Skip to main content

व्हिडिओ अभिवाचन:-गुरुजींचे भावविश्व-प्रस्तावना व भाग १

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 18/06/2020 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
खुला-सा:- हे व्हिडिओ अभिवाचन फेसबुक वर सुरू केलेले आहे.ते इथे देत आहे. फेसबुक वर केलेले असल्यामुळे त्या हिशोबानी मनातून आलेली ही प्रस्तावना आहे. आपण मिपाकरांनी माझ्या गुरुजींचे भावविश्वला अलोट प्रतिसाद दिलात. आता या वरील प्रस्तावनेसह केलेल्या पहिल्या भागाच्या अभिवाचनासाठी आपल्या अभिप्रायांच्या प्रतीक्षेत आहे.

अंतर

लेखक aanandinee यांनी गुरुवार, 18/06/2020 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
तुझं माझं हे दूर असणं जसे नकाशावरचे दोन ठिपके. आठवण करून द्यायला जणू, की कितीही म्हटलं तरी झालोय परके. तुझ्या माझ्या ठिपक्यांना, जोडणारी ती रेषा नकाशात ती दोघांमधलं अंतर दाखवते. पण सरळसोट नाहीच ती, नात्यांसारखी तीसुद्धा नागमोडी वळते. मला त्यात नात्याची एक उसवलेली वीण दिसते... डॉ. माधुरी ठाकूर
काव्यरस

हम जल्द ही लौटेंगे एक ब्रेकके बाद.. तोपर्यंत घाला पिठामध्ये तेल..

लेखक आजी यांनी गुरुवार, 18/06/2020 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
जाहिरात जीवनाचं अविभाज्य अंग आहे. फार प्राचीन काळापासून जाहिराती केल्या जाताहेत. त्या आज वाचल्या की हसू येतं. जाहिरातदार सकाळपासूनच आपलं काम सुरु करतात. आपण आंघोळीला कोणता साबण वापरायचा, केसांना कुठलं तेल लावायचं म्हणजे ते'लंबे ,घने,काले'होतील. स्वयंपाकात कुठलं तेल वापरायचं की तुम्ही बटाटेवड्यासारखे चमचमीत पदार्थ नेहमी खाऊ शकाल. जीवनसाथी कसा निवडावा,त्यासाठी कोणत्या डॉट कॉम वर जायचं, गुंतवणूक कुठे करावी, कुठल्या जंतुनाशकानं फरशी स्वच्छ करावी,दात कशानं घासावेत म्हणजे दाताबरोबरच 'मसूडे'मजबूत होतील, क्रिम्स, डायपर, निळा रंग वापरून सँनिटरी पँडस्,चप्पल, शूज, लस्सी, दूध, कुकर,बिस्किट,नाश्ता!

एका खटल्याची गोष्ट - २

लेखक पहाटवारा यांनी गुरुवार, 18/06/2020 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व तयारी झाली. होता करता प्रत्यक्ष कोर्टात जाउन, जज समोर माझी बाजू मांडण्याचा दिवस आला. ------------------------------------------------------------------------------------------- कोर्टात हजर राहण्यासाठी जेव्हा कामावरुन सुटी घेण्याची वेळ आली, तेव्हा मनात परत एकदा विचार आला की आपण उगाच याच्या मागे लागलो आहोत का ? एवढे करुन काही तरी फायदा होणार आहे का? पण बहुदा कुणीतरी आपल्यावर चुकीचा आरोप केला आहे ही कल्पना माणसाला सहन होत नसावी. मी पुन्हा एकवार नीट आठवून पाहिले की आपण अनवधानाने तर सिग्नल तोडला नसेल ना ?

ह्याचं आपलं काहीतरीच..!

लेखक पाटिल यांनी गुरुवार, 18/06/2020 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
ह्याच्या सध्याच्या जगण्याबद्दल किंवा जगण्याच्या नावाखाली किंवा जगणं चालू रहावं, यासाठी हा जो काही करतोय, त्याबद्दल बोलताना ह्याला अवघडल्यासारखं होतं. अर्थात त्यात स्वत:ची शरम वाटावी असं काही नाही.

