Skip to main content

बातमी!

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 06/05/2018 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
मागे एका साहित्यिक चळवळीतील सदगृहस्थांनी गप्पा कट्टा नावाचा उपक्रम सुरू केला. सुरुवातीला त्याच्या सर्व बातम्या आम्ही सातत्याने देत होतो. एकदा मात्र, एक बातमी लागली नाही. तो अक्षरश: तणतणत आला, आणि भरपूर ज्ञान शिकवू लागला. तुम्ही फालतू बातम्यांना जागा देता, आणि साहित्यिक चळवळीतील या वेगळ्या उपक्रमासाठी तुमच्याकडे जागा नसते वगैरे बोलू लागला, म्हणून मी त्याला, एखादी फालतू बातमी दाखव असे म्हणाल्यावर त्याने पिशवीतून त्याच दिवशीचा अंक काढला व एका बातमीवर बोट आपटू लागला. मी बातमी पाहिली.

योग प्रसारासाठी सायकल यात्रा- परभणी- जालना- औरंगाबाद- बुलढाणा जिल्ह्यामध्ये ६०० किमी सायकलिंग

लेखक मार्गी यांनी रविवार, 06/05/2018 04:18 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना नमस्कार! एक नवीन सोलो सायकल मोहीम करणार आहे. त्यासंदर्भात आपल्याशी बोलेन. गेल्या वर्षी सातारा परिसरात योग- ध्यान हा विषय घेऊन एक छोटी मोहीम केली होती. ह्यावेळी सुद्धा 'योग प्रसारासाठी सायकल यात्रा' अशी एक मोहीम करतो आहे. मध्य महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यामध्ये कार्यरत 'निरामय योग प्रसार व संशोधन संस्था' व त्या संस्थेच्या विस्तारलेल्या कार्यासंदर्भात हा प्रवास असेल. परभणी, जालना, औरंगाबाद व बुलढाणा जिल्ह्यांमध्ये काम करणारे योग कार्यकर्ते व योग शिक्षक ह्यांना ह्या प्रवासात भेटेन. परभणीमध्ये गेल्या चार दशकांपासून निरामय संस्था काम करते आहे.

हवाईदलातील सेवेतील रंजक रेल्वे प्रवास! भाग ४

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 05/05/2018 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
सायरनचे भणभणणारे आवाज येताहेत, ‘जी’ सुट घालून हातात हेलमेट घेऊन वावरणारे पायलट एकदम लढाऊ विमानांच्या दिशेने धावताहेत, पुढच्या काही क्षणात विमाने अवकाशात झेपावतात, गोळ्यांचा वर्षाव, विमानांच्या जीवघेण्या डॉग फाईट्स, अचुक वेध. लाल बटणावर अंगठा, पुढल्या क्षणी विमानाचा पेट. कॉकपिटातून अंगठा वरकरून ‘थम्प्स अप’ खुणेने कामगिरी फत्ते, असे हवाईदलातील विजयी वीराचे चित्रीकरण आपणाला पाहून पाहून हवाईदलातील लोक नेहमी विमानातून संचार करत असावेत असे सामान्यांना वाटणे साहजिक आहे. पण एरव्ही हवाईदलातील कर्मचाऱ्यांच्या नशिबी बहुचक्रवाहनाचाच प्रवास असतो. त्यात अनेक मजा मजा होतात.

पुणे ते लेह (भाग १३ - हेमिस मोनेस्टरी आणि उपशी ते दारचा)

लेखक अभिजीत अवलिया यांनी शनिवार, 05/05/2018 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी ४:३० लाच कारू मध्ये परत पोचलो. इथून हेमिस मोनेस्टरी आहे फक्त ७ किमीवर. ती आजच बघितली तर उद्या सकाळी लवकर निघता येईल असा विचार करून हेमिस कडे निघालो. वाटेत एका लामानी गाडीला लिफ्ट मागितली. लामा म्हणजे बौद्ध धर्मगुरू. एकेकाळी ते हेमिस मोनेस्टरी मध्ये धर्मगुरू होते. पूर्ण लडाख भागात फिरताना जागोजागी आढळणारी एक गोष्ट म्हणजे 'माने'. इथे इतके माने का असावेत ह्याबद्दल त्यांना विचारले. 'पुराने जमाने में लोग ये माने बनाते थे. किसीकी याद में ये बनाने का रिवाज था. ये घर में ख़ुशी, अच्छा भविष्य, सेहत, दौलत लाते है ऐसा माना जाता था. बहुत वक्त लगता था इनको बनाने में. अब समय के साथ सब बदल गया.

मुका मार अनवरत झेलुनी

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 05/05/2018 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
काव्यतडागी जलपर्णीसम प्रतिभा पसरत असते पाहू न शकतो रवी, सकल ते कवीस दावुनी जाते कवी लेखणी सरसावून मग मांडी ठोकुनी बसतो इथे मोडुनी तिथे जोडुनी कविता पाडुनी जातो पामर रसिकांच्या तोंडावर कविता मग आदळते मुका मार अनवरत झेलुनी इथे तिथे हुळहुळते काव्यदेवते- एक विनंती ऐक जरा रसिकांचे काव्यप्रपाती बुडवू नको गे आवर कढ प्रतिभेचे
काव्यरस

मराठी भाषा शिकणाऱ्यांना थेट व्हिडिओ चॅटद्वारे सरावाची सोय

लेखक कौशिक लेले यांनी शनिवार, 05/05/2018 18:17 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मराठी भाषेच्या सेवेत अजून एक उपक्रम. आता मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट ऑनलाईन व्हिडिओ चॅटद्वारे माझ्याशी बोलून मराठी बोलण्याचा सराव आणि शंका निरसन करता येईल. परस्परांच्या सोयीने वेळ ठरवून बोलता येईल. प्रायोगिक तत्त्वावर असल्याने सध्या हा उपक्रम मोफत ठेवत आहे. Practice Marathi through live chat संवादसत्रांची सुरुवात आजपासून झाली. दोन जणांशी बोललो.

