी जाताना हा किल्ला अनायसे पाहून होतो. शिवडीची फ्लेमिंगोसाठीची जागा निरीक्षणाखाली उत्तम, आणि विनाशुल्क होती ती आता तरी बाद झाली.

क्रमांक (२) आणि (३) या जागा एकाच खाडीचे दोन किनारे आहेत. तिथे पोहोचून बोट घ्यावी लागते. खर्चिक आहेच. पण आपल्याकडे चांगल्या दुर्बिणी, झूम कॅम्रे हवेत. बोट (लॉन्च) आवाज करत जाते आणि पक्षी उडून दूर जाऊन बसतात. या ठिकाणाचे बरेच चांगले विडिओ यूट्यूबवर पाहून समाधान मानू शकतो.

मी ऐरोली किनाऱ्यावरच्या सरकारी केंद्रावर जाऊन आलो.
नवी मुंबईतील राहणाऱ्यांनी कोणत्याही वाहनाने ऐरोली सेक्टर १० बस स्टॉप (ऐरोली - मुलुंड लिंक पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे) येथे यावे. तिथून फक्त पाचशे मिटरांवर हे केंद्र आहे.
मुंबई मध्यरेल्वे लाईनवरच्या नाहूर स्टेशनवरून बसेस आहेत. त्या ऐरोली सेक्टर १० ला जातात. वाटेत अगोदरच्या भांडूप पंपिंग स्टेशनवरूनही किनाऱ्यावर जाण्याचा पर्याय आहेच.
काही बसेस पश्चिम उपनगरांतून ऐरोलीला जातात त्याने थेट ऐरोली सेक्टर १० गाठता येते.
Nahur to Airoli sector 10
1) Nahur station WEST TO Airoli sector 10
बस नं
522, 523, 512,
नाहूर पश्चिमेला थोडे चालावे लागते. तिथे स्टॉप आहे पण तीन बसेस मिळतात. ___________________
2) Nahur station EAST TO Airoli sector 10
545
नाहूर पूर्वेच्या स्टॉप अगदी स्टेशनला चिकटून आहे पण इथून फक्त एकच बस जाते. दोन्हीकडून फक्त पंधरा मिनिटे लागतात आणि बस तिकिट फक्त पाच रु आहे. बस मार्ग आहेतच पण स्वतःचे वाहन,ओटो, टॅक्सीचे पर्यायही गोरेगाव,अंधेरी,मुलुंड,नाहूर इथून घेता येईल.
_________________
फोटो २
नाहूर स्टेशन ते ऐरोली सेक्टर १० लिंक रोडचा बस स्टॉप बस मार्ग नकाशा


फोटो ३
ऐरोली सेक्टर १० बस स्टॉप ते 'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य' सेंटर' एन्ट्री गेट (चालत पाचशे मिटर) नकाशा


फोटो ४
'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य' सेंटर, ऐरोली, दरपत्रक १


फोटो ५
'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य' सेंटर, ऐरोली, दरपत्रक २


फोटो ६
म्युझियम .. आतमध्ये दोन आहेत.


