Skip to main content

शेवटचा तास (भाषांतर)

लेखक स्मिताके यांनी सोमवार, 27/03/2023 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटचा तास मूळ फ्रेंच कथा : The Last Lesson By Alphonse Daudet (१८७३) , English Translation By Francis J. Reynolds Alphonse Daudet (१८४०-१८९७) हे कवी, कथाकार, कादंबरीकार होते. फ्रँको प्रशियन युद्धात (१८७०-७१ ) त्यांना सक्तीने भाग घ्यावा लागला. त्यांच्या लिखाणात युद्धकाळातले दारुण अनुभव आढळतात. या युद्धात फ्रान्सचा पराभव होऊन जर्मन साम्राज्याची स्थापना झाली. आल्सेस आणि लॉरेन हे प्रांत जर्मनीच्या ताब्यात गेले. ---------------- झालाच उशीर! आता हॅमेल सर ओरडणार. त्यात आणखी आज ते व्याकरणाची परीक्षा घेणार आहेत. कसली, तर म्हणे कृदन्त! हे काय असतं? मला तर एक शब्दही ठाऊक नाही त्यातला.

भारतीय विचार - मांडुक्य उपनिषद

लेखक अभिजीत यांनी रविवार, 26/03/2023 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
मांडुक्य उपनिषद हे उपनिषद, मनुष्य रोजचे आयुष्य जगत असताना मनुष्याचे स्वरूप सच्चिदानंद आत्मा म्हणजे ब्रह्मरूप आहे आणि ते मनुष्याने स्वत: कसे जाणावे हे समजावून सांगते. उपनिषदांनी ब्रह्म जाणण्यासाठी विविध प्रक्रिया शिकवल्या आहेत. मांदुक्य उपनिषद जी प्रक्रिया शिकवते तिला ‘अवस्थात्रय’ म्हणता येईल. मानवी आयुष्याचे सर्व अनुभव, जागेपणा, स्वप्नावस्था आणि स्वप्नरहित असलेली गाढ झोप या तीन अवस्थांमध्ये असतात हे सर्वांनाच माहीत असते. आपण याचा रोजच अनुभव घेतो. आपण जागेपणी या व्यावहारिक जगाचा अनुभव घेतो. स्वप्नावस्थेत आपले मन विविध कल्पना निर्माण करते आणि आपल्याला जगाचा अनुभव येतो.

चर्चबेल –लेखक ग्रेस (ऐसी अक्षरे... मेळवीन ९)

लेखक Bhakti यांनी रविवार, 26/03/2023 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
चर्चबेल –लेखक ग्रेस (लघुलेखसंग्रह) a शब्दयात्री असल्याने शब्द कधी अलगद कुशीत येतात तर कधी दूर दूर वाळवांटामध्ये तप्त होत असतात.अलगद कुशीत येण्याचे दोर म्हणजे ग्रेस यांच्या कविता रसग्रहण! सांजवेळा,थरथरती कातर संध्याकाळ,सूर्याच्या सांज रंगवेली,पापणीचा ओलसर वाळवंट,ह्रुदयाचा आर्त कावळा,मधेच ज्ञानेश्वर यांचा लख्ख प्रकाश ,पाउसाच्या थेंबओळी,गर्द झाडी- सूर्याचे किरणांचे खेळ,झाडांच्या पानांच्या –पक्ष्यांच्या गळाभेटी,माणसाच्या आत्म्याच्या संवेदना, अनुभूतीची हाक आणि आणखिन व्यापक सर्व लाभत राहते ग्रेस

चित्रपट समीक्षा -- The Man from Earth (2007)

लेखक श्रीगणेशा यांनी रविवार, 26/03/2023 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मिपावरीलच एका धाग्यात "The Man from Earth" या चित्रपटाबद्दल वाचलं. मिपाकरांना आवडला, म्हणजे चित्रपट चांगला असणारच, याची खात्री होती. पण हल्ली सवयीप्रमाणे, चित्रपट पाहताना अपेक्षा तशा बाजूलाच ठेवलेल्या असतात. उगीच नंतर वेळ वाया गेल्याची खंत राहत नाही.

अगा जे घडिलेचि नाही

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 25/03/2023 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
एके दिवशी- दुसर्‍या प्रहरी- नेत्र उघडता तिसरा मितीत चवथ्या- झालो दाखल -(खतरा होता जबरा) पाचावरती धारण बसली - षट्चक्रे लडखडली सप्तरंग मिसळले वर्णपटी- श्वेतप्रभा लखलखली अष्टसिद्धी नवविधा भक्तिच्या चरणी शरण जव गेल्या अनाहताच्या अनुनादाने - दाही दिशा दुमदुमल्या

गोदातीरीची ऐतिहासिक भेट.

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शनिवार, 25/03/2023 13:53 या दिवशी प्रकाशित केले.

आज सकाळी कधी नव्हे ते, बॅडमिंटन खेळायला गेलो. पूर्वीसारखे आता नियमित खेळणे होत नाही. नेटजवळील सेटल घ्यायला जी लवचिकता आणि चपळता लागते ती आता वयांपरत्वे कमी व्हायला लागलीय. पण, मित्रांसाठी भेटीगाठी होतात म्हणून अधून-मधून बॅडमिंटन कोर्टवर जात असतो.

कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ९

लेखक टर्मीनेटर यांनी शुक्रवार, 24/03/2023 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ९ आधीचा भाग: कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ८ "आजची ही आमची गोव्यातली शेवटची रात्र होती, उद्या सकाळी पणजीत थोडीफार निरुद्देश भटकंती आणि 'रिस मागोस' किल्ला पाहून पुढे कुडाळला जाण्याचा कार्यक्रम ठरवला होता त्यामुळे सकाळी लवकर उठण्याची घाई नव्हती पण आज दिवसभरात केलेल्या किल्लेदर्शनाने थोडे दमायला झाल्याने झोप यायला लागली होती म्हणून फारवेळ टाईमपास न करता अकराच्या आसपास झोपी गेलो..." आजच्या दिवसात विशेष काही भटकंती करायची नसल्याने सकाळी चांगली दहा -सव्वा दहा पर्यंत झोप काढल्यावर चह

पांडूबाबा.

लेखक Deepak Pawar यांनी गुरुवार, 23/03/2023 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
पांडूबाबा आमच्या वाडीतील सगळ्यात जुना माणूस. जुना म्हणजे इतका जुना कि त्याच्यासमोरची लहान लहान मुलं आता म्हातारी झालेली. हाता-पायाची कातडी लोंबू लागलेली, दातांनी तोंडाचा केव्हांच निरोप घेतलेला. त्यामुळे गालाला जिथे खळी पडते, तिथं खड्डा पडलेला. भाकर खाताना सुद्धा त्याला डाळीत कुसकरून खावी लागायची. एकदा मी सहज त्याला विचारलं," बाबा, तुझं वय किती?" माझा प्रश्न ऐकून तो जरा विचारात पडल्यासारखा दिसला.

टोमॅटो -मुळा-बीट सूप

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 23/03/2023 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी कार्ब बंद नको वाटतात तेव्हा सूप या प्रांताकडे वळाले.