Skip to main content

लाल रंगाचं विमान- बालकथा

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी मंगळवार, 09/06/2020 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
---------------- चित्रक यक्षाच्या कथा ------------------------------ लाल रंगाचं विमान- बालकथा ------------------------------------------------------------ त्या एका मोठ्या प्रदर्शनाच्या बाहेर बिशन उभा होता. तो एक साधा मुलगा होता . केसांना भरपूर तेल लावून चोपून बसवलेला . खांद्याला पिशवी लटकवून , खेळण्यातली उडणारी विमानं विकण्यासाठी . त्याच्याबरोबर आणखी बरीच मुलं होती, पण ती त्याच्यापेक्षा मोठी होती. सगळेच काही ना काही विकत होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रदर्शनाला गर्दी होती . त्या लोकांचा एक मालक होता. रोज त्याच्याकडून माल घ्यायचा, तो विकायचा व त्याला हिशोब द्यायचा.

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग १ - स्वरूपबोध: प्रकरण १ - 'स्व' चे मूळ स्वरूप

लेखक मूकवाचक यांनी मंगळवार, 09/06/2020 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
'द सेल्फ' किंवा स्व-स्वरूप ही संकल्पना भगवान रमण महर्षींच्या बोलण्यात वारंवार येत असे. पावसच्या स्वामी स्वरूपानंदांच्या लेखनातही 'स्वामी म्हणे लाभे अवीट आनंद, लागलासे छंद स्वरूपाचा' या सारखे उल्लेख ठिकठिकाणी आहेत. रमण महर्षींनी उल्लेख केलेल्या स्वरूपाच्या बाबतीत पुढील गोष्टी लक्षात घेण्याजोग्या आहेतः 'स्वरूपाचा' अर्थ आपले व्यक्तिमत्व असा नसून ती संकल्पना एका निर्वैयक्तिक आणि सर्वसमावेशक अशा विशुद्ध चैतन्याच्या अखंड अनुभूतीकडे इशारा करते.

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: प्रस्तावना

लेखक मूकवाचक यांनी मंगळवार, 09/06/2020 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
भगवान दक्षिणामूर्ती आणि भगवद्पाद पूज्य श्री आदि शंकराचार्य प्रणित अद्वैत वेदांताची परंपरा अखंड ठेवणार्‍या, तसेच आधुनिक काळाशी सुसंगत पद्धतीने 'आत्मविचार' या साधनापद्धतीचे पुनरुज्जीवन करणार्‍या भगवान श्री रमण महर्षीं या लोकोत्तर ज्ञानी सत्पुरुषाविषयी मराठी भाषेत फारसे साहित्य उपलब्ध नाही.

ऑटोग्राफ -- भुतकाळाला सामोरे जाताना

लेखक सिरुसेरि यांनी मंगळवार, 09/06/2020 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
ऑटोग्राफ -- भुतकाळाला सामोरे जाताना --------- या कथेतील नायक आपल्या जीवनामधे अनेक टप्प्यांवर भले बुरे अनुभव घेउन आता आयुष्यात स्थिरावला आहे . त्याचे लग्नही ठरले आहे . आपल्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका घेउन तो जिथे त्याचे शाळेतील शिक्षण झाले त्या गावी निघाला आहे . गावाकडे जाणा-या कॅनॉल रोडवरुन चालताना त्याच्या मनात या गावातील शालेय जीवनातील आठवणी उलगडत आहेत .

फुलपाखरू

लेखक मन्या ऽ यांनी मंगळवार, 09/06/2020 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
फुलपाखरू एक होते रंगेबेरंगी फुलपाखरू .. त्याचे 'मन' ऐसे नाव.. ईवलेसे नाजुक पंख तयाचे त्यावर सुंदर नक्षी संस्कारांची. फुलपाखराच्या पंखावरचे काही रंग लाल-गुलाबी स्वप्नांचे बालपणीच्या आठवणींचे उमलणार्या फुलांचे चांदण्या रातींचे तर काही रंग आहेत.,मात्र निळे-काळे नको त्या कटु आठवणींचे भळभळत्या जखमांचे चुलीतल्या विस्तवाचे.. त्याच कटु आठवणींने बळ तयाच्या पंखास दिले संकटावर मात करुन त्यास नव्या उमेदीने जगण्यास शिकवले!.. -दिप्ती भगत (१३जून, २०१९)

बॉयकॉट चायना विथ वॉलेट, नॉट द बुलेट !