फोटो ७
पाट्या


_________

जावे केव्हा

पाणपक्षी हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. समुद्र अथवा खाडीत भरती ओहोटी असेल त्याप्रमाणे किनारा पाण्याने भरतो अथवा रिकामा दिवसातून दोनदा होतो. फ्लेमिंगो किंवा इतर काही पक्षी हे ओहोटी लागल्यावर किनार्याला जे उथळ पाणी राहते त्यातून अन्न मिळवतात. त्यांच्या पायांच्या उंचीप्रमाणे खोल पाण्यात जातात . जेव्हा भरती संपून ओहोटी सुरू होते म्हणजे पाणी मागे गेल्याने किनारा उघडा पडू लागतो तेव्हा लगेच त्यातले जीव चिखल,वाळूत आसरा शोधायची घाई करतात तेव्हा त्यांना पकडता येते. फ्लेमिंगो पक्षी मात्र इतरांच्या अन्नात फारसे भागीदार नसतात.ते पाण्यातले शेवाळ गाळून खातात. तरीही ते ओहोटीच्या मागे जाणाऱ्या पाण्याबरोबर मागे सरकत राहतात. या भरती ओहोटीची वेळ जाणून घेण्यासाठी साधा ढोबळ नियम म्हणजे भरतीच्या वेळेनंतर दोन तासांनी पक्षी बघायला जावे. चंद्राची रोजची तिथी हे दाखवते. प्रथमा/प्रतिपदेला दुपारी एकानंतर, द्वितियेला दुपारी दोन नंतर, तृतियेला दुपारी तीन नंतर, चतुर्थीला दुपारी चार नंतर, पंचमीला दुपारी पाचनंतर, षष्ठीला सकाळी सहानंतर, सप्तमीला सकाळी सातनंतर, अष्टमीला सकाळी आठ नंतर, नवमीला सकाळी नऊ नंतर, दशमीला सकाळी दहानंतर . एकादशीला दुपारी अकरा नंतर, द्वादशीला सकाळी बारानंतर, त्रयोदशीला दुपारी दोन नंतर, चतुर्दशीला दुपारी तीन नंतर. . पौर्णिमेला/(किंवा अमावस्येला ) दुपारी चार नंतर योग्य.
**** बोटीने जाऊ इच्छिणाऱ्या आणि तिथे जाऊन तिकिटे काढणाऱ्यांसाठी - भरती सुरू होण्याच्या वेळा .या वेळी पाणी आत येऊ लागते आणि पक्षी उडून दूर जाऊन बसू लागतात. चंद्राच्या तिथीप्रमाणे पाहावे (भरती पुढच्या दिवशी पन्नास मिनिटे उशिरा येत असते. पुढचा ढोबळ हिशोब आहे. ) बोटीने जाऊ इच्छिणाऱ्या दर्शकांनी ओनलाइन बुकिंग केले असेल तर त्यांना तारीख,वेळ मिळालेली असतेच. पण तिथे जाऊन तिकिटे काढणाऱ्यांना या वेळेचा उपयोग होईल. खाडीत पाणी भरून जेटीला बांधलेल्या बोटी तरंगू लागतात आणि निघतात. प्रथमा - सकाळी दहा नंतर द्वितीया - सकाळी दहा नंतर तृतीया- सकाळी अकरा. चतुर्थी - दुपारी बारा नंतर. पंचमी - दुपारी एक नंतर. षष्ठी - - दुपारी दोन नंतर. सप्तमी - दुपारी तीन नंतर. अष्टमी - दुपारी चार नंतर. नवमी - संध्याकाळी पाच नंतर. दशमी - सकाळी सहा नंतर एकादशी - सकाळी सात नंतर द्वादशी - सकाळी आठ नंतर त्रयोदशी - सकाळी नऊ नंतर. चतुर्दशी - सकाळी दहा नंतर पौर्णिमा किंवा अमावस्या - दहा नंतर. _______________

इतर माहिती लिंकस
ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य- कांदळवन कक्ष, महाराष्ट्र शासन
https://mangroves.maharashtra.gov.in/Site/1094/Thane-Creek-Flamingo-Sanctuary

Thane Creek Flamingo Sanctuary
https://flamingosanctuary.com/ _____________________ काल (2023_03_12) ऐरोली इथल्या केंद्रावर रविवारी एक फेरी मारली तेव्हा मोबाईलवर काही फोटो घेता आले. बोटफेरीच्या धक्क्याजवळच फ्लेमिंगो दिसले . भरती ओहोटीच्या नियमाप्रमाणे ओहोटीचे पाणी ओसरले की पक्षी गर्दी करतात. धक्क्याजवळूनच पक्षी पाहता येतात. पण . . .या वेळी बोटी चिखलात असतात आणि पुढे जाऊ शकत नाहीत. ओहोटीचे पाणी आत जाते त्या रेषेपर्यंत वाट/धक्का बांधलेला नाही. काही लोक येत होते परंतू बोट जाणार नाही म्हटल्यावर नाराजीने परत जात होते. विशेषतः लहान मुलांना बोटीमध्ये बसण्याचीच हौस होती, जवळून पक्षी पाहण्याची नव्हती. बोटीचे नावाडी सांगत होते की इथूनच दिसतात हेच पाहा ना. बोटीने गेल्यावर पक्षी दूर कुठे किनाऱ्यावर दिसतात त्यापेक्षा हेच बरे आहे. पण ऐकतो कोण. बोटीमध्ये सीट {ओनलाइन/ ओफलाईन} बुक करणे व त्यांचे दर पाहिल्यावर ते खर्चिक आहे हे दिसेल. पण ओहोटीची योग्य वेळ धरून धक्क्यावर गेल्यास पक्षी पाहता येतात. त्या एन्ट्रीचे तिकीट फक्त ५०/- रु आहे. बाकी तिथली व्यवस्था,पार्कींग,सुरक्षा,स्वच्छता ,विस्तृत जागा,कर्मचारी इत्यादी पाहिल्यावर तिकीट वसूल आहे. बोटी एकूण पाच दिसत होत्या. लाईफ जाकेट्स सीटांना बांधली होती. २४ सीटर आणि ८ सीटर अशा दोन प्रकारच्या बोटी असून त्यास दोन प्रापेलर एंजिने आहेत. फोटो 2023_03_12_(1)
एका रांगेत


