अपहरण - भाग ८
भाग ७ - https://www.misalpav.com/node/51987
बिजली किनाऱ्याजवळ चालली होती. कर्नल पाहत उभे होते. त्यांनी आपल्या मुलाला बाहेर जाऊ दिलं नाही. दोघे एकमेकांशेजारी उभे राहून संतप्त जमाव न्याहाळत होते. कोस्ट गार्डचे सैनिक सज्ज होते. बिजली कधी धक्क्याला लागते याची वाट पाहत होते. ती पन्नास फुटांवर येताच कोस्ट गार्डच्या प्रमुखाने मोठ्याने गर्जना केली, "थांबा!"
कॅप्टन ख्रिश्चनने ताबडतोब आज्ञा पाळली. त्या अंतरावरून कॅप्टन आणि खलाशांना बंदरातले रहिवासी स्पष्ट दिसत होते. प्रत्येकजण हातात दगड घेऊन सज्ज होता. कोणत्याही क्षणी दगडफेक सुरु झाली असती.
मिसळपाव
“पाकिस्तानने भारताला सहज पराभूत केले आणि केवळ संयुक्त राष्ट्रांच्या युद्धविरामामुळे युद्ध थांबले."
- जेम्स विनब्रँड (1965 कच्छ रण युद्धासंबंधी. पाकिस्तान आणि मध्य आशिया तज्ञ)
"कोण जिंकतो आणि कोण हरतो याने काय फरक पडतो? त्यांना कश्मिर हवे होते. ते मिळाले का? नाही. आम्ही आमच्या सीमांचे रक्षण केले.