Skip to main content

एका 'डोळस' प्रेमाची गोष्ट

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 27/08/2019 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न ही आपल्या आयुष्यातील एक महत्वाची घटना असते. त्यासाठी सुयोग्य जोडीदार निवडणे हा वाटतो तितका सोपा प्रश्न नसतो. ‘बघून’ करावयाच्या लग्नांमध्ये जोडीदार-निवडीचे अनेक निकष (फूटपट्ट्या) लावले जातात. असे निकष कोणते असावेत आणि कशाला किती महत्व द्यायचे हे ज्याच्या त्याच्या विचारांवर अवलंबून आहे. त्यात काही गैर नाही. या लेखाच्या अनुषंगाने मला फक्त एका निकषाकडे लक्ष वेधायचे आहे. तो म्हणजे एखाद्या व्यक्तीतील शारीरिक व्यंग. विवाहेच्छू तरुण-तरुणींकडे जर आपण एक नजर टाकली तर काय दिसते? जी व्यक्ती शरीराने धडधाकट आहे ती आपला जोडीदार निवडताना त्याच्यात कुठलेही ठळक व्यंग नको हे जरूर पाहते.

काण्याला सुंदरी मिळाली देवाघरी

लेखक खिलजि यांनी मंगळवार, 27/08/2019 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
त्याच्याबद्दल फक्त ऐकून होतो वाटलं एकदा परखून पाहावं म्हणूनच गेलो त्याच्या दारी तो शांत उभा होता पाषाणात मागितली एक सुंदरी , कुणालाही न पटणारी थेट सांगितलं त्याला निक्षून खरा असशील तर हीच गळ्यात दे बांधून पूर्ण दिवस मंदिरात, उभा राहीन मी काणा बनून लगेच तिथे घंटा वाजली अर्थात , धोक्याची होती ते नंतर समजली दुसऱ्याच दिवशी निकाल लागला सुंदर धोंडा आपोआप गळ्यात पडला सुतासारखी सरळ वाटत होती गळ्यात पडल्यावर मात्र सारखी गरळ ओकत होती माझ्या प्रत्येक सवयीत उभीआडवी ठोकत होती काय करू नि काय नको ?

गुड्डे बिस्कीट मोदक by Namrata's CookBook : १७

लेखक Namokar यांनी मंगळवार, 27/08/2019 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारा वेळ: १० मिनिटे लागणारे जिन्नस: गुड्डे बिस्किट दुध रंगीत बॉल्स क्रमवार पाककृती: १. बिस्किटाचे छोटे तुकडे करुन घ्या २. मिक्सरमध्ये बिस्किट बारीक करुन घ्या ३. आता बारीक केलेले बिस्किट एका भांड्यात घ्या ४. आत यामध्ये थोडे दुध घालून एकत्र करुन घ्या ५.

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ३: नार्कण्डा ते रामपूर बुशहर

लेखक मार्गी यांनी सोमवार, 26/08/2019 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
३: नार्कण्डा ते रामपूर बुशहर सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १: प्रस्तावना सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति २: शिमला ते नार्कण्डा २९ जुलै! ह्या प्रवासाचा दुसरा दिवस. आज नार्कंडावरून रामपूर बुशहरला जायचं आहे. काल नार्कंडाला चांगला आराम झाला. रात्री पाऊसही झाला. २७०० मीटर पेक्षा जास्त उंचीवर रात्री काही त्रास झाला नाही. आजचा टप्पा तसा सोपा आहे, कारण आज चढाव अजिबात नाही आहे. उलट मोठा उतारच आहे.

युगांतर - आरंभ अंताचा ! भाग ३८

लेखक मृणालिनी यांनी सोमवार, 26/08/2019 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
"मला हे पटत नाही युवराज!" "का?" "हे एका योद्ध्याचे काम नव्हे." "ते मला माहित नाही. मला इतकंच महत्त्वाचं वाटतं की राजमुगुट त्या पंडुपुत्रांच्या माथी नसला पाहिजे.वारणावतला तुमच्यासाठी महाल बनवलाय म्हणल्यावर बघ कसे सगळे पांडव गेले तिकडे. हावरट कुठले. "युवराज, त्यांनी विश्वास ठेवला तुमच्यावर. तुम्ही दिलेली भेट म्हणून संशय सुद्धा न घेता गेले ते तिथे. आणि राजगादीचाच प्रश्न आहे, तर त्यासाठी त्यांच्या बळी कशासाठी? तुम्ही द्वंद्वयुद्धाचे आव्हान द्या युधिष्ठिराला. तुमच्यावतीने मी त्याला पराजित करून त्याच्याच हस्ते तुमचा राज्याभिषेक करून देईन." "आणि असे कोण करू देईल आपल्याला?