फोटो 2023_03_12_(2)
लहान थवा


फोटो 2023_03_12_(3)
हा चिखलातून खाणं शोधणारा एक पक्षी ( पाण टिळवा, black-tailed godwit) त्याची लांब चोच खुपसून जीव शोधत होता


फोटो 2023_03_12_(4)
Board walk. खारफुटी वनातून जाण्यासाठी


इथे दिसणारे छोटे गुलाबी फ्लेमिंगो (lesser flemingos) आहेत. मोठे उंच पक्षी(greater flemingos) नव्हते.

___________________

सूचना आणि दुरुस्तीचे स्वागत. आपले अनुभवही मांडा.

वाचने 11793 वाचनखूण प्रतिक्रिया 31
लेख आवडला! फ्लेमिंगो पक्षी पाहणे हा एक नेत्रसुखद अनुभव असतो! त्या पक्षांच्या थव्याचा एखादा फोटो टाकला असतात तर बहार आली असती.

In reply to by टर्मीनेटर

कंजूस 01/03/2023 - 18:43
चांगले कॅम्रे वापरून काढलेले फोटो, विडिओ यूट्यूबवर भरपूर आहेत तिथे आमच्या पिटुकल्या मोबल्यातून काय उजेड पाडणार? आमची आवडती जागा शिवडी जेटी. बघू कधी उघडतात.

In reply to by कंजूस

ते काही नाही, फ्लेमिंगो पक्षांबद्दलच्या लेखात त्यांचा साधा एक फोटो पण न टाकणे हा घोर अपराध आहे! त्याचे प्रायश्चित्त म्हणून तुम्हाला आता सोन्याचा फ्लेमिंगो पक्षी बनवून तो दान करावा लागेल 😂 😂 😂

In reply to by टर्मीनेटर

लवकर दान करा. पूर्वी फोटो काढले होते पण मोबाइल कॅम्राचे फारच केविलवाणे येतात. त्यामुळे माझे फोटो न टाकता कसे,केव्हा जावे,जागा ,तिकिटे यावरच भर दिला.

In reply to by टर्मीनेटर

काल (2023_03_12) रविवारी एक फेरी मारली तेव्हा मोबाईलवर काही फोटो घेता आले. बोटफेरीच्या धक्क्याजवळच फ्लेमिंगो दिसले . भरती ओहोटीच्या नियमाप्रमाणे ओहोटीचे पाणी ओसरले की पक्षी गर्दी करतात. धक्क्याजवळूनच पक्षी पाहता येतात. पण . . .या वेळी बोटी चिखलात असतात आणि पुढे जाऊ शकत नाहीत. ओहोटीचे पाणी आत जाते त्या रेषेपर्यंत वाट/धक्का बांधलेला नाही. काही लोक येत होते परंतू बोट जाणार नाही म्हटल्यावर नाराजीने परत जात होते. विशेषतः लहान मुलांना बोटीमध्ये बसण्याचीच हौस होती, जवळून पक्षी पाहण्याची नव्हती. बोटीचे नावाडी सांगत होते की इथूनच दिसतात हेच पाहा ना. बोटीने गेल्यावर पक्षी दूर कुठे किनाऱ्यावर दिसतात त्यापेक्षा हेच बरे आहे. पण ऐकतो कोण. फोटो 2023_03_12_(1)
एका रांगेत


फोटो 2023_03_12_(2)
लहान थवा


फोटो 2023_03_12_(3)
हा चिखलातून खाणं शोधणारा एक पक्षी ( पाण टिळवा, black-tailed godwit) त्याची लांब चोच खुपसून जीव शोधत होता


फोटो 2023_03_12_(4)
Board walk. खारफुटी वनातून जाण्यासाठी


इथे दिसणारे छोटे गुलाबी फ्लेमिंगो (lesser flemingos) आहेत. मोठे उंच पक्षी(greater flemingos) नव्हते.