भावंडं

लेखक मायमराठी यांनी बुधवार, 17/06/2020 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
'निसर्ग' वादळाचे तांडव आणि झाडं यांच्यातलं युद्ध मांडायचा एक छोटासा प्रयत्न... ।। भावंडं ।। उन्हातान्हात राबायची त्यांच्यासमोर वाकायची घामावर पोसतापोसता गडीमाणसं रापायची तुकडा तुकडा ऊन खायची घोट घोट सावली प्यायची सुखदुःख कष्टात मिसळून मजुरीही तरतरुन यायची नावं ठेवली होती त्यांना अर्थबिर्थ नव्हता तरीही कळत होत्या हाका त्यांना प्रेमाSनं 'ओ' म्हणायची छप्पर होऊन छायेत मावली खिशांमधल्या मायेत दिसली अन्न होऊन कायेत मुरली श्वास बनून प्राणांत विरली परवाही पर्वा न करता "निसर्गा"शी झुंजत होती विव्हळत होती कण्हत होती वाकता वाकता मोडत होती सड्यांचे सोहळे संपले ऊर्जेचे उत्सव नुरले चैतन्याचे चेव था

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ४ - ध्यान आणि योग: - प्रकरण १3 - योगिक प्रक्रिया

लेखक मूकवाचक यांनी बुधवार, 17/06/2020 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
या प्रकरणात भगवान रमण महर्षींचे योगिक प्रक्रियेविषयीचे मार्गदर्शन आपण जाणून घेणार आहोत. डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे: ढोबळमानाने पाहता आत्मा किंवा ईश्वरी सत्तेपासून आपण विभक्त झाल्याचे (वियोग) जाणवत असल्यामुळे देह आणि मनाला वळण लावण्यासाठी नानाविध पद्धतींचा अवलंब करून आत्मतत्वाशी किंवा ईश्वरी सत्तेशी पुन्हा एकदा संलग्न होणे किंवा 'योग' साधणे हे योगमार्गी साधकांचे ध्येय असते. अंदाजे २००० वर्षांपूर्वी महर्षी पतंजलींनी रचलेल्या योगसूत्रांवर आधारित योगपद्धती 'राजयोग' या नावाने प्रसिद्ध आहे.

दोघांत सांडलेला अंधार मी गिळालो.

लेखक कौस्तुभ भोसले यांनी बुधवार, 17/06/2020 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
दोघांत सांडलेला अंधार मी गिळालो. चंद्रास वाहिलेल्या रात्रीस मी मिळालो. काळीज फाटले तेव्हा आसवे गळाली. हा काळ त्या स्मृतींचा सोडून मी पळालो. पाऊस वाजताना पाण्यात मी भिजावे. तेव्हाच वाटलेले वाहून दु:ख जावे. अस्तित्व सांधताना अंधारली निळाई. विश्रब्ध वेदनांच्या ओघात मी जळालो. माझ्याच भावनांना माझाच स्पर्श झाला. संदिग्ध जाणिवांचा आकांत फार झाला. हे फोल खेळ सारे प्रारब्ध झाकण्याचे. स्वप्नांध प्राक्तनांना मोडून मी निघालो. -कौस्तुभ वृत्त- आनंदकंद

कळ्या..

लेखक मनोज यांनी बुधवार, 17/06/2020 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
जपल्या होत्या ओंजळ भरून कळ्या परसातील वेलीवर तुला फुले देण्यासाठी दंवाचे माळून मोती लेऊन वसने अंगभर सोनेरी किरणांची सजल्या होत्या कळ्या पाकळ्या पाकळ्यांत भरून गडद रंग करून साठवण सुगंधाची कळ्यांचे फुले झाली भरली ओंजळ रिते अंगण आणि दारावर मोठे कुलूप गाव सोडून गेलेली तू आत्ताच कळले मला हातातली फुले आपसूक सांडली अंगण भर त्यांनी रांगोळी मांडली झेलत मा‍झ्या आसवांचे मोती क्षणात फुल झाली निर्माल्य फुले नव्हतीच ती कोमेजली प्रीतीच माझी...

एका खटल्याची गोष्ट

लेखक पहाटवारा यांनी बुधवार, 17/06/2020 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वसाधारण लोक सहसा कोर्ट-कचेर्री करायच्या फंदात फारसे पडत नाहित. माझाहि स्वभाव मूलतः भांड्खोर नाहि अन कोर्ट-पोलिस यांच्या कहाण्या ऐकुन, मी स्वतः कधी या फंदात पडेन असे वाटले नव्हते, अन इतक्या छोट्या गोष्टिकरता तर खचितच नाहि .. पण कधीतरी तुम्हालाच तुमच्या स्वतः विषयी नवीन कळते ! तर .. ही गोष्ट आहे अशाच एका खटल्याची. मला अमेरिकेत येउन एखादेच वर्ष झाले असावे.