Skip to main content

हम जो चलने लगे, चलने लगे हैं ये रास्ते! (चिपळूण - कोळथरे - चिपळूण सायकल फेरी )

लेखक मालविका यांनी रविवार, 05/01/2020 07:44 या दिवशी प्रकाशित केले.
तर हि कथा आहे एका कुटुंबाची त्यातल्या मुख्य माणसाला अर्थात कर्त्या पुरुषाला सायकल चालवण्याचं भरपूर वेड आहे. त्याचं हे वेड बघून त्याचा मुलगा देखील त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून सॉरी पॅडल वर पॅडल मारून ते वेड सार्थ ठरवतोय. सायकल चालवणं तब्येतीसाठी कसं चांगलं आहे हे पटवून या माणसाने त्याच्या बायकोला देखील नादी लावलं आहे. आता जमेल तेव्हा हे तिघे जण सायकलवरून चकरा मारत असतात. तर हि अशी वेडी ‘’The Cycling Family’’ म्हणजेच आम्ही तिघे… मी, नवरा श्रीनिवास नि मुलगा ईशान (वय वर्ष ८ पूर्ण).

पंखा

लेखक मायमराठी यांनी शुक्रवार, 03/01/2020 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
।। पंखा ।। एप्रिल- मे मधील दहावीचे सुट्टीतले वर्ग सुरू होते. गरागरा फिरणाऱ्या पंख्याखाली बसूनही घामाच्या धारा लागलेले विद्यार्थी , त्या धारांशी रुमालांनी लढत होते. मधेच वहीच्या पुठ्ठ्यांनी वारा घ्यायचा फुका प्रयत्न. आजकालचे पुठ्ठेही तसे तकलादूच. मुलंमुली भिजलेल्या चोळामोळा झालेल्या रुमालाने कसेबसे स्वतःला गोळा करत करत अभ्यासाकडे नेत होते. एरवी तसाही गणिताने घाम फुटतोच त्यात उन्हाळ्याच्या नवीन समीकरणांची भर पडली होती! अचानक न जाणे कुठून एक बुलबुल पक्षी खिडकीतून पंख्याकडे झेपावला.

अनुवादित - अनिकेतन

लेखक रोहित रामचंद्रय्या यांनी शुक्रवार, 03/01/2020 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
ओ माझा चेतना ह्वा तू अनिकेतन रूप रूपांना ओलांडून कोटि नावांना पार करून छातीनी चीरून भावचा भाला ओ माझा चेतना ह्वा तू अनिकेतन शंबर धर्मांचा भुसकट पाखडून सर्व तत्वांने मागे सोडून दिगंताचा शेवटपर्यंत चडून ओ माझा चेतना ह्वा तू अनिकेतन कुठेही थांबू नको कधीही घर बांधू नको अंत्याना कधी पोहोचू नको ओ अनंत ह्वा ओ माझा चेतना ह्वा तू अनिकेतन अनंत ही अनंत होवत तो नित्ययोगी अनंत तू अनंत ह्वा ह्वा ह्वा ह्वा ह्वा ओ माझा चेतना ह्वा तू अनिकेतन - मूल कन्नड राष्ट्रकवि 'कुवेम्पु' अंग्रेजि The Song Of the Universal Man Be unhoused, O my soul ! Only the infinite is your goal. Leave those myriad forms

अनुवादित मंकु तिम्मन कग्ग - १

लेखक रोहित रामचंद्रय्या यांनी शुक्रवार, 03/01/2020 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
गवत ह्वा डोंगरा खाली घराला मोघरा ह्वा दगड ह्वा कष्टांचा पाऊस पडला तरी गुळ साखर ह्वा दीन दलिताला सर्वांत मिसळून जा मंकु तिम्मा - कन्नडा मूल 'डी वि गुंडप्पा'

दिल की बाते

लेखक अनाहूत यांनी शुक्रवार, 03/01/2020 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
खुद को आईने में देखकर जरूर इतराना जिनके हम जैसे दिवाने होते है उनका खुदपर गुरूर करना लाजमी है और हाँ खुबसुरत तो तुम हो ही पर आज तो रोजसे ज़ादा हसीन दिख रही हो क्या करू प्यार ही इतना है के तुझे देखे बिना तेरा चेहरा पढ लेता हूँ इसका मतलब ये ना समझ लेना की तुझे देखे बिना ही खुश हूँ मेरी तो हर सुबह तेरा चेहरा देख कर ही शुरू होती है और तेरा चेहरा देख कर ही सो पाते है हम चैन से मेरा प्यार है तू हमेशा मुस्कुराती रहना तेरा मुस्कुराता चेहरा जीने की वजह है मेरी कभी तेरे चेहरे पे मायूसी ना आने देना मेरी जीने की वजह को मिटने ना देना हा तुझे गुस्सा देता रहूँगा बार बार क्या करू ऐसे ही बहुत हसीन हो पर