कोल्हापुरी भेळ

लेखक श्वेता२४ यांनी शनिवार, 05/05/2018 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
परवा आईने फ्रिज मध्ये ठेवलेली कैरी पाहिली आणि नाळेसाठी घोडा हि म्हण मी प्रत्यक्षात उतरवली. कारण कैरी साठी मी भेळ करायची ठरवली. कैरी या प्रकरणाशी माझ फारसं कधी जमलं नाही. पण ती जेव्हा ओल्या भेळेसोबत मिळणाऱया उकडलेल्या मिरच्याच्या बाजूला जाऊन बसे तेव्हा तिची दृष्टच काढविशी वाटायची. रंकाळ्यावर मिळणारी कागदाच्या कोनात झणझणीत चटकदार भेळ भरलेली त्यावर दोन मिरच्या, सोबत हि कैरीची फोड आणि पत्याचे खोचलेलं पान! पत्त्याचा चमचा करून खाल्लेली ती भेळ म्हणजे निव्वळ स्वर्गसुख! आज त्याच भेळेची रेसिपी देणार आहे. कोल्हापूर पुणे आणि मुंबई मधल्या भेळेतील फरक चिमुरयंपासून सुरु होतो. (हो चिरमुरेच!
Taxonomy upgrade extras

जालफ्रेझीची सोय

लेखक खिलजि यांनी शनिवार, 05/05/2018 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
भोपळ्याने सर्व भाज्यांना दमात घेतलं सांगितलं मी आजपासून आहे तुमचा राजा शेपू पालक सर्वानी शेपूट घालून मान दिला अन बनल्या भोळी प्रजा शेपूला केला मंत्री त्याने पालक झाला प्रधान धुसफुसणारी भेंडी वझीर केली देउनी खास सन्मान कसेबसे ते राज्य उभारले कांदे बटाटे रुसले संख्येने ते जास्त म्हणोनि आरक्षण मागत सुटले कोथिंबीरही मिरचीसंगे चूल मांडते वेगळी कडीपत्ताही राग आळवतो तर पुदिन्याची बंडाळी वांगे आपले अलिप्त तेथे , ना कसलीही चिंता गनिमीकावा गवार वापरते , वाढवत सुटते गुंता भोपळा झाला येडा पुरता डोकं झालं बधिर भेंडी देई आधार त्याला तर पालक देई धीर दोन घडीचा डाव मांडला

मधुर, मोहक ताडगोळे

लेखक जागु यांनी शनिवार, 05/05/2018 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशाला भिडायला निघालेली, सरळ उंच वाढलेलं खोड त्यावर झुबकेदार टोकेरी पात्यांची भारदस्त झाडे म्हणजे ताड. ह्या ताडाच्या फळांच म्हणजे ताडगोळ्यांचं आणि माझा लहानपणापासून अतिशय सख्य. ताडगोळे म्हटल्यावरच माझ्या मनात शांत आणि मधुर भाव उमटतात. वाचताना कदाचित हे तुम्हाला हास्यास्पद वाटेल पण असच आहे हे पुढच्या लिखाणावरून कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचेल. उरणला नागांवात माझ्या माहेरी वाडीत ताडाची ७-८ उंच झाडे होती. काही ठिकाणी एकमेकांना सोबत देत दोन-तीन झाडे एकत्र कुटुंब पद्धतीत होती तर कोणी एकटेच शांतताप्रीय, एखादे आपल्याच तोर्‍यात तर कोणी सदा प्रसन्न सळसळते.

म.मु., ट्रेन आणि पप्पू यादव!

लेखक चायवाली यांनी शनिवार, 05/05/2018 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
फार फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट नाही. साधारण ७-८ वर्षांपूर्वीची असेल. पण, त्या आधी तुम्हाला प्रश्न पडला असेल हे म.मु. काय आहे! तर म.मु. म्हणजे मराठी/मध्यमवर्गीय मुली. तर साधारण ७-८ वर्षांपूर्वी आम्ही (म्हणजे अस्मादिक आणि आमची एक घनिष्ठ मैत्रीण - म्हणजेच म.मु.) कानपूरला जाण्यासाठी कुर्ल्याला ट्रेन मध्ये चढलो. (हो हो, असा उलटा प्रवास पण करतात लोक.) आधीच पुणे ते मुंबई असा ऐन उन्हाळ्यातला एक अत्यंत घामेजलेला प्रवास करून स्टेशनला पोहोचलो होतो. त्यात उशीर इतका झाला होता, की मुंबईतल्या त्या भर दुपारी, हातात चार सुटकेसेस नाचवत DDLJ style ट्रेन पकडावी लागली.