In reply to by कंजूस

चौकस२१२ 26/03/2023 - 10:48
डिसेंबर महिन्यात दुपारी २-३ च्या बोटीने गेलो होतो त्यावेळी भरती असल्यामुळे फ्लेमिंगो ऐरोली पुलाच्या एवढे जवळ नवहते ... जिथे खाडी रुंद होत जाते त्या वाशी पुला च्या दिशेला घोळक्याने तरंगत होते त्यामुळे उभे चालणारे फ्लेईमिंगो बघण्यातील मजा घेता आली नाही , त्यामानाने तुमच्या या फोटोत अगदी धक्या चा जवळून तुम्हाला असे पाहायला मिळाले हे चांगलेच कि . बाकी महत्वाची माहिती त्यावेळी कळली कि १) हे पक्षी काही सायबेरियातून वैगरे येत नाहीत तर हे भारतीय फ्लेमिंगो जातीचे असून गुजराथ किनाऱ्या वरून आलेले आहेत २) त्यात सुद्धा एक मोठा आणि एक छोटा अशी शरीरयष्टी आहे . हा प्रकल्प चांगला आहे पण मुख्य कक्ष सोडलं तर बाकी अनागोंदी कारभार आहे , शौचालय बेकार , व्हेल माशाचा एक सांगाडा आहे तो एक टपरी खाली नुसता धूळ खात फेकलेला आहे , एका बंदिस्त टपरीत कोणत्यातरी शोभेच्या माशांचे विक्रीसाठी उत्पादन करतात , ते सुद्धा आत जाऊन ( समजा काचेच्या खिडकीतून तरी ) बघता येत नाही बाकी ती जी बोर्ड walk आहे त्यावर थोडेसे पुढे चालून बघितले .. "हे राम" एवढेच काय म्हणू शकतो त्या बाबतीत म्हणजे थोडक्यात काय मूळ सरकारने चांगला पैसा यात घातला पण पुढे सगळं अनागोंदी इको टुरिसम चे मुबई तुन सर्वात जवळचे हे एक नैसर्गिक ठिकाण ते पण नीट चालवता येत नाही किंवा चालवत असले तरी त्याची निगा नीट ठेवता येत नाही मुंबईतील ५ तरी हॉटेल यामध्ये जे जरा निवांत वेळ काढून जे देशी परदेशी येतात त्यांना हॉटेल + बस मधून हे ठिकाण + काहीतरी खाणे इकडे अशी काही टूर काढली तर काही महिने चालेल सुद्धा ... दारिद्र्री असलेलया इंडोनेशियातील सिंगापुर जवळचे बाताम बेट आहे ते सुद्धा तसे बकाल आहे पण तिथे सुद्धा १ दिवसाची टूर सहज विकतात सिंगापुरातील टुरिष्टांना असो

In reply to by चौकस२१२

कंजूस 26/03/2023 - 14:03
तुमच्या प्रश्नांची उत्तरे - (१) - लहान आणि मोठे पक्षी कच्छ मधून येतात. काही लहान भारताबाहेरूनही येतात. मोठे शिवडी /माहुलकडे पाहायला मिळतात. पण त्या जागा आता बंद झाल्या आहेत. म्हणजे पक्षी आहेत तिथे पण कोस्टल रोडच्या कामामुळे पुढे जाता येत नाही. मोठे पक्षी भारतात कुठे येतात हे "greater flemingos sites in India " netवर शोधल्यावर दहा जागा दिसतील. (२) - शौचालय - तुम्ही पाहिले ते वेगळे. जेटीवरून पक्षी पाहणाऱ्यांना ते जवळ आहे. एक मोबाईल टपरी टाकतात जत्रेत तशी. पण खरी वाशरूम तिकिट खिडकीच्या {दालनात} मागे आहे. (३) बोर्ड वॉक - हे मुद्दामहून जाणीवपूर्वक बांबू बांधून केले आहे कारण खालच्या दलदलीत पडणारा सूर्यप्रकाश पूर्णपणे कायमचा अडला जाऊ नये. आताच कुजलेले बांबू बदलण्यात आले आहेत. मला वाटतं की बंगालच्या सुंदरबनात जे कांदळवन(mangrove sites, Sanctuary) केंद्र आहे त्यात असेच मार्ग केले आहेत. (४) लेखामध्ये जेटीवरूनच पक्षी पाहण्यासाठीच्या {ओहोटीच्या}वेळा मी दिल्या आहेत. तेव्हा बोटी बंद असून चिखलात किनाऱ्याला असतात. भरती केव्हा सुरू होते यांच्या वेळाही लेखात टाकतो. राज्य सरकारच्या वन खात्याकडे हे आहे.

