Skip to main content

३००० वर्षांचा विरह

लेखक साहना यांनी मंगळवार, 13/06/2023 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
ऍमेझॉन वर हा चित्रपट आहे. जिन्न हा विषय आम्हाला बहुतेक करून अल्लाउद्दीन च्या दिव्यामुळे ठाऊक आहे पण जिन्न हि संकल्पना इस्लाम मधील खूप लोकप्रिय संकल्पना आहे. इस्लामच्या अनुसार जिन्न हे दुसर्या जगांतील जीव आहेत आणि मानवा प्रमाणेच ते सुद्धा अल्लाह चे अनुसरण करणारे किंवा काफिर असू शकतात. जिन्न मानवाला दिसत नाहीत पण मानवीय जीवनात कधी कधी त्यांचा हस्तक्षेप होऊ शकतो. इस्लाम मधील बहुतेक संकल्पना ह्या इस्लाम पूर्व गोष्टीचे rehashing आहेत त्याच प्रमाणे जिन्न सुद्धा इस्लाम पूर्व आहे पण इस्लाम जगभर पसरला म्हणून ती सुद्धा पसरली आणि इंग्रजीत त्याला लोक जिनी ह्या नावाने ओळखू लागले.

चक्रीवादळ

लेखक बाजीगर यांनी मंगळवार, 13/06/2023 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
'बिपोरजाॅय' आशी, ठेवा लक्ष आमे तैयार छे, गुजरात दक्ष पाकीस्तानातून भारतात, बेकायदेशीर! नाही विजा, आहे ना सोबत गडगडाट, तेजाळ लखलखाट विजा!! कडेकडेनेच निघून जा, हा विनंती अर्ज पीकपाणी नुकसान नको फिटलं नाही कर्ज. करु नको विस्थापीत, नको उडवू घराचे पत्रे, हवामान महासंचालक, कशी वाचवावी लक्तरे?

रिमोट..

लेखक आजी यांनी सोमवार, 12/06/2023 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
आधुनिक जगाचा कळीचा शब्द म्हणजे रिमोट. तो अनंत,अगाध, सर्वसमावेशक शब्द आहे. तो सर्व जग व्यापून दशांगुळे उरलेला शब्द आहे. घरीदारी रिमोट हवाच. लहान मुलांच्या खेळण्यात रिमोट हवा. तिथपासून ते प्रत्यक्षातले यान उडविण्यासाठीही रिमोट हवा. मोठमोठे नेते अनेक प्रकल्पांचं उद्घाटन प्रत्यक्ष तिथं न जाता रिमोटनं करतात. अगदी ग्रामपंचायती ते अख्ख्या देशाचा रिमोट कुणाच्या तरी हातात असतो. (महिला सरपंचबाईंचा रिमोट त्यांच्या नवऱ्याच्या हातात असतो.) आघाडी म्हणू नका,दल म्हणू नका, युति, गठबंधन, ब्रिगेड,सेना, काही म्हणू नका. प्रत्येकाला एक रिमोट असतो आणि तो भलत्याच कुणा माणसाच्या हातात असतो.

जिल्हे-ईलाही

लेखक बाजीगर यांनी रविवार, 11/06/2023 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
बोलाचा भात बोलाची कढी पोरीला दिली कल्पनेतली गढी खात्यात पैसे नसता दिला blank cheque भरा पोट खाऊन फोटोतला केक तू घे पंजाब, महाराष्ट्र हरीयाणा आणि युवा साडेतीन जिल्हे-ईलाही !! खेळतोय कसा जूवा ।

रौद्रगर्भा वसुंधरा भाग २ : आपल्या पृथ्वीचा पृष्ठभाग (सुधारित)

लेखक शेखरमोघे यांनी रविवार, 11/06/2023 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचे संबंधित लिखाण रौद्रगर्भा वसुंधरा भाग १ : https://www.misalpav.com/node/51286 (मी १९८३ साली प्रथम जपानमध्ये ज्वालामुखी पाहिला. त्यानंतर इंडोनेशिया आणि न्यूझीलंड या अनेक ज्वालामुखी असलेल्या दोन्ही देशांतील बरेच तसेच अमेरिकेतील काही ज्वालामुखी -कांही कधीही उद्रेक पावतील असे वाटणारे, कांही नुसतेच धुमसणारे, काही सुप्त, काही मृत, काही तरुण, काही वृद्ध - पाहिले.

