Skip to main content

काल्पनिका

लेखक दिनेश५७ यांनी मंगळवार, 20/08/2019 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
पुष्पक : एक काल्पनिका. भगवान ब्रह्मदेवास एकदा घाईघाईने पृथ्वीवर जायचे होते. एका पुण्यात्म्याच्या महानिर्वाणाचा मुहूर्त जवळ येत होता, त्याला सन्मानाने स्वर्गलोकी आणण्याचे काम इंद्रदेवाने ब्रह्मावर सोपविले होते. सारी तयारी करून ब्रह्मदेव विमानतळावर आले. पुष्पक तेथे सज्जच होते. ब्रह्मदेव विमानात बसले आणि सारथ्याने पुष्पकाची आरंभकळ दाबली. पण दुर्दैव. विमान सुरू झालेच नाही. गरूडही गप्प उभा होता. चालकाने पुन्हा प्रयत्न केला. तोही फसला. खूप वेळा प्रयत्न करूनही पुष्पक स्टार्ट होत नसल्याने वैमानिक हताश झाला. ब्रह्मदेवही काळजात पडले..

द सियालकोट सागा

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 20/08/2019 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
असतो मा सद्‌गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतम् गमय बृहदारण्यकोपनिषद् 1.3.28 म्हणजेच मला असत्याकडून सत्याकडे ने अंधाराकडून प्रकाशाकडे ने मृत्यूकडून अमरत्वाकडे ने अगदी प्राचीन काळापासून मर्त्य मानव कायमच अमरत्वाच्या शोधात फिरत होता, रामायण महाभारतामध्ये सुद्धा अमरत्वाचा उल्लेख आहे. माणसाला अमर कसं होता येईल यासाठी योग, ध्यान, विविध औषधी वनस्पतीचे प्रयोग करत आला आहे. पण सुदैवाने म्हणा अथवा दुर्दैवाने त्याला अजून त्यात यश मिळालं नाहीये अश्विन सांघीची सियालकोट गाथेचा गाभा सुद्धा हेच अमरत्व आहे. सम्राट अशोकाच्या ऐतिहासिक साम्राज्यापासून सुरु झालेली हि कथा थेट येते ती फाळणीच्या काळात.

.. शी मस्ट बी राइट !

लेखक उन्मेष दिक्षीत यांनी सोमवार, 19/08/2019 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवार रात्र स्थळ :- घर (आमचं) ..... ती : नाही! मी चालले आहे झोपायला, तुझं संपलं की ये. मी : थांब की. ११ वाजलेत फक्त ती : ....... मी : ओके, जा ------------------------------------------------------------ साधारण १५ मिनिटांनी, मी (डिश हातात) : श्रद्धा ss.. !? ती : काय ? मीठ कुठाय ? मिळत नाही आहे ! .... , इकडं ये जरा.. ती आली. मी : थांब जरा, तुला आता डेमो दाखवतो, दर वेळी नेमकं काय होतंय वस्तू शोधताना ते बघ आता (आमच्या श्रद्धाचा वस्तूंच्या जागा बदलत राहणे हा एक छंद म्हणा, किंवा "स्थायी" भाव म्हणा, तो आहे ) मी (ड्रॉवर उघडत ) .. हे बघ, इथं ? नाहीये. (कट्ट्यावर ) इथं? नाहीये ..

देवघर

लेखक शिव कन्या यांनी सोमवार, 19/08/2019 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
देवघरातच सोडून आले मंद दिव्यांची सुगंधमाला पहाटवारा श्रावणओला कांत सतीचा तिथे राहिला दिवेलागणी शुभंकरोति करी एकटी तुळशीमाला बोटांमधुनी फिरत जाय ती कालगणाची अजस्त्र माला देव्हाऱ्यावर शांत सावली स्निग्ध घरावर छाया धरते त्या झाडाच्या पानांवरती कृष्णवल्लरी गाणे रचते समईमधल्या दीपकळीवर विझू विझू ते डोळे दिसती मध्यरात्रिला येता आठव देवघरातील विझते वाती हार चंदनी हात जोडुनी जन्म पिढ्यांचा भोगून जातो मागे वळुनी आपणसुद्धा हात सोडुनी भणंग होतो.... -शिवकन्या

*प्रभावी जलसंवर्धन कसे कराल ?* (Beyond the 'Rainwater Harvesting') भाग - दोन.