In reply to by कंजूस

चौकस२१२ 26/03/2023 - 14:34
शौचालय - तुम्ही पाहिले ते वेगळे. जेटीवरून पक्षी पाहणाऱ्यांना ते जवळ आहे. एक मोबाईल टपरी टाकतात जत्रेत तशी. पण खरी वाशरूम तिकिट खिडकीच्या {दालनात} मागे आहे. ते बहुतेक कर्मचारण्यासाठी आहे, मी म्हणतो ते बाहेर स्टेनलेस स्टील चे बनवलेले आहे ते , ते का एवढया वाईट परिस्थितीत? सरकार निधी सढळ असताना आणि ते सुद्धा अगदी मुंबई सारखया शहरातील ठिकाण असताना बर पाण्याला तर कमतरता नसणार ( मी मुद्डमून बघायला गेलो कारण अश्या शौचालयांचे बांधकाम / त्याची रचना करण्याच्या व्यवसायात मी दोन वेळेस काम केले आहे त्यामुळे जास्त कुतूहल होते ) बोर्ड वॉक - हे मुद्दामहून जाणीवपूर्वक बांबू बांधून केले आहे क्षमा करा पण असे बोर्ड वॉक मी रोज डिझाईन करितो ते अश्या तकलादू पद्धतीने बनवण्याचे काहीही कारण नसते , बाम्बू वापराणे यात काही गैर नाही / उत्तम दर्जाचे ठराविक पद्धतीने पोसलेले लाकूड + ना गंजणारे नट बोल्ट आणि एकडच पुरलेले फुटिंग वापरून परिसराची हानी कमीतकमी होणारे बोर्ड वॉक ची रचना करता येतेय त्या बोर्ड वॉक वर वयोवृद्धाला पण चालत आले पाहिजे .. एवढेच काय व्हील चेअर पण चालली पाहिजे... तेवढी जागरूकता " परवडणार" नाही असे धरून चालू पण काय ते डिझाईन आणि काय ती अवस्था ... केवडः धोका! वापरात येणार नसले तर कशाला सरकरने पैसा घातला... कोणीतरी कोणाला तरी गंडवलाय जेट्टी मधील वापरलेलं काँक्रीट / स्टील याची पण काय अवस्था .... वाईट याचे वाटत कि कल्पना आणि उपक्रम उत्तम असून त्याची मूळ रचना करताना पुरेशी खबरदारी ना घेणे आणि नंतर ची देखभाल ना नीट करणे ... म्हणूनच आम जनतेचाच वाया गेलेलं पैसे हा असा ... बर हे सगळे चांगले डिझाईन करायला राज्यात काय तंत्रन्यानची कमतरता आहे का? बर यात कोणत्यातरी परदेशी संस्थकडून पण पैसे आला होता अहो मुख इमारतीवर जे स्टील चे पक्षी / मासे / मोटिफ असलेले पत्रे आहेत ते तरी हॉट डीप गॅल्वनाइज्ड करायचे ?

कर्नलतपस्वी 01/03/2023 - 19:43
हा नुसताच विरंगुळा नाही तर त्याच्याबद्दल माहीती गोळा करत असताना कितीतरी विविध प्रकारची माहीती मिळते व ज्ञानवर्धन सुद्धा होते माॅर्निग वाॅक मधे मी माहीती व फोटो गोळा करतो. नुकतीच तारर्कर्ली भटकंती झाली. सामान्यतः समुद्र किनारी विविध पक्षी दिसतात पण इथे फक्त आणी फक्त कावळे,बगळे आणी घारी दिसल्या. कारण शोधत असताना कळाले इथे दिवस रात्र रापण चालू असते व यांना भरपुर मासे खायला मिळतात. दिवस भरात छोट्या पक्षांची शिकार करतात. लेख आवडला.