लेखक संजय क्षीरसागर यांनी मंगळवार, 09/06/2020 01:31 या दिवशी प्रकाशित केले.
सोनम वांगचुक यांनी एबिपी माझाला दिलेली ही मुलाखत सर्व भारतीयांना विचार करायला लावणारी आहे. त्यांचे सर्व मुद्दे निर्विवाद आणि पटण्याजोगे आहेत. विषेशतः 'बॉयकॉट चायना विथ वॉलेट, नॉट द बुलेट' हे अभियान भारत सरकारच्या मर्जीवर अवलंबून नसून, भारतीयांच्या सहभागावर आणि त्यांच्या दृष्टीकोन बदलावर अवलंबून आहे. शिवाय हे अभियान भारतीयांच्याच नव्हे तर प्रचंड दडपशाहीखाली भरडल्या जाणार्‍या चिनी नागरिकांच्

बाल्कनीत ओला कचरा कुजवणे

लेखक कंजूस यांनी सोमवार, 08/06/2020 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
घरातला ओला कचरा हा कुजल्यावर झाडांसाठी उत्तम खत आहे. झाडं लावताना आपण कुजलेले खत बुंध्याशी देतो किंवा कुंडीत माती भरताना त्यात मिसळतो. बाल्कनीत झाडे ठेवताना कुंडीत झाडाभोवती कुजलेली तयार झालेली खत- माती टाकली की फुलझाडे, वेलभाज्या चांगल्या वाढतात. पण कचऱ्यातून ते कुजलेले खत होण्यासाठी कुठेतरी तयार करावे लागते आणि कमीतकमी तीन महिन्यांचा काळ. मोठा प्लाट अथवा गच्चीवरील जागा असेल तर हे करणे सहज शक्य आहे.

गनिमी कावा

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 08/06/2020 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
``तू पहिल्यासारखा राहिला नाहीस.`` पहिल्याच वाक्यानं त्याचं कामातलं लक्ष उडालं. ``आता काय झालं?`` त्यानं काळजीनं विचारलं. ``काही नाही. जाऊ दे.`` तिनं दोनचार तोंडवाकडे, लालबुंदे, भुवईउडवे इमोजी टाकले. अशा प्रसंगी काय करायचं असतं, हे त्याला लग्नाच्या दहा आणि व्हॉट्स अपच्या सहा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवानंतर नीटच माहीत झालेलं होतं. ``अगं सांग ना, काल तुला फोन केला नाही, त्याचा राग आलाय का तुला?`` ``कालचं काय विशेष? हल्ली फोनच करावासा वाटत नाही तुला! चॅट करायलाही वेळ नसतो!`` ``….`` ``आता काही बोलणार नाहीस, माहितेय मला. मी इकडे एकटी असते, सगळं घर सांभाळते, काही कुरकुर न करता.

पन्नाशीचा टप्पा

लेखक मनोज यांनी सोमवार, 08/06/2020 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
आता आता दादा होते कसे मग काका झाले तरुणाच्या यादी मध्ये बघा किती मागे गेले दिसते आहे टक्कल पांढर्‍या झाल्या मिश्या हळू हळू मोठ्या होती कश्या प्रौढत्वाच्या रेषा शत्रूवर येऊ नये तो प्रसंग येतो असा तिशीची बाई म्हणते काका जागा आहे बसा पटापट हातातून आयुष्य जात पळून पन्नाशीचा टप्पा आला मागं पहावं वळून काय काय राहिलंय केली पाहिजे यादी काय माहित कधी धरावी लागेल गादी तू लक्ष नाही द्यायचे कुरबुर केली कुणी ऐकत बसावं मस्त आवडती गाणी जुनी कारणाशिवाय एक टाकून द्यावी रजा पोरा सोबत आपल्या खूप करावी मजा खर आहे घरासाठी तर झिझल पाहिजे एकदा सरीत पण चिंब भिजलं पाहिजे राहिलं असेल बघ ते डोंगर

ओला कचरा निर्मूलन- इच्छा आणि त्रास

लेखक जेडी यांनी सोमवार, 08/06/2020 01:15 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात सद्या महत्वाची समस्या म्हणजे घनकचरा आहे . अर्थातच कचरा निर्मूलन जिकिरीचे होऊन बसले आहे. आजकाल साफसफाई कामगारांना सोसायटीत वरच्या मजल्यावर प्रवेश नाही . रोज कचरा खाली नेवून टाकावा लागत आहे. बरेच लोक आता हे सर्व स्वतःच करत असले तरी प्लॅस्टीकच्या पिशव्यात भरून तशीच पिशवी टाकत आहेत . ती ओल्या कचऱ्याच्या डब्यात जरी ओतली तरी निम्मा अर्धा ओला कचरा त्या पिशवीला चिकटून सुक्या कचरायच्या डब्यात जात आहे. खरे पाहता प्रत्येक घराने आपला ओला कचरा घरातच जिरवला पाहिजे, असे महापालिका सांगत आहे . अनेक ठिकाणी काही दिवस महापालिका कचरा उचलत नाही आणि घाणीचे साम्राज्य पसरते.