
बेलफळ पहिल्यांदाच पाहिलं.मोठ्या शहरात ते उन्हाळ्यात विकतही सहज मिळते.मला मात्र झाडाचा शोध लागला म्हणून मिळाल.
तर सध्या एकच बरं म्हणून एकच आणलं.टणक बाहेरच्या हिरवट केशरी रंगाच्या आवरणाला जरा चिर होती.जरा सुगंध घ्यावा वाटला.अहा,काय तो परिमळ!घरी पोहचेपर्यंत सगळ्या रस्त्याने तो मधुर गंध मनभर भरून घेत राहिले.
फळं तसच ठेवलं.निवांत सरबत ,जेली करेन असं ठरवलं.आज दुपारी त्याची आठवण आली.पुन्हा गंध घेतला,बत्त्याने टणक आवरण दोन भागात फोडले.आत मध्यम पिकलेला पिवळसर गर होता.कौट फळासारखाच बिया,शिराधागे होते.जरा चिकट होता.गर चमच्याने काढला.थोडासाच गर मिक्सरमधून फिरवला.गाळून घेतला,भलताच तुरट लागला.साखर वापरायची नव्हती.तेव्हा यु-ट्युबकडे जावेच लागले.तेव्हा योग्य पाककृती समजली.
कृती-बेलफळाचा गर अर्धे पाण्याने भरलेल्या पातेल्यात चमच्याने कुस्करून घ्यावा.बिया फुटू देऊ नये.तुरटपणाला त्याच जबाबदार असतात म्हणूनच मिक्सरमधून बियासह गर फिरवू नये.
तर तो गर पाण्यात अर्धा -एक तास ठेवावा.नंतर गाळून घ्यावा.शक्यतो इथे पण साखर लागतेच.आवडीनुसार साखर ,पूदिना पानं,सैंधव मीठ घालावे.बर्फ आणि आणखीन गार पाणी घालावे.सुंदर रंगाचे बेलफळ सरबत तय्यार!चवही एकदम रिफ्रेशिंग आहे.

बेलफळ सरबत उपयोग -बेलफळात व्हिटामिन C मुबलक आहे.अनेक पोटाच्या विकारावर औषधाप्रमाणे,अन्टीबक्टेरियल असा गुणधर्म यांचा आहे.(माहिती -गुगल)
माझ्या मिक्सरमधून वाटून एकत्र केलेल्या गरात पाणी, बर्फ,साखर टाकून निवांत उन्हाळ्यात अखेर अखेरच्या दुपारी याचा आस्वाद घेतला.आणि पुन्हा एक पारंपारिक पाककृती करण्याचे समाधान मिळवलं
-भक्ती
मी पयला!!
छान.
छान !
In reply to छान ! by धर्मराजमुटके
मिपा सदस्य नसल्यामुळे कशाला
In reply to छान ! by धर्मराजमुटके
कवट हाणि बेलफळ हे दोन
In reply to कवट हाणि बेलफळ हे दोन by विजुभाऊ
साफ चूक
आजकाल....
आकर्षक चित्र, माहिती आणि
In reply to आकर्षक चित्र, माहिती आणि by शेखरमोघे
"
बादवे
वाह !धन्यवाद मंडळींनो.
बेलफळ,कवठ दोन्ही वेगळी आहेत.
बेलफळाचं सरबत ना कधी ऐकलं ना
In reply to बेलफळाचं सरबत ना कधी ऐकलं ना by प्रचेतस
होय मध वापरल होतं तरी साखरही
वाह ! बेलफ़ळाच्या रस्ता वोडका
In reply to वाह ! बेलफ़ळाच्या रस्ता वोडका by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रसात.
In reply to वाह ! बेलफ़ळाच्या रस्ता वोडका by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वोडका? :) :)
बेलफळ सरबत अत्युत्तम असते
In reply to बेलफळ सरबत अत्युत्तम असते by इपित्तर इतिहासकार
असेच वाटले.
In reply to बेलफळ सरबत अत्युत्तम असते by इपित्तर इतिहासकार
बहुतेक चुकीचे नाही.फोटो
In reply to बहुतेक चुकीचे नाही.फोटो by Bhakti
ओके!
In reply to बहुतेक चुकीचे नाही.फोटो by Bhakti
या फोटोत दिसते आहे ते कवठ आहे
इथे असे लेख कायमचे राहातील.
In reply to इथे असे लेख कायमचे राहातील. by कंजूस
तुमच्या भागात गोंदण्याची झाडं
Madhuka indica ( moha) is also member of sapotaceae( chickoo family ). Moha flowers have very peculiar aroma, are fleshy and very delicious. I have tried fruits also. But Bakul is more tasty.. Khirani( Manilkara hexabdra)is another member of the family with edible fruits. My mother tried all those fruits in Motibag of Kanhur pathar. Now there is no bakul no khirani. Another fruit tree she remembered that is gondan( Cordia dichotoma) . Cordia myxa ( Bhokar) is near my house on Kamothe.In reply to इथे असे लेख कायमचे राहातील. by कंजूस
@कंजूस काका
In reply to @कंजूस काका by Bhakti
छान.
पॅशन फ्रूट सारखा दिसतोय
In reply to पॅशन फ्रूट सारखा दिसतोय by तुषार काळभोर
नाय
In reply to नाय by इपित्तर इतिहासकार
बेलफळ https://en.wikipedia
In reply to पॅशन फ्रूट सारखा दिसतोय by तुषार काळभोर
पाषाण फ्रुट सारखे नाही वाटत
In reply to पाषाण फ्रुट सारखे नाही वाटत by चौकस२१२
पाषाण फ्रुट सारखे नाही वाटत
In reply to पाषाण फ्रुट सारखे नाही वाटत by सुरिया
का
उन्हाळ्यात थंडावा देणारी पाकृ
In reply to उन्हाळ्यात थंडावा देणारी पाकृ by गवि
कवठाची चटणी घरी
In reply to कवठाची चटणी घरी by प्रचेतस
पिकलेले कवठ
In reply to उन्हाळ्यात थंडावा देणारी पाकृ by गवि
नाही
बेल फळ आणि पॅशन फ्रूट यांत काहीतरी साम्य आहे.बेल आणि कवठ एकाच घरातले-Rutaceae . पॅशन/कृष्णफळ-Passifloraछान पाककृती
बेलफळाचा सरबत छान लागते!
यशराज आणि टर्मिनेटर दोघांनी
अय्यो अरूणा काकू बेलफळवाल्या !
आज शेफ कुणाल कपूर बेलफळ
बेलफळाच्या धाग्याचा कवठाचा धागा केल्याबद्द्ल क्षमस्व !
वा!