दोसतार - ४२
घण घण घण. तीन टोल पडले. दुसरा तास संपून तिसरा तास संपायची घंटा. आता तर परतीचा कोणताच विचारही करणं शक्य नाही. चालायचं तर फक्त वर्गाच्या दाराच्या दिशेने वर्गात जाण्यासाठी. एल्प्या पण फळा पुसून बाहेर येण्यासाठी निघालाय.
मागील दुवा
http://misalpav.com/node/46196
एल्प्या वर्गाच्या दारापर्यंत आलाय. त्याचे माझ्याकडे लक्ष्यही नाहिय्ये. मी त्याला काय तास कसा झाला हे खुणेने विचारले. पण त्याकडेही त्याचे लक्ष्य गेले नाही. एल्प्याचा चेहेरा इतका टेन्शन मधे असलेला कधीच पाहिला नव्हता. एल्प्याला काहीतरी जाम टेन्शन आलेय.
मिसळपाव
