भारताबाहेरचा भारत -अंदमान १
नमस्कार मंडळी
गेले १.५-२ वर्षे घरात बसून पकलो असल्याने एखादी मोठी सहल करायचा मोह होत होता. आणि समुद्र हा नेहमीच आवडीचा विषय असल्याने बहुधा ३-४ दिवस कुठेतरी समुद्राकाठीच जायचे डोक्यात घोळत होते. त्यामुळे सुरुवात अलिबाग पासून होऊन, कोकण,गोवा,कोस्टल कर्नाटक करत करत चर्चा अंदमानला जाऊन पोचली. मालदिव्ह्स आणि सेशेल्स ५.५ ते ६ रुपयाला पडत होते आणि श्रीलंका ५० पैसे असले तरी आधीच झाले होते. शिवाय आत्ता तिथे परिस्थिती वाईट आहे.अंदमान भारतातच असल्याने करन्सी रेशो बघायची गरज नव्हती. दुसरे म्हणजे जालावर शोध घेतला असता चेन्नई आणि कोलकाताहून तिकडे थेट विमानसेवा उपलब्ध होती .
मिसळपाव