आकाशात तार्याचा स्फोट- ल्युपस तारकासमूहामध्ये सुपरनोव्हा
स्फोटामुळे 50 लाख पट तेजस्वी झालेला तारा डोळ्यांनी दिसू शकेल
सुपरनोव्हा (अति नवतारा) म्हणजे तार्याचा स्फोट होण्याची स्थिती. तार्यांच्या जीवनक्रमामध्ये शेवट होण्याची एक शक्यता असा स्फोट ही असते. तार्यांचं युगुल (पेअर) असेल व एक तारा खुजा (ड्वार्फ) असेल किंवा तार्याचं वस्तुमान जास्त असेल तर असा स्फोट होतो. स्फोट झालेला तारा दक्षिणेकडच्या वृक म्हणजे ल्युपस (Lupus) तारकासमूहातला +22.3 प्रतीचा तारा होता. त्याचा स्फोट झाल्याचं 12 जूनला लक्षात आलं.
साहित्य, ललिता आणि पुरचुंडीभर राख !
साहित्य असाच एका रविवारी फेसबुकवर चाळवाचाळव करत असताना त्याला त्या ३.५ बीएचके फ्लॅटची जाहिरात दिसली. एका बंगल्याच्या पुनर्विकासानंतर सहकारनगर सारख्या सभ्य आणि सुसंस्कृत भागात असलेला फ्लॅट "निदान बघून तरी येऊ" असे म्हणून तो, ललिता आणि लेखना तो फ्लॅट बघायला गेले.
चकाचक इमारत,
२ कार पार्किंग्स.. आणि तेही अगदी लांब लचक कार सहज आत बाहेर येऊ जाऊ शकेल अशा..
प्रशस्त हॉल ... सॉरी सॉरी - लिविंग रूम... मोठाल्या बेडरूमस ....
वॉशिंग मशीन आणि डिश वॉशर सहज बसेल आणि तरीही जागा उरेल असे स्वयंपाकघर ... सॉरी सॉरी - मॉड्युलर किचन ...
प्रत्येक बेडरूमला मध्यम बाल्कनी ..
लिविंग ला मोठ्ठी गॅलरी ...
फाया
"कृबु (*)व्यापित या जगी अता तुज स्थान काय उरते ?
मनात येता क्षणार्धात मग इच्छित अवतरते !
काव्य, नाट्य, शिल्पे, चित्रे अन् जटिल अधिक काही
गरज तुझी यासाठी कशाला?
मूक चित्रपट
गेल्या काही दिवसात चार मूक चित्रपट बघितले.
१ A Trip To The Moon.
2 The Last Laugh
3 The Cabinet of Dr. Caligari (1920)
4 Metropolis
प्रत्येक सिनेमा साठी स्वतंत्रपाने लिहावे लागेल.
आत्ता फक्त A Trip To The Moon. बद्दल लिहितो. ही फिल्म जॉर्ज मेलीएसने दिग्दर्शित केली आहे. जॉर्ज मेलीएस हा एक प्रसिद्ध जादुगार होता. ही film १९०२ बनवली होती. त्या आधीचे "सिनेमे" दोन तीन मिनिटांचे असत. ही film तब्बल साडे बारा मिनिटांची फीचर film आहे. म्हणजे ह्या सिनेमाला कथा आहे. वर ही पहिली वहिली Sci Fi film मानली जाते. ज्युल्स व्हर्न च्या कथेच्या कल्पना ह्यात वापरल्या आहेत.
यंदाचा पाऊस .
पाऊस यंदा खरच माझ्या, मनासारखा पडतोय .
इकडे तिकडे पळता पळता मध्येच . . , आंगणात थबकतोय !
बराच चिखल मग बरेच उन्ह
मग मधेच रिपरिप , टाकते नाहवून
निसरडा कधी , गच्च ओला
क्षणात रस्ता भिजवतोय !
पाऊस यंदा खरच माझ्या ,मनासारखा पडतोय . ॥ १ ॥
गच्चीत कधी तोच एकटा , मी मोठा तो धाकटा ,
तरिही अंगावर आणवून काटा
मोठ्या भावासारखा घाबरतोय !
पाऊस यंदा खरच माझ्या , मनासारखा पडतोय . ॥ २ ॥
पाऊस कधी छपरावर नाहीतर गटारातल्या डुकरावर
त्याची मर्जी फिरेल तसा हवं त्याच्या नशिबावर
स्वतःची शक्ती पाऊस दाखवून
"मीच परमेश्वर" , म्हणतोय
पाऊस यंदा खरच माझ्या, मनासारखा पडतोय .
काव्यरस
मिसळपाव