सिक्कीम बद्दल माहिती हवी आहे

लेखक रात्रीचे चांदणे यांनी सोमवार, 26/08/2019 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. पुढील महिण्यात ४-५ दिवसा साठी सिक्कीम ला जायचे नियोजन करत आहे. आम्ही एकूण 3 जोडपी आहोत.वय २५-30. साधारणतः नियोजन असे आहे की २१ सप्टेंबर रोजी मुंबईतून विमानाने सिलिगुरी ला जायचे आणि 26 तारखेला माघारी यायचे.एखाद दुसरा दिवस कमी जा स्त होऊ शकतो. दार्जिलिंग आणि आसपासच्या परिसरासाठी एक दिवस आणि सिक्कीम मध्ये राहिलेले दिवस भटकणे असा विचार आहे.

दुपारची झोप..

लेखक आजी यांनी सोमवार, 26/08/2019 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
जगातली सर्वोत्तम सुखे फुकटात मिळतात असं कोणीतरी म्हटलं आहेच. तर फुकट मिळणाऱ्या सुखांपैकी "दुपारची झोप" ही मला अत्यंत प्रिय आहे. माझ्या दृष्टीने ती एक जीवनावश्यक गोष्ट आहे. दुपारचे असे मस्त जेवण झालेले असावे. पोट तृप्त असावे. मन अर्धसमाधी अवस्थेत गेलेले असावे. डोळ्यावर हलकेच झोप उतरावी आणि पापण्या अलगद मिटाव्यात. फक्त अर्धा तास!... अर्धा तास ब्रह्मानंदी टाळी लागावी आणि आपण निद्रादेवीच्या अधीन व्हावे.

एका साइड व्हिलनची कैफियत

लेखक फारएन्ड यांनी सोमवार, 26/08/2019 04:17 या दिवशी प्रकाशित केले.
काय डोक्याला ताप राव! असले झंपट टीशर्ट आणि प्यांट घालून फाईट करायला लावतात. तो मेन व्हिलन राहतो बाजूला पिक्चर भर नुसत्या धमक्या देत आणि हीरो आला की फाईटला आम्ही. तरी बरं ष्टोरीत लौकर मेलो तर लगेच दुसरा पिक्चर शोधून तिथली फाईट करायला जाता येतं. नाहीतर उगाच चार महिने शूटिंग ला रोज वेळेवर तयार राहावं लागतं. त्यात अर्ध्या वेळा शूटिंग कॅन्सल. आता बच्चनकडून, धरमपाजींकडून मार खायला काय वाटायचं नाही. पहिलं म्हणजे ते खरंच मारतायत असं वाटायचं. दुसरं म्हणजे सीन टायमावर शूट होउन बच्चन मोकळा व आपण मोकळे दुसर्‍या स्टुडिओत जायला. नाहीतर एकेकाचे नखरे. "आज मूड नही है".

जॅकी

लेखक तमराज किल्विष यांनी रविवार, 25/08/2019 22:01 या दिवशी प्रकाशित केले.
जॅकी हा माझ्या करिअरमधील न विसरता येणारा सहकारी. म्हणायला तो माझ्यावरच्या पदावर होता, पण त्यानं कधीच ते जाणवू दिले नाही. गडी सतत हसतमुख असायचा. बॉसचे बोलणं कितीही ऐकायला लागो, की क्लायंट शिव्या देवो. जॅकी सतत खूष असायचा. सर्व काही हसण्यावारी घेण्यानं विरोधकांना काही किमतच उरायची नाही. जॅकी इतका चिकणा (कोडगा) होता की त्याला तेलात बुडवलं तरी तो तेलकट होणार नाही. इतका स्थितप्रज्ञ ( निर्लज्ज) की समोरचा निर्बुद्ध ठरायचा. जॅकी कार्यालयात कधीच वेळेवर उगवायचा नाही. सकाळी बायकोच्या नावावर एजंट म्हणून आर. डी. ची वर्गणी गोळा करून तो पोस्टात जमा करायचा. एक दीड वाजला की त्याला ऑफिस आठवायचे.

शोक कुणाला? खंत कुणाला?

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 25/08/2019 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
हरिण शावक हत्ती चित्ते, सळसळ धावे नाग सर्पिणी धडधड धडधड रान पेटते...... शोक कुणाला? खंत कुणाला? चोची माना तुटल्या ताना,भकभक काळे पंखही जळती लपलप लपलप ज्वाला उठती...... शोक कुणाला?खंत कुणाला? पिंपळ कातळ खोड पुरातन, चट्चट् जळते गवत कोवळे भडभड भडभड पाने रडती.... शोक कुणाला? खंत कुणाला? पिले पाखरे भकास डोळे, हा हा करती समूह भाबडे चरचर चरचर डोळे झरती...... शोक कुणाला? खंत कुणाला? कुणी लावली कशी लागली, आग शेवटी जाळ काढते करकर करकर शाप जीवांचे, थरथर.... इथवर ऐकू येते..... -शिवकन्या