Skip to main content

हॉरर

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी शनिवार, 17/08/2019 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
हॉरर ---------------------------------------------------------------------------------------------------------------- एक कर्णकर्कश्श किंकाळी पूर्ण थिएटरमध्ये घुमली ! लोक दचकले . माझ्या शेजारचाही दचकला .एक प्रौढ गृहस्थ. लोकांना त्या हिरॉईनची भयकुंठित अवस्था बघवत नव्हती . हिरॉईन दिसायला एकदमच कडक होती. नवीन. लोकांना अल्पावधीतच ती लय आवडायला लागली होती . पडद्यावर हॉरर चित्रपट चालू होता . टुकार ! ती हिरॉइन सोडता. हॉरर कमी आणि कॉमेडीच जास्त होता साला ! पार्श्वसंगीत मात्र लय भारी होतं. ते काढलं तर टॉम अँड जेरी बरं वाटलं असतं. पण पिक्चर बंडल असला तरी ' हॉरर होता.

वैशालीतला उपमा आणि सुदाम्याचे पोहे

लेखक मित्रहो यांनी शनिवार, 17/08/2019 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारवाडा, सिंहगड, म्हात्रे पूल, बिडकरची मिसळ या प्रमाणेच वैशाली हे पुणेकरांचे एक अत्यंत आदरांचे स्थान आहे. वैशालीतला उपमा खात आणि फर्ग्युसन वर नजर ठेवीत कित्येकांनी तारुण्यात बहार आणली. अशांनी वैशालीच्या उपम्याचा अभिमान दाखविणे स्वाभाविक आहे पण एका तीन वर्षाच्या मुलाने वैशालीच्या उपम्याचा अभिमान दाखविणे जरा जास्तच होते. दादरला माझ्या मैत्रीणीच्या बहिणीचे लग्न होते. मुलाकडली मंडळी पुण्यातली होती. सकाळी नाष्टा सुरु होता. एक साधारण तीन वर्षाचा मुलगा रडत होता.

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३३

लेखक मृणालिनी यांनी शनिवार, 17/08/2019 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
युगांतर - आरंभ अंताचा भाग ३३ "आवाज अनोळखी आहे हा विदुर. कोण आहे तो वीर जो द्वंद्व करण्यास आव्हान देऊ इच्छितो.... ते ही अर्जुनाला?" धृतराष्ट्राच्या अंधारलेल्या नेत्रांपुढे एक आशेचा किरण जागृत होत होता..... 'एखाद्या तिसऱ्याच व्यक्तीने अर्जुनाला हरवलं की ही स्पर्धा बाद ठरवून वेगळ्या स्पर्धेचे आयोजन ! मग दुर्योधनच्या राज्याभिषेकात अडथळा नाही.' धृतराष्ट्राला त्या वीराबद्दल उत्सुकता लागून होती.

चमचा !

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 17/08/2019 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
चमचा! आपण पुनर्जन्म वगैरे मानत असू किंवा नसू. पण एक प्रश्न मात्र आपल्याला खूप आवडतो. तो म्हणजे, ‘पुढच्या जन्मी तुला कोण व्हायला आवडेल?’… कारण, या प्रश्नाचं उत्तर एका मानसशास्त्राशी जोडलं गेलेलं असतं. बऱ्याचदा, या जन्मात न जमलेली किंवा राहून गेलेली एखादी गोष्ट जमविणे किंवा पूर्ण होणे हे आपल्या पुढच्या जन्माचं ध्येय असलं पाहिजे, असंच अनेकांना वाटतं. ‘पुनर्जन्म असलाच, तर पुढच्या जन्मी मला अमुक व्हायला आवडेल’, असं या प्रश्नावरचं उत्तर मिळतं, ते त्यामुळेच... ... सुट्टी असेल तेव्हा सकाळच्या नाश्त्यासोबत वर्तमानपत्र वाचायची मजा काही औरच असते. ती मी आज अनुभवत होतो.

अश्वत्थामा

लेखक मायमराठी यांनी शुक्रवार, 16/08/2019 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
।। अश्वत्थामा ।। क्षितिजावर थबके रवि, पोर्णिमेत रेंगाळे शशि, एक न जाई ओटी, दुजा रातीच्या कंठी, एक तेजोमय गर्भ, दुजा शांतीतच गर्क, पूर्वेस वाजता शंख, पृथ्वीस वाटते दुःख, अवचित संध्याकाळी, अवनीही होई हळवी, कधी उजळें प्रकाशहाती, कधी निथळें चांदणराती, विधाताही निष्ठुर होई, मग निर्णय कोण घेई? भावनांचे दीप जळती, आवेगांचे लोळ उठती, मानवास न उमगे कोडे, अश्रू का दाटती नयनी? बघता सुवर्णजन्मा वा पाहता तम पश्चिमा, घेऊन फिरावा माथी, ओला शाप कपाळी, अश्वत्थामा सगळेच, रोज संधीप्रकाशी । - अभिजीत श्रीहरी जोगळेकर

(रगेल पावट्याचे मनोगत)

लेखक नाखु यांनी शुक्रवार, 16/08/2019 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ कवीता आशयसंपन्न आहे,हा फक्त साचा तिथून उचलला आहे... ******* नेहमीच मुदलातून वाचण्याची नाही हौस अफवा मूळ शोधण्याचा मज नाही सोस मूळ बातमी शोधण्यात कसली आलीय (?) मौज भरपेट मीठ मसाला सुद्धा मिळत नाही रोज सोसायटीत (मला)ओळखीत कुणीच नाही जालात तर नाव सुद्धा घ्यायचे नाही विधायक पाहण्यात तर मला रस नाही दिप पणती भेटण्याचा मला आनंद नाही विघ्नसंतोषी तरी प्रसिद्धीचा सुटेना वसा मंगल दाखवून तुम्हीच दिला घुस्सा अनुमान खालावले तर्कबुद्धी खुंटली आत्ता मात्र हाव सुद्धा प्रखर वाढली शोधतो वृत्तीला, जो प्रश्न वाढवेल शोधतो मताला, जिथे दुभंग सापडेल शोधतो जखमांना, तिथे खपली(च) निघेल शोधतो जागेला, जिथे शि

दि लायन किंग - एक मस्त अनुभव देणारा चित्रपट

लेखक मालविका यांनी शुक्रवार, 16/08/2019 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
दि लायन किंग - एक मस्त अनुभव देणारा चित्रपट एका कौटुंबिक संमेलनासाठी ठाण्यात जाण्याचा योग्य आला. त्याच दरम्यान 'दि लायन किंग' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सुदैवाने हिंदी शोची काही तिकिटे शिल्लक होती. माझ्या नणंदेने मला ऑनलाईन तिकिटे बुक करून दिली आणि मी नि ईशान कोरम मॉल मध्ये चित्रपट पाहण्याकरता पोहोचलो. ईशान (वय वर्षे ८ पूर्ण, शिक्षण - मराठी माध्यम ), माझा मुलगा याच्यासाठी हा चित्रपट पाहणे एक सरप्राईज होत. नुकतेच त्याने एका परीक्षेत शाळेत पहिला नंबर काढल्याने त्याला बक्षीस द्यायचेच होते.

नृत्यांगना..... अहं...... !!! (भाग 2)

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 16/08/2019 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
नृत्यांगना..... अहं...... !!! (भाग 2) मागील शुक्रवारी मी 'प्यार किया तो डरना क्या....' या गाण्यामधून सिनेसृष्टीच्या all time लावण्य सम्राज्ञी मधुबालाबद्दल आणि त्या अजरामर गाण्याबद्दल लिहिलं होतं. आज अशाच एका भाव सम्राज्ञी नूतनबद्दल थोडंस.... आणि एका कदाचित फारशा परिचित नसलेल्या गाण्याबद्दल..... ज्यामध्ये तिने नृत्य न करूनही काही क्षण मोहक आणि अर्थपूर्ण पदन्यास दाखवले आहेत.... आणि संपूर्ण गाणं भावविभोर नेत्रांमधून संयत प्रणय व्यक्त करत गाण्याच्या प्रत्येक शब्दला न्याय दिला आहे. 'मोरा गोरा अंग लैले.... मोहे शाम रंग दैदे.... छुप जाऊंगी रात ही मे....

तू मेरे रुबरु है

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 16/08/2019 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
आजही विदर्भ मराठवाड्यात बुंग फिरणारी कालिपिली जिप असो की फाट्यावरची पानटपरी तिथे मोठ्या आवजात धडकन मधलं 'दुल्हे का चेहरा सुहाना लागता है' वाजतंच वाजतं. नुसरत ची पहिली वहिली ओळख हिच. धडकन पाहताना पहिल्यांदा तार स्वरात वाटणारं हे गाणं नंतर खूप आवडायला लागलं सोबत नुसरत ही. मग तो थेट भेटला ते 2015-16 मध्ये, आतशः नेट ची स्पीड पण वाढली होती आणि गाणी शोधणं फार फार सोप्पं झालं होतं, तू नळी वर तो पुन्हा भेटला 'साँसों की माला सिमरू' च्या रूपाने. त्यानंतर आजतागायत त्याने साथ सोडली नाही.

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३२

लेखक मृणालिनी यांनी शुक्रवार, 16/08/2019 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ३२ "काय झाले गुरु द्रोण?" "कृपाचार्य, तुम्ही?" "इतक्या रात्री तुम्ही जागे का ?" काय उत्तर द्यावं हे न सुचल्याने द्रोणाचार्यांनीच प्रतिप्रश्न केला, "तुम्ही या प्रहराला इथे?" "एक निर्णय घेतला गेलाय आज राज्यसभेत.... त्यामुळे जरा अस्वस्थ आहे." "कसला निर्णय?" "होणारे महाराज ठरवणार आहेत येत्या सप्ताहामध्ये." "त्यात अस्वस्थ होण्यासारखे काय आहे, कृपाचार्य? ही तर आनंदाची बाब आहे." "ते सर्वांचे युद्धकौशल्यावर मापन करणार आहेत गुरुवर!" "ह्मम. मग कोण निवडला जाण्याची भिती वाटते आपणास?" "आपल्या पासून काहीच लपून नाही.