मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवाळी आणि दिवाळी अंक २०१८

यशोधरा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मराठी घरांमधून फटाके, फराळ, रांगोळ्या, देवता पूजन, आका़शकंदील, गोडधोड ह्यांसोबत दिवाळी अंक घरात आल्याखेरीज दिवाळी सुफळ संपूर्ण साजरी झाल्यासारखी वाटत नाही. आजच्या जमान्यात नेहमीच्या पारंपारिक अंकसोबत ऑनलाईन दिवाळी अंकही उपलब्ध असतील. ह्या वर्षी मात्र मला अजून एकही दिवाळी अंक घेता वा बघता आलेला नाही - अगदी ऑनलाईन अंकही. फारच वाईट! तरी अंकांविषयी उत्सुकता आहेच. जास्तीत जास्त दिवाळी अंक वाचायला मिळावेत म्हणून ग्रंथालयाचे सदस्यत्व घ्यायचाही विचार आहे, म्हणजे घेईनच. जसजसे वाचेन, तसे इथे लिहीन. तुम्ही कोणी पारंपारिक अंक विकत घेतलेत का? किंवा ऑनलाईन अंक पाहिलेत, वाचलेत का? तर इथे त्या अंकांविषयी लिहा, ही विनंती. मिपाचा दिवाळी अंकही लवकरच प्रकाशित होईल, तोही वाचायचा आहेच. अंकांच्या किंमतीही भरमसाट वाढल्या आहेत म्हणा. तरीही एका तरी अंक दिवाळीच्या निमित्ताने घरी आणावासा वाटतो. एकच दिवाळी अंक घरी आणायचा, असं ठरलं तर तुम्ही कोणता अंक आणाल?

वाचन 31851 प्रतिक्रिया 0