Skip to main content

पनीर लबाबदार!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 22/07/2020 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
तो पनिरायण मे अगली रेशिपी है.. पनीर लबाबदार! तर ही पनीर लबाबदार व्हायला आमची होम मिनिष्ट्री च जबाबदार आहे! (लबाबदार..जबाबदार! जमलं की नै यमक,ते आगोबी गमक!.. परत जमलं! काय हे? http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif आगोबानी मारला फेसबुकवर दगड,मन म्हणलं त्याला इथेच रगड!!! आयायाया! परत पडली जिलबी!आणि झालो मी एलबी!.. थांबचत नाही. http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif बुळुक बुळुक बुळुक!

पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग २ )

लेखक दुर्गविहारी यांनी मंगळवार, 21/07/2020 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग येथे वाचू शकता पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग १ ) चारच दिवसांनी नजरबाजांनी खबर आणली, फाझल आणि रुस्तमेजमा कोल्हापुरला आले आणि पन्हाळ्याजवळ सरकायला लागलेत. सदरेवर ठरल्याप्रमाणे हुकुम सुटले. यावेळी गनीमीकावा वापरायची गरज नव्हती. मोकळा मुलुखात शाही फौजेला आयुष्यभर लक्षात राहील असा धडा दिला कि पुन्हा विजापुरकर स्वराज्यावर आले नसते. घोड्यावर खोगीरा चढल्या,नाल मारले गेले,खरारे करुन घोडे सज्ज झाले.मावळे तर मनाने लढाईला आधीच तयार होते.

माझा कोविड अनुभव

लेखक अश्विनी मेमाणे यांनी मंगळवार, 21/07/2020 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
गुरुवार २ जुलै ला नवरा दुपार नंतर डोके दुखिची तक्रार करायला लागला. या वर्क फ्रॉम होम पासून त्याच्या मीटिंग्सचे प्रमाण एकंदरीच वाढले आहे. तो बऱ्याच वेळेस पूर्ण पूर्ण दिवस कॉलवर असतो. मला वाटल कदाचित या कॉल्समुळे त्रास होत असावा. क्रोसिन घेतल्यावर वाटेल ठीक. संध्याकाळी पण त्रास जाणवत होता त्याला अणि ताप बघितला तर ९९ च्या वर होता. अस वाटल की स्ट्रेस मुळे होतय मागच्या महिन्यामधे पण एकदा झाल होत. शुक्रवारी दिवसभर ताप चढत उतरत होता. प्रत्येक ४ तासाला परसटॉमल घेत होता. शेवटी संध्याकाळी एक लोकल डॉक्टरकड़े गेलो. आम्ही या एरियामधे एक वर्षा आधीच शिफ्ट झालोय. फॅमिली डॉक्टर अस काही अजुन झाल न्हवत.

'एवढ्यात संवेदनाच बोथट झाल्याचे दिसते'

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 21/07/2020 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
या धागा लेखाचे आधीची शीर्षके 'पुणेकरांनो, आतातरी भानावर या' दैनिक सकाळच्या हेडलाईन वरून घेतले. प्रतिसादातून वीषाणूशूर बेफिकीर प्रतिसाद बघीतल्या नंतर शीर्षक बदलण्याचा निर्णय घेतला.

दाक्षिणात्य पदार्थ : बिस्कीट अंबाडे

लेखक श्वेता२४ यांनी मंगळवार, 21/07/2020 13:03 या दिवशी प्रकाशित केले.

      मध्यंतरी माझ्या मंगलोरी बन च्या पाककृतीमध्ये कंजूसकाकांनी बिस्कीट अंबाडेची पाककृती विचारली होती. त्याला त्या धाग्यावर प्रतिसाद देण्यापेक्षा इथेच पाककृती लिहीतेय. जेणेकरुन सर्वांना एक नवी पाककृती कळेल. बिस्कीट अंबाडे म्हणजेे आपल्या सोप्या भाषेत उडीद डाळीची भजी. याला बिस्कीट अंबाडे नाव का ? तर या भजीचे वरचे आवरण चावतावा अगदी बिस्कीटासारखा कुरकुर आवाज येतो व अंबाडे म्हणजे गोल आकार. म्हणून याचे नाव बिस्कीट अंबाडे असे पडले. याचा उच्चार मात्र ते बिस्कूट अम्बडै असा काहीसा करतात.

येत नाही...

लेखक अजब यांनी मंगळवार, 21/07/2020 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
हारण्याची* वेळ जोवर येत नाही शक्यता नाकारता तर येत नाही... प्रश्न हा भंडावतो आहे मनाला का कधी प्रश्नास उत्तर येत नाही... हा उन्हाचा दोष की माझा म्हणू मी? सावली माझ्याबरोबर येत नाही... टेकल्यावर रोज डोके, समजलो मी पत्थराला कधिच पाझर येत नाही... चोरले अन तोडले आहे हृदय तू आळ त्याचा पण तुझ्यावर येत नाही... दूरवर आलो कुठे आहे 'अजब' मी? एवढे चालूनही घर येत नाही... (*'हारण्याची'ऐवजी 'जिंकण्याची' वाचायलाही हरकत नाही.)

रंगराज्य -३ सौ शहरी, एक संगमनेरी

लेखक vcdatrange यांनी मंगळवार, 21/