[शशक' १९] - मासा
श्रावणीला दगा देऊन व्हेरोनिकाशी सतिशने लग्न केले हे माझ्या पचनी पडले नाही. चांगला श्रीमंत मासा लागला होता माझ्या आणि श्रावणीच्या गळाला !!
पुढच्या ऑस्ट्रेलियाच्या भेटीत मुद्दाम त्यांच्या घरी अचानक धडकलो . तिला बघून चाटच पडलो. इतकी सोज्वळ, सुंदर आणि सालस मुलगी ह्या ओबडधोबडला मिळाली याचा मला हेवा वाटला. गप्पा मारताना लक्षात आले की व्हेरोनिका फक्त सुंदरच नाही पण हुशारही आहे. विविध विषयात पारंगतही होती. चांगली मासोळी छे जलपरीच लागली की याच्या गळाला !!
सतिश नसताना एकदा तिला मी या विषयावर छेडले तर तिच्या सोज्वळ चेहर्याचा रंग बदलला आणि रूक्ष स्वरात ती म्हणाली,
"रेसिडन्स परमिट फुकट मिळतो काय?
मिसळपाव