कंजूस 02/03/2023 - 04:58
१) Birds of Mumbai - Sanjoy Monga ISBN 8175083913 ISBN 9788175083912 हे छोटे खिशात राहणारे पुस्तक जवळ बाळगता येईल. नावात मुंबई असले तरी पालघर ते मुरूड आणि इगतपूरी ते लोणावळा भागात आढळणारे पक्षी मुख्य विशेष वर्णन चित्रांसह आहेत. अमेझोनवरची किंमत १०००रु दिली असली तरी रस्त्यावर शंभर रुपयांत मिळते. २)The book of Indian Birds -Salim Ali ISBN 0195665236 हे जाडजुड संदर्भ ग्रंथ आहे. भारत, पाकिस्तान,मायनामार,श्रीलंका ,नेपाळ या भागातले पक्षी,वर्णन,चित्रं ( फोटो नव्हे)आहेत. दुकानात ४५० ते ५००रु ला मिळते. ही दोन पुस्तकं कामाची. अजून दोन ३)Birds of the Indian Subcontinent - Grimmett and Inskipp. ISBN 1408127636, 9781408127636 हे पण चांगले आहे. [ क्रमांक २ आणि ३ पुस्तके बघून घ्यावीत. काही प्रतींमध्ये चित्रांचे रंग,छपाई धुरकट अस्पष्ट असते.] ४) Birds of Maharashtra - Dr.Pande,Deshpande,Sant. 568 photos. हेसुद्धा पाहायला चांगले.

गोरगावलेकर 02/03/2023 - 16:11
सोन्याचा फ्लेमिंगो बनवून दान करण्यापेक्षा खालील फोटोवर समाधान मानता आले तर बघा म्हणावं टर्मिनेटर भाऊंना ठिकाण: सी वूड, नवी मुंबई

In reply to by गोरगावलेकर

टर्मीनेटर 02/03/2023 - 16:24
वाह, सुंदर आहे फोटो 👍 हा फोटो बघून माझे समाधान नक्कीच झाले आहे पण कंजूस काकांनी केलेल्या अपराधाचे प्रायश्चित्त म्हणून त्यांना सोन्याचा फ्लेमिंगो बनवून तो दान करावाच लागेल... चुकीला माफी नाही 😂 😂 😂
विल्स नेव्ही कट या सिगरेटच्या जाहिरातीमध्ये फ्लेमिंगो पक्षाची स्लो मोशन मधली दृश्य वापरली होती. विमानासारखेच हवेत अदबशीर झेप घेणं आणि सावकाश पाय मागे दुमडून घेणं तसेच पाण्यावर उतरतांना पंखांनी वेग कमी करणं आणि अलगद पाय लांब करून उतरणं असं पाहिल्याचं आठवतंय. पुढे एकूणच धूम्रपानाच्या विरुद्धची चळवळ सुरु झाली आणि जाहिरातीच्या माध्यमातून उच्च्भ्रू जीवन पद्धती म्हणजे धूम्रपान अशा प्रकारच्या जाहिराती बंद झाल्या. सहज आठवले म्हणून हे लिहिले.
400/600 mm zoom आणि कॅनन/निकॉन कॅम्राचे फोटो, ड्रोनचे शूटींग पाहिल्यावर मी तिकडे जाऊन खिशातून मोबाईल बाहेर काढलासुद्धा नाही. लिंक पुलावरून मी पाच किमी भांडूप पंपिंग स्टॉपला चालतही आलो. पुलावरून खालीही खूप फ्लेमिंगो बसलेले दिसत होते. म्हणजे ड्रोनही नको. पण गोरगावलेकरांनी छान फोटो दिलाय. अजून दोन महिने आहेत तर कुणाला जायचे झाल्यास संधी सोडू नये.

प्रचेतस 02/03/2023 - 21:05
एकदम मस्त. तपशीलवार वर्णन आणि नकाशांमुळे मजा आली. रोहित पक्षांचा फोटो मात्र हवाच होता. इथे उजनी धरणावर हल्ली कमी आलेत असे ऐकलं, पाणी अजूनही बऱ्यापैकी असल्याने संख्या कमी असावी.

हेमंतकुमार 03/03/2023 - 16:07
लेख आवडला!

