Skip to main content

[शशक' १९] - दैव 2

मंगळवार, 05/02/2019 या दिवशी प्रकाशित केले.
अंजीला तलाठ्याला मारायचे नव्हतेच मुळी.. पण तिला त्याची " ती " भूक भागवायचीदेखील नव्हती. . . . . . घाबरलेली अंजी सैरभर होऊन शेवटी मामाकडे आली होती. बापानंतर त्याचाच आधार होता. आईचा लांबचा नातेवाईक.. अडीनडीला तोच कमी यायचा. . . . . . म्या तुला कायबी हूं न्हाय देणार अंजे.. म्या हाये ना .. बघू पुढं काय करायचं.. माह्यावर इश्वास ठेव.. . जेवून घे आणि शांतपणे झोप.. . . . . . अंजी सुखावली. तिच्या गोऱ्या चेहऱ्यावर छानशी खळी पडली. टेकाडावरच्या काळूबाईचे मनोमन आभार मानत होती... बऱ्याच दिवसांनी अंजी पोटभर जेवली होती. . . . . . रूपाSSSS... अचानक कोणतरी मारलेल्या हाकेने ती दचकली. गोंगाट आणि फक्त गोंगाट.. अगदी मासळी बाजारात असतो तसाच.. जड पावलांनी ती जिना उतरू लागली.. आलेल्या गिर्हाईकाची " ती " भूक भागवण्यासाठी..!!

वाचने 9084
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

आवडली पैजारबुवा,

मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये काऊन्ट केले शब्द. मधल्या डॉटसकट १२६ भरताहेत.!!

आवडली!

परिणामकारक.

+१

+१

+१

+१

+१


उत्तम लिहिली आहे

+1

+१

+१