एक मुलायम स्पर्शक (२)

लेखक हेमंतकुमार यांनी रविवार, 11/06/2023 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वार्ध इथे. …………………………………………..

उत्तरार्ध

पहिल्या रंजनप्रधान भागात आपण निरोधची इतिहासकालीन संकल्पना, त्याचा शोध आणि शास्त्रशुद्ध विकास या गोष्टींचा विचार केला. या भागात आपण त्याच्या खालील शास्त्रीय पैलूंचा विचार करणार आहोत: १. गर्भनिरोधनातील यशापयश २. गुप्तरोगांपासून संरक्षण ३. वापराचे दुष्परिणाम/ समस्या ४.

बेलफळाचे सरबत

लेखक Bhakti यांनी रविवार, 11/06/2023 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
Q बेलफळ पहिल्यांदाच पाहिलं.मोठ्या शहरात ते उन्हाळ्यात विकतही सहज मिळते.मला मात्र झाडाचा शोध लागला म्हणून मिळाल. तर सध्या एकच बरं म्हणून एकच आणलं.टणक बाहेरच्या हिरवट केशरी रंगाच्या आवरणाला जरा चिर होती.जरा सुगंध घ्यावा वाटला.अहा,काय तो परिमळ!घरी पोहचेपर्यंत सगळ्या रस्त्याने तो मधुर गंध मनभर भरून घेत राहिले. फळं तसच ठेवलं.निवांत सरबत ,जेली करेन असं ठरवलं.आज दुपारी त्याची आठवण आली.पुन्हा गंध घेतला,बत्त्याने टणक आवरण दोन भागात फोडले.आत मध्यम पिकलेला पिव

भलत्या वेळी, भलत्या जागी. --२

लेखक भागो यांनी शनिवार, 10/06/2023 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या आधीचे दोन पेशंट तिथे बसले होते. टेबलावर पेपरांची चळत पडली होती. एक जण ‘प्रभात’ वाचत होता. त्याने प्रभात टाकून सकाळ उचलला. बाबांनी चपळाईने प्रभातवर कब्जा केला. डायरेक्ट चौथ्या पानावरच्या काडीमोडच्या नोटीसा वाचायला सुरवात केली. “आमच्या अशिलाने तुला एकूण चौदा पत्रे लिहिली. तू जी लग्नाच्या आठव्या दिवशी माहेरास निघून गेलीस ती आजतागायत नांदायला परत आली नाहीस. त्यामुळे आमच्या अशिलास लग्नाचा हक्क बजावता...” घटस्फोटाच्या नोटीसा वाचून झाल्यावर बाबांनी जमीन खरेदी, साठेखत, खरेदीखत, जमिनीच्या चतुःसीमा, कब्जा ह्यांच्या नोटीसा आदिकडे मोर्चा वळवला.

भलत्या वेळी, भलत्या जागी.

लेखक भागो यांनी शनिवार, 10/06/2023 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
१९६०. बाबांची बदली तालुक्याच्या गावाहून शहरात झाली होती. माझी चौथी पाचवी तालुक्याला झाली होती. शहरात जायचे म्हणून आई आणि माझा मोठा भाऊ खुश होते. बाबा रेवेन्यू खात्यात असल्यामुळे तालुक्यात त्यांचा वट होता. मी भाउसाहेबाचा पोरगा म्हणून नाही म्हटले तरी माझीही चलती होती. मोठा भाऊ माझी खूप काळजी घेत असे. “बबड्या, तुझी मला काळजी वाटते रे.” लांब चेहरा करून दादा म्हणाला. “का? काय झाले?” मी घाबरलो. “काय नाय. जाउंदे. काही सांगून उपयोग नाही. मी तरी तुझी किती काळजी घेणार?” दादाने निराशेचा सूर लावला. मी खूप विचारले, जंग जंग पछाडले.