चौथा कोनाडा 10/03/2023 - 12:35
सुंदर लेख आणि त्या सोबत डिट्टेल माहिती भारीच .. फ्लेमिंगो निरिक्षक नसलो तरी नुस्तं हिंडायला पण जावे असं वाटायला लावणारी माहिती ! धन्यू कंजूसजी !
मी भिगवण येथे साध्या मोबाईल वर काढलेले व्हिडिओज भिगवण, सैबेरियन फ्लेमींगोज येतांना https://youtu.be/I_Hz14AZYUg फ्लेमींगोज रॅम्प वाॅक https://youtu.be/mqkhLGOGm_o

In reply to by बाजीगर

कंजूस 25/03/2023 - 05:41
मोबाईलच्या फोटोंना मर्यादा आहेत. टेलिफोटो लेन्स त्यात जेमतेम असतं. (डीएसएलारचे ४००-६००एमेम लेन्स कुठे आणि मोबाईलचे छोटे १००एमेम कुठे) ऐरोली केंद्र,शिवडी येथे कसं केव्हा जावं याबद्दल पाल्हाळ आहे. यूट्यूबवर काय एकापेक्षा एक सरस देखावे आहेत. पण ऐरोली मध्ये फक्त डोळ्यांनी ही शंभर फुटांवर चे पक्षी पाहता येतात. बाकी आपापली आवड.

In reply to by कंजूस

बाजीगर 25/03/2023 - 08:53
पाल्लाळ म्हणालो तरी आपण घेतलेले श्रम, उर्जा व वेळ याबद्दल आदर व कौतुक आहेच. पक्षीनिरीक्षकांसाछी नक्कीच उपयौगी असणार.

In reply to by बाजीगर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 26/03/2023 - 09:16
पहिल्या यूट्यूबमधील चित्रात रांगेत उडणा-या पक्षांना आम्ही करकोचे म्हणायचो. आत्ता कळले ते ते फ्लेमिंगोज आहेत म्हणून. धन्स. -दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 26/03/2023 - 09:10
मस्त धागा. फोटो वर्णनही झकास. आता एरोलीत जाणे आले. घनसोलीत येत असतो. -दिलीप बिरुटे

कंजूस 18/01/2024 - 15:49
धागा वर काढतो आहे. सीवुडस दारावे स्टेशन नवी मुंबईचा उल्लेख आला असल्याने दोन दिवस (१७,१८ जानेवारी २०२४) तिकडच्या भागात भटकून आलो. पार निराश झालो. कारण खाड्यांच्या कडेला जाता येत नाही. कारावे गाव, टी.एस.चाणक्य, डी.पी.स्कूल, एनआरआई वसाहत इकडचे पाणी अडवून ठेवले आहे. (नकाशातही यांचा उल्लेख Lakes असा आहे.)रोजची भरती ओहोटी इकडे येऊ शकत नाही. तो खाडीचा प्राण आहे. भरतीचे पाणी आत घेऊन दार लावून बंद करतात. त्या साचलेल्या पाण्यात मासे पकडतात. मग फ्लेमिंगो येणार कसे? टी.एस.चाणक्यच्या आतून जेट्टीकडे जाता येत नाही . पण हायवे खालून एक जायला सबवे ठेवला आहे त्या जवळ एका ठिकाणी खाडी सापडली. मोठे काळे पांढरे फ्लेमिंगो अगदी जवळून दिसले. हे कच्छमधून येत नाहीत आणि गुलाबी होत नाहीत. त्यांना स्थानिक लोक बगळे म्हणतात. गुलाबी अजून आलेले नाहीत. तुरळक एक दोन दिसलेले. ऐरोलीला जसे खाडीपर्यंत जाता येते तशा काही गुप्त जागा सीवुडस दारावे येथे आहेत काय?

कंजूस 19/01/2024 - 18:23
सीवुडस भागातील फेरफटका आणि फोटो. लहान मोबाईलमधून झूम केले आहेत. एकूण कल्पना यावी. मोठे पक्षी इथे आहेत. ( १७-१८ जानेवारी २०२४) फोटो SW १
. मागे टी एस चाणक्य


फोटो SW २
.


फोटो SW ३
.


फोटो SW ४
.