जगभर संकल्पज्वराच्या साथीचे थैमान, "कोण" चा इशारा

लेखक चामुंडराय यांनी गुरुवार, 02/01/2020 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
जागतिक स्वास्थ्य संघटना (कोण) यांनी सूचित केल्याप्रमाणे सध्या जगभर संकल्पज्वराची साथ आलेली आहे. संघटनेने पत्रक काढून असे जाहीर केले आहे की ही साथ अतिशय वेगाने पसरणारी आणि संसर्गजन्य आहे. विशेषतः आरंभशूर मंडळींना ह्या साथीच्या ज्वराची लागण लगेच होते असे निरीक्षण नोंदवले आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कित्येकदा ही लागण सामूहिक असते असे मत व्यक्त केले आहे. या आजारासाठी कोणत्याही उपचाराची गरज नसून फक्त थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल आणि साथीची तीव्रता कमी होत जाईल. सामूहिक लागण असेल तर एक एक सदस्य ह्या आजारातून आपोआप बरे होत अंतिमतः केवळ एक किंवा दोन सदस्यांना उपचाराची गरज असेल.

बोलती बंद

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 01/01/2020 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे चाळीसगावच्या काकांना फोन करावा, असं मला दोन तीन दिवसांपासून वाटत होतं. असं अचानक आठवण येण्याचं कारणही समजत नव्हतं. आज रविवार. वेळ आहेच आता दुपारी तर करूया फोन असं वाटून फोन लावला. रेकॉर्ड ऐकू आली, ‘या नंबरची सेवा तात्पुरती बंद आहे.’ दोन तीन वेळा प्रयत्न केला. तेच तेच ऐकू यायचं. आधी मराठी मग हिंदी नंतर इंग्रजी. नंबर बंद. करू नंतर म्हणून डोक्यातून विषय बाजूला केला. यालाही दोन तीन दिवस झाले म्हणून पुन्हा एका संध्याकाळी फोन करून पाहिला. आताही नंबर बंदच. बायकोला सांगून ठेवलं, ‘चाळीसगावचा फोन लँडलाईनवरून ट्राय करत रहा.

ही वाट भटकंतीची : आठवण आणि उजळणी २०१९

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 31/12/2019 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
आज २०१९ चा शेवटचा दिवस, या वर्षातल्या घटना मागे वळून पाहताना छान वाटते आहे. लिखानाचे म्हंटला तर राजकीय आणि त्याच बरोबर सामाजिक मुद्द्यांमुळे मी पुन्हा मनातले बरोबर चुकीचे विचार शब्दात उतरवू लागलो... कविता , लेख हे जरी मी लिहित असलो तरी लिखान हा माझा मेन छंद कधीच नव्हता आणि नसेलही. त्यामुळेच कदाचीत, माझ्या लेखांवरील विरोधी मतांना मी कधी तावातावाने, हमरी तुमरीवर उत्तरे दिली नसतील. आणि हे माझ्या स्वभावाच्या कदाचीत उलटे आहे :). शब्दांना कदाचीत चेहरा चिकटला की ते अहंकाराचे रुप बनत असावेत ... येथे शब्द, लेख आणि लिखान हे माझे विचार असले, तरी त्यावर माझाच चेहरा उमटला आहे असे माझे मतच नाही.

फिटेल का हे ऋण माझे

लेखक खिलजि यांनी मंगळवार, 31/12/2019 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
फिटेल का हे ऋण माझे विवंचना आत दाटली याच काळजीने मीच माझी वर जागा शोधली रोप मीच लावले बघून स्वप्न उद्याचे काय ठावं , याच जागी इथेच सुळी चढायचे रोज रोज तोच सूर्य तीच आग ओकतो रोज रोज मीच का पण ? तेच तेच भोगतो मीच जर का अन्नदाता रिक्त का रे चूल माझी ? घेतला नांगर हाती हीच का रे भूल माझी ? ऐकतो सरकारनामे अभय कर्जांना दिले फासली पाने पुन्हा ती भाव तैसेच राहिले ===================== सिद्धेश्वर विलास पाटणकर

लहरी (waves): द्रव्यांमधल्या धडकांचे बातमीदार (The Reporters of Interaction among elements)

लेखक अनिकेत कवठेकर यांनी मंगळवार, 31/12/2019 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
(*** मागील लेखाविषयीची  'क्वांटम फिजिक्स किंवा 'तळ्यात की मळ्यात' फिजिक्स (..Why Quantum Physics is also the Probabilistic Physics)' टीप तळाशी आहे.) राजा विक्रमाचं राज्य जुनं, राजदरबाऱ्यांची आणि प्रजाजनांची निष्ठा प्रबळ, प्रजेचा राजावर, राज्याच्या तत्वनिष्ठतेवर नितांत विश्वास.. राज्य टिकणे, राज्याची संस्कृती टिकणे, राज्याचे भूप्रदेश शत्रूला न गिळता येणे, बाहेरील आक्रमकांना, आक्रमणांना तोंड देऊनही न डगमगणे, फुटीरांना फार वरचढ न होऊ देणे या सर्वात राजाचा नाही तर प्रजेचा मोठाच वाटा..