Skip to main content

आफ्रिकन सफारी

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी रविवार, 08/07/2018 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या फूल टू पावसाळी राईड ला काय नाव द्यायचे तेच समजत नव्हते .. अनेक नावे सुचत होती पण नक्की होत नव्हती.. राईड संपता संपता ट्रफिक जॅम मध्ये झालेल्या एका किश्याने तो प्रश्ण सोडवला ..

अस्मिचे मनोगत (मी अस्मि बोलतेय

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी रविवार, 08/07/2018 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
*अस्मिचे मनोगत( मी अस्मि बोलतेय* नमस्कार, मी अस्मि. ही भाषा मला नवीन आहे, अर्थात हीच काय भाषा हे माध्यमच मला नवीन आहे. तसं माझं माहेर स्वीर्झलॅंड . इंजीनिअर ED Scott. हे आमच्या घराण्याचे मूळपुरुष, त्यानी म्हणे १९५८ साली प्रथम स्किइंग या खेळाची उपकरणे बनवायला सुरुवात केली व मग सायकल्स . कारखान्यात मी जेव्हा बनत होते तेव्हा यातलं काहीसं ऐकल होतं मी. मी झाले आणी माझी रवानगी भारतातील महाराष्ट्र या राज्यातील ठाणे या शहरात झाली. अर्थात ते मला समजले जेव्हा ,मी लाकडी खोक्यातुन बाहेर आले तेव्हाच. मग काही दिवस मी तेथेच होते. एकेदिवशी एक वेडा आला त्या दुकानात.

८६ वर्षांचं तारुण्य हरपलं!

लेखक अबोलघेवडा यांनी रविवार, 08/07/2018 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
आदरणीय सर – कोणी म्हणेल की आता तर सर गेले मग आता त्यांना पत्र लिहून कसं चालेल? पण आमच्यासाठी तुम्ही गेला नाहीत सर. आपल्या धडाडीने कर्तृत्व गाजविणाऱ्या असामान्य लोकांच्या बाबतीत लौकीकार्थाची फुटपट्टी लावायचीच नसते. स्वतःच्या मृत्यूने नाहीशी होतात ती सामान्य माणसं. तुमच्यासारखी माणसं तर हयातीत आणि मरणानंतर लोकांच्या हृदयात विराजमान असतात. अशी माणसं कधी मरत नाहीत. सॅटर्डे क्लबच्या संस्थापकाला शनिवारीच आपल्या जवळ बोलावून साक्षात मृत्यूनेच तुम्हाला मानवंदना दिली सर. काहीच दिवसांपूर्वी तुम्हाला पहिल्यांदाच (आणि शेवटचंच) भेटायला तुमच्या ऑफिसमध्ये आलो होतो.

सेक्रेड गेम्स

लेखक बार्नी यांनी रविवार, 08/07/2018 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
सेक्रेड गेम्स sacred games काही महिन्यांपूर्वी नेटफ्लिक्स विक्रम चंद्रा च्या कादंबरीवर टीवी सिरीज बनविणार म्हणून समजले आणि मी उडालो. इंजिनीरिंग ला असताना मला विक्रम चंद्रा चे हे पुस्तक प्रचंड आवडलेले .

असाव कोणीतरी

लेखक तृप्ति २३ यांनी रविवार, 08/07/2018 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात कोणाची तरी साथ असणं खूप गरजेचं असत म्हणून कोणीतरी आपल्यासोबत कायम असाव त्याच वर्णन मी या कवितेत केल आहे. तुम्हाला ही कविता कशी वाटली हे तुम्ही कंमेंट ने कळवू शकता. https://www.truptiskavita.com

झरोके

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 08/07/2018 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
"मला एक गुलाम विकत घ्यायचा आहे." टेबलावर हजाराचे पुडके ठेवत मी म्हणालो. हॅट एका बाजूला कलवली. आणि चेहऱ्यावर स्मितहास्य. "कसला पायजे? काळा, गोरा, रानटी? की आपला साधाच?" मुंडी वर न उचलता तो मनुष्य पैसे मोजण्यात गर्क होता. "पुरुष की बाई?" या वेळी मात्र त्याने वर पाहिले. भिवया थोड्या ताणलेल्या. "तुमच्याकडचा अव्हेलेबल स्टॉक तरी दाखवा" बियरच्या बॉटलचं झाकण काढावं तसं मी विचारलं. "तसं दाखवता येत नाही इथं. माल बाहेरून मागवावा लागतो. बरीच लफडी आहेत. तुम्ही रिक्वायरमेंट कळवा" एव्हाना त्यानं चौथं बंडल मोजून संपवलं होतं. काय? तुम्ही त्यांच्याशी नडता. ज्यांना घ्यायची सवय आहे.

राजयोग - १५

लेखक रातराणी यांनी रविवार, 08/07/2018 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
रघुपतीने विचारलं, "काय चालू आहे हे?" नक्षत्रराय डोकं खाजवत म्हणाला, "नाच चालू होता." रघुपती तिरस्कारानं म्हणाला, "छि छि." नक्षत्रराय अपराध्यासारखा उभा राहिला. रघुपती म्हणाला, "उद्या इथून जायचंय. तयारीला लाग." नक्षत्रराय म्हणाला, "कुठे जायचंय?" रघुपती - "ते सगळं नंतर सांगेन. आता फक्त इथून जायचंय." नक्षत्रराय - "मी इथेच ठीक आहे." रघुपती - "ठीक आहे!? राजकुळात जन्म झालाय ना तुझा? तुझ्या सगळ्या पूर्वजांनी राज्य केलं आणि एक तू आहेस इथं या जंगलात कोल्ह्यांचा राजा झालायस! आणि म्हणे ठीक आहे!" रघुपतीच्या कठोर शब्दांनी आणि लालबुंद डोळ्यांनी सिद्ध केलं की नक्षत्रराय ठीक नाहीये.

Make At Home: एक नवीन आणि उपयुक्त मोबाईल ऍप

लेखक आपला निखिल यांनी रविवार, 08/07/2018 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यापैकी बऱ्याच जणां कड़े विशेष कलगुण, छंद असतात परंतु काही मोजके जण त्यांचे कलगुण, छंद चांगल्या पद्धतीने जोपासतात तर काही जण त्या मधुन उत्पन्नाचे साधन निर्माण करतात. असे हौशी लोक प्रामुख्याने आपल्या घरा मधुन छोटे धंदे चालू करतात. आवड़ आणि कौशल्या आसल्या मुळे चांगल्या प्रतिच्या वस्तु हे लोक घरात तयार करुन विकतात. ह्या मध्ये उत्तम घरगुती खाद्यपदार्थां पासुन कपड़े, घर सजावटी च्या वस्तु, आरोग्य व सौन्दर्य प्रसधाने, घरगुती शिकवणया अशा नानाविध प्रकारच्या गोष्टी विकल्या जातात. परंतु आजच्या स्पर्धेच्या युगात हे घरा मधुन चालणारे छोटे उद्योग अभावनेच टिकतात.

तो आणि ती.... देवकी!

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 08/07/2018 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
तो आणि ती............. देवकी! "यादवा, आज आयुष्याच्या उत्तरार्धात मागे वळून बघते तेव्हा वाटत अनेकविध घटनांनी भरलेलं आयुष्य जगले मी. वडिलांची आणि मोठ्या भावाची लाडकी होते मी. कितीतरी कौतुकाने कंसदादाने माझं लग्न तुझ्या वडिलांशी लावून दिलं होत. त्यादिवशी आम्ही सगळेच कितीतरी आनंदात होतो. मात्र त्याचवेळी ती आकाशवाणी झाली आणि माझ्या आयुष्याचे फासेच फिरले. कारावासात असताना अनेकदा मनात येऊन गेलं; जर ती आकाशवाणी झालीच नसती तर; कदाचित् आयुष्य वेगळं असत. कंसदादाच्या वधानंतर तू स्वतःचा राज्यभिषेक न करता हट्टाने तुझ्या वडिलांना सिंहासनावर बसवलंस; त्यावेळी मला तुझी माता असण्याचा अभिमान वाटला.

तो आणि ती..... प्रस्तावना भाग १

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 07/07/2018 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
तो आणि ती............... प्रस्तावना तो जगद्नियंता.......... विश्वनिर्माता......... बंसीधर........ गोपाल.......... यदुकुलनंदन.......... देवकीपुत्र............... कृष्ण..... मधुसूदन............ मोहन............ आणि वासुदेव! असा खूप काही.... आणि तरीही उरणारा! सर्वांमध्ये असूनही नसलेला.......... चमत्कार करूनही मानवी रुपात रमलेला. अशा त्या विश्वरुपी मानवाशी त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक स्त्रीची भावनात्मक गुंतवणूक वेगवेगळ्या स्तरावरची होती.