गोरगावलेकर 25/01/2024 - 15:14
आजच सी वूड ला फ्लेमिंगो पहिले. महानगर पालिकेच्या इमारतीसमोर पाम बीच रोड ओलांडून पोलीस चौकी आहे. येथूनच पाम बीच रोडला समांतर सर्व्हिस रोड आहे. त्यावरून खाडीत हे पक्षी दिसतात. यावर्षी पक्षी खूप उशिरा दाखल झाले आहेत व अजून तरी आकाराने लहान वाटतात. टेहळणीसाठी मनोरे देखील आहेत.     वेळ असल्यास पोलीस चौकीच्या मागे टेकडीवर काही ठिकाणे आहेत ती बघावीत. बेलापूर किल्ला          गोवर्धनी माता मंदिर    साती आसरा माता देवस्थान आहे. छोटेसे पण सुंदर मंदिर.

कंजूस 25/01/2024 - 16:45
धन्यवाद. सविस्तर माहिती आणि फोटों दिल्याने खूप उपयोग होणार आहे. मी अजून या बेलापूर भागात गेलो नाही. तसेच टी.एस.चाणक्यची जेटी पाहिली नाही. दारावे येथे खूप जागा आहेत. मागच्या आठवड्यात रविवारी शिवडी येथे गेलो. पण काम झाले नाही. शिवडी ते नवा शेवा पूल चालू झाला १२ जानेवारीला परंतू खालचे उरलेले लोखंड, सिमेंट उचलले नाही. ते काम चालू असल्याने जेटी बंद आहे. बाजूचा शिवडी किल्ला पाहायला गेलो तर तिकडेही डागडुजी चालू होती. प्रवेश बंद. मे महिन्यापर्यंत काम चालेल असं कळलं. मग तिथून किंग्ज सर्कल स्टेशनला जाऊन माटुंगा स्टेशनसमोरच राम आश्रय हॉटेलात मसाला डोसा, वडे खाल्ले. तिथून परत. रविवारी हार्बर लाईनवर मेगा ब्लॉक आहे/नाही पाहून जावे. कुर्ला ते वाशी मार्ग बंद होता पण कुर्ला ते सीएसटी (हार्बर) सुरळीत होतील. त्यामुळे गर्दी नव्हती. भांडुप पंपिंग स्टेशन परिसरात परवा गेलो होतो. नाहूर रेल्वे स्टेशनहून ऐरोली पुलापर्यंत जाऊन उलट दिशेने म्हणजे विक्रोळीच्या दिशेने चालल्यावर डावीकडे एक साधा रस्ता जातो. तिथे एक बारीकशी पाटी दिसेल. पुढे ढेकळांच्या रस्त्याने गेल्यावर 'ठाणे खाडी फ्लेमिंगो केंद्र, भांडुप खाडी' ही टपरी दिसेल. हे अंतर तीन किमी आहे. पन्नास रुपयांचे तिकीट फाडून आणखी दोन किमी चालल्यावर आपण जेट्टीपर्यंत जातो. तिकडे तलाव आहेत, पण थेट खाडीवर जाता येत नाही. शिवाय पंपिंग स्टेशन मधून जे सांडपाणी सोडतात त्याची दुर्गंधी अतिशय आहे. तर एकूण या जागेवर जाऊन नये.

गोरगावलेकर 04/02/2024 - 19:19
परवा सकाळी सकाळी तास दीड तास सी वूड खाडीच्या बाजूने असणाऱ्या कांदळवनात पायी फेरफटका मारला. पोपट, कोकीळ दिसले. इतर पक्षांची किलबिलही ऐकू येत होती. पण मुख्य आकर्षण होते खाडीच्या कडेकडेने दिसणारे फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्षी. पक्षी संख्येने कमी असले तरी जवळून पाहता आले. अजूनही पक्षी आकाराने लहान दिसतात व रंगही गुलाबी दिसत नाही. कॅरोटीनॉइड रंगद्रव्ये असलेले शेवाळ खाल्याने गुलाबी रंग येतो असे वाचले आहे. त्यामुळे अजून त्यांचे पोषण पूर्ण झाले नाही असे वाटते. काही दिवसांनी परत फेरफटका मारावा लागेल. काही फोटो जोडत आहे.

In reply to by गोरगावलेकर

कंजूस 04/02/2024 - 20:01
फोटो छान आहेत. सीवुडसच्या सर्व जागा पाहिल्या ते साठवलेले पाणी आहे. थेट खाडी नाही. टी.एस . चाणक्यच्याकडे जो रस्ता नागदेवी स्ट्रीट पाम बीच ओलांडून (सिग्नल वाला) जातो तिथूनच पुढे खाडीकडे जाणारा पूल होता. आता तिकडे जाऊ देत नाहीत.