तुम्हाला आपारपी, लिंगोरच्या, रूमाल पाणी, डब्बा ऐसपैस, ईश्टोप पलटी शब्द आठवतायेत?
काल श्रीहरीकडे पावभाजीसोबत गप्पागोष्टी सुरु होत्या. गप्पात बालपणातल्या खेळांचा विषय आला. कर्मधर्मसंयोगाने आभासी दुनियेतल्या मिमिवर देखील त्याच गप्पा रंगल्या होत्या.
Hide and Seek म्हणजे लपाछपी हा तर राष्ट्रीय खेळ असल्यासारखा फेमस. अजूनही तितकीच बालप्रियता टिकवून आहे. आपल्या वेळेला डबा ऐसपैस् होतं. करवंटी, डवा लांब फेकायचा, तो आणेपर्यंत आपण लपायचं.
गल्लीत देवीच मोठ मंदिर,. नवरात्रीत संपूर्ण गल्लीत मांडव टाकलेला असतो. त्या वेळी खांबखांबोळी पेश्शल. खांब असणाऱ्या देवळात कधी ताकतुंबा खेळलाय? तसंच झाड पकडून ? प्रत्येकाने खांब पकडून उभा रहायचे आणि एकावर राज्य.
मिसळपाव
डेक्कन वर जागा मिळेल तिथे स्कुटर पार्क केली व चालायला सुरवात केली
डेक्कन पेट्रोल पंपाजवळ एक जण टोस्ट सॅन्डविच बनवणारा आहे
तो कांदा कापत होता
चॉपिन बोर्ड वर नाजूक बारीक कापलेल्या चिरलेल्या कांद्याचा ढीग होता
त्याच्या हातून सूरी घेत मी ब्लेड च्या थिकनेस चा पाते चिमटीत धरुन अंदाज घेतला
खिश्यातुन पैसे काढत विचारणा केली सूरी कुठून विकत घेतली -मला मिळेल का इत्यादी
पण तो माहिती देण्यास नाखूष दिसला -"साब वो सूरी बनाने वाला गाव को गयेला है -वापस नाही आने वा