वादळ
छप्पर उडून गेल्यानंतर
पाऊस घरात येतो
तोंडचा घास नाहीसा होतो
भणाणता आलेले वादळ
सारं उध्वस्त करीत जातं
वाटेत येईल ते पाडत जातं
मग ते काहीही असो
घर खांब छप्पर झाड माड
आणि मनही.
काव्यरस
सोपान, नामदेव आणि विकासने पंढरपूर सायकल वारीचे भगवे टीशर्ट घातले होते. विकासचा पाय दुखत होता. पण जिद्द कायम होती.कोण काय म्हणेल त्याला म्हणु देत म्हणत. आपल्या मनातल्या मनात हसण्याने ही ती शांतता मोडायची. ही शांतता डबीत साठवून ठेवता यायला हवी. आपल्याला हवी तेंव्हा बाहेर काढून अत्तरासारखी श्वासात घेता यायला हवी. खूप वेळ गेला सगळे गप्पच होते. कोणालाच ही शांतता मोडावेसे वाटत नव्हते. दरीतून येणार्या वार्यामुळे आमच्या चेहेर्यावर आलेला घामही थंडगार झाला. झेंड्याच्या दगडी बुरुजावरून खाली दरीच्या उतारावर पुढे समोर दरीच्या मधोमध दिसणार जयगड तानुमामाने दाखवला .