लेखक सुनिल प्रसादे यांनी सोमवार, 19/08/2019 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
*प्रभावी जलसंवर्धन कसे कराल ?* (Beyond the 'Rainwater Harvesting') भाग - दोन. -------------- जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचं संवर्धन ------------------------------------------------------------- पहिल्या भागात आपण पाणी आणि जमीन ह्यांच्यामध्ये नेमकं काय नातं आहे याचा शोध घेतला. त्या नात्यामध्ये लपलेला सृष्टीचा नियम काय सांगतो हे आपण पाहिलं आणि त्यानुसार एक तंत्र बनवलं. त्या तंत्राच्या साहाय्याने आकाशातून इमारतींच्या छपरावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याला आपल्या मर्जीनुसार कसं वळवायचं हे आपण पाहिलं.

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति २: शिमला ते नार्कण्डा

लेखक मार्गी यांनी सोमवार, 19/08/2019 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
२: शिमला ते नार्कण्डा सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १: प्रस्तावना २५ जुलैला ट्रेनने स्पीति- लदाख़ सायकल प्रवासासाठी निघालो. मला निरोप देण्यासाठी अनेक सायकल मित्र व घरचे आले. ट्रेनमध्ये गेल्यावर सायकलची पिशवी सहजपणे बर्थच्या खाली ठेवली. खूप आरामात फोल्ड केलेली सायकल व इतर सामानाची पिशवी बर्थच्या खाली मावली तेव्हा बरं वाटलं. आता सायकल ट्रेनमध्येही आरामात नेता येते आहे! सायकल अशा प्रकारे फोल्ड करण्यासाठी त्याचं कॅरीअर, दोन्ही चाकं, स्टॅण्ड, सीट आणि दोन पेडल काढावे लागतात.

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३४

लेखक मृणालिनी यांनी सोमवार, 19/08/2019 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
"प्रणाम द्रोणाचार्य." "प्रणाम. काय झाले कृपाचार्य? तुम्ही अस्वस्थ का दिसत आहात अजूनही?" "तुम्ही पाहिलेत ना काय झाले ते." "हो. पण तुम्ही का चिंतेत आहात?" "का नसेन, द्रोणाचार्य?" "कारण तुम्हाला वाटलेली भिती सत्यात उतरली नाही." "म्हणजे?" "दुर्योधन स्पर्धेत विजयी झाला नाही, कुलगुरु. तुम्ही तर आनंदी असायला हवे. चिंतीत नाही." द्रोणाचार्य हसत म्हणाले.a "तुम्ही मला चुकीचे समजत आहात द्रोणाचार्य. दुर्योधनाचा पराजय हस्तिनापुरचा एक आधारस्तंभ इतर आधारस्तंभांपेक्षा कमकुवत असल्याचे द्योतक आहे..... आणि मी कुठे हस्तिनापुरापेक्षा वेगळा आहे, गुरुवर?

सेक्रेड गेम्स २

लेखक किसन शिंदे यांनी रविवार, 18/08/2019 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी आजीच्या कुशीत शिरून गोष्टी एेकताना, त्यात पुढे काय होईल याची उत्सुकता आपल्याला शांत बसू देत नाही. हि उत्सुकता ती गोष्ट/कथा उत्कृष्ट असण्याचं द्योतक म्हणता येईल आणि त्या गोष्टीशी आपण एकरूप झाल्याचं लक्षण म्हणता येईल. या उत्सुकतेपोटीच 'गेम आॅफ थ्रोन्स'च्या आठही सिझन्सना जगभरातल्या तमाम प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या सर्वांग सुंदर सिरीजचा २०११ ला सुरू झालेला प्रवास नऊ वर्षांनी २०१९ ला संपला, कारण या मालिकेची कथा उत्कृष्ट होती आणि तिने प्रेक्षकांना बांधून ठेवण्याचे काम अतिशय चोख केले. 'कट्टप्पाने बाहुबलीला का मारले'?

जिवाचा सखा..

लेखक आजी यांनी रविवार, 18/08/2019 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
म्हातारपणी टीव्हीसारखा दुसरा मित्र नाही. सतत फक्त टीव्ही बघावासा वाटायला लागला की समजावे, आपले वय झाले. (आणि तोही बघवेनासा झाला की समजावे की आता फारच वय झाले.) मलाही अशीच म्हातारपणाची जाणीव झाली ती टीव्हीमुळे. पेपरमधल्या बातम्या बारीक अक्षरात वाचण्यापेक्षा टीव्हीवरच्या बातम्या बघायला जास्त आवडायला लागल्या. रेडिओवरच्या गाण्याबरोबरच टीव्हीवरची गाणी बघायला आवडायला लागली. टीव्हीवरच्या मालिकेतल्या सासवा सुना, सुनेचा छळ, नायिकेवर-नायकावर येणारी संकटे, त्यातली व्हरायटी, सासूने सुनेवर विषप्रयोग करणे, खलनायकाने नायकाचा अकारण द्वेष करणे यांसारख्या गोष्टीत मन रमायला लागले.