Skip to main content

माझी अ‍ॅमॅझॉनवर टाकलेली पुस्तके...

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 11/04/2018 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! मी अजून काही पुस्तके अ‍ॅमॅझॉनवर टाकली आहेत त्याच्या लिंक्स खाली देत आहे. या पुस्तकांमधे बर्‍याच जणांनी उत्सुकता दाखवली होती. आता ती घेऊन जरुर वाचावीत. तसेच मराठ्यांची शौर्यगाथा हे पुस्तक मी कमी किंमतीस उपलब्ध केले आहे. १महा-अभियोग : द् ट्रायल मी फ्रॅन्झ काफ्काच्या तीन कथा त्याच्या लिखाणाची ओळख म्हणून येथे टाकल्या होत्या. त्याच्याच एका पुस्तकाचा मी अनुवाद केला आहे. - द् ट्रायल. - महा अभियोग.

गाणे कसे बनते?

लेखक arunjoshi123 यांनी बुधवार, 11/04/2018 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
केवळ पद्यसंवादच करणारा समाज गोष्टींत ऐकला आहे, पण प्रत्यक्ष कधी होता का माहित नाही. जगात सर्व प्राचीन साहित्य मुख्यतः पद्य स्वरुपात कशामुळं असलं पाहिजे? काही वेद (कि वेदांचा काही भाग?) सोडले तर जवळजवळ सारा इतिहासच पद्य आहे असं वाटतं. समाजाला इतकी कवनप्रियता का असावी? छंदबद्धता आवश्यक असणे हा पद्द्यातिरेक होता का? असो. ------------- कविता आणि गाणे यांच्यात मूलभूत फरक काय? कायद्याची भाषा, सरकारची भाषा, मानवी व्यवहार करणारांची भाषा, सामान्य लोकांची भाषा, आपल्या सुहृदांची भाषा आणि आत्मसंवादाची भाषा हे सुलभीकरण पुढे नेत नेत शेवटी गाणे आणि अंततः कविता बनत असावी.

Dead Man's Hand - ७

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 11/04/2018 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
बांद्र्याच्या न्यू गार्डन व्ह्यू सोसायटीचा वॉचमन मिथिलेशकुमार भूमिया सोसायटीच्या गेटशेजारी असलेल्या आपल्या चौकीत बसून मोबाईलवर गाणी ऐकण्यात गुंग झाला होता. अठ्ठावीस वर्षांचा मिथिलेश गेल्या दोन वर्षांपासून ही वॉचमनची नोकरी करत होता. सतत येणार्‍या-जाणार्‍या गाड्यांमुळे आणि सोसायटीच्या इतर कामांमुळे दिवसभर धावपळ होत असली तरी नाईट शिफ्टला तसा आरामच होता, त्यामुळे तो नाईटलाच येणं पसंत करत असे. त्याचा जोडीदार असलेल्या बसंतकुमारलाही ते मान्यं होतं, कारण बसंत हा बालबच्चेवाला होता, त्यामुळे सहसा नाईटला तो नाखूश असायचा. गाण्याचा आवाज चिरत आलेल्या कारच्या कर्कश्श् हॉर्नमुळे मिथिलेशची तंद्री भंगली.

तमाशातील लावणी आणि बैठकीची लावणी

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 11/04/2018 08:35 या दिवशी प्रकाशित केले.
तमाशातील लावणी आणि बैठकीची लावणी तमाशा म्हणजे अनेक गोष्टींची सरमिसळ असते. मात्र गवळणीतल्या मावशीने किंवा नाच्याने केलेले कंबरेखालचे विनोद किंवा सिनेमातली उडती गाणी आणि त्यावरील नृत्य असणारा तमाशा खऱ्या लावणी रसिकांना फारसा भावत नाही. एखादी अर्थपूर्ण आणि अदाकारीपूर्ण लावणी असली तर नक्कीच तो संपूर्ण तमाशा खास दाद मिळवून जातो. त्यामुळे लावणी हा तमाशाचा आत्मा आहे असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे तमाशात लावणी असलीच पाहिजे. पण अनेकदा तमाशामध्ये जी लावणी सादर केली जाते ती केवळ शृंगारिक लावणी असते.

दोसतार-६

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 11/04/2018 06:11 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा : https://misalpav.com/node/42377
या शंकेत हसण्यासारखे काय होते कोण जाणे. घाटे सरांना प्रचंड हसू आले. पोट धरून ते हसत राहिले. सरच हसता आहेत म्हंटल्यावर सगळा वर्ग हसायला लागला. निमीत्तच हवं होतं कायतरी. हे हसू थांबतय न थांबतय तोच दारात महादू शिपाई येवून उभा राहिला.
तो दारात उभा राहिल्याचे कोणाच्याच लक्ष्यात आले नाही. सरांसहीत सगळा वर्गच हसण्यात सामील होता .

का रे अबोला?

लेखक आपला अभिजित यांनी मंगळवार, 10/04/2018 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
रेवा दोन दिवसांपासून थोडी गप्प गप्प आहे, या भावनेनं मधुरा अस्वस्थ झाली होती. वयात येत असलेल्या आपल्या लेकीशी बोलावं, तिचं म्हणणं समजून घ्यावं, असं तिला मनापासून वाटत होतं, पण तिला वेळच मिळत नव्हता. खरंतर लेकीशी लहानपणापासून तिचा उत्तम संवाद होता. अधूनमधून काही ना काही निमित्तानं ती रेवाशी बोलत असे. आता मुलगी जशी मोठी होऊ लागली, तशी तिच्या कल्पना, तिचं वागणंबोलणं, तिची मानसिक, शारीरिक स्थिती याबद्दलही मधुरा खूप जागरूक होती. रेवाला कुठल्याही बाबतीत आपल्याशी बोलायला ऑकवर्ड वाटू नये, उत्तम संवाद राहावा, सगळं मोकळेपणानं बोलता यावं, असं तिला वाटत होतं.

निष्ठा आणि लोणी

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 10/04/2018 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
एका जंगलात त्या जंगलाचा राजा सिंह रहात होता, त्याला काही उंदरांनी सतावून सोडले होते. ते उंदीर तो झोपलेला असताना त्याची आयाळ कुरतडत, त्याला त्रास देत. इतका मोठा सिंह पण उंदरांचा बंदोबस्त करू शकत नसे. म्हणून मग त्याने एक मांजर नोकरीवर ठेवले. मांजर सिंहाला त्रास देणाऱ्या उंदरांना खात असे. त्यामुळे सिंहाची झोपही नीटपणे व्हायला लागली. याबदल्यात सिंह मांजराला रोज दूध देत असे.

उकाड्याची रात्र, भिजलेली दुपार

लेखक हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर यांनी मंगळवार, 10/04/2018 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
उकाड्याची रात्र : एक दोन तुर्की चित्रपटांत आपल्या घराजवळचा माळ दिसेल म्हणून​ काही ऑनलाईन लिस्ट्स चाळतोय. वारा येतोय का हे पहायला सिमेंट-पाईपच्या कोनाड्यात उगवलेल्या पिंपळाकडे नजर जायची. स्ट्रीटलाईट्सचे पिवळट प्रकाश तेव्हढे मंदसे घरा-दारांतून वाहताहेत. खिडकीबाहेर आपली उकाड्याची अस्वस्थता जात नाही आणि बाहेरून एखादी आठवण वाहून येत नाही. दाराबाहेर रिकाम्या कॉरिडॉरला पावलं हवीत.

गाऊट : युरिक अ‍ॅसिडचे ‘खडे’ बोल !

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 10/04/2018 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या शरीराच्या कुठल्याही हालचालींमध्ये विविध सांधे महत्वाची भूमिका बजावतात. सांध्यांमध्ये जे अनेक आजार उद्भवतात त्यांना आपण ‘संधिवात’ (arthritis) या सामान्य नावाने ओळखतो. सांध्यांचा दाह होण्याची अनेक कारणे आहेत आणि त्यानुसार या संधिवाताचे अनेक प्रकार आहेत. त्यातील काहींमध्ये सांध्यांत विशिष्ट प्रकारचे खडे (crystals) जमा होतात आणि त्यामुळे तिथे दाह होतो. या प्रकारातील सर्वात जास्त आढळणारा आजार म्हणजे ‘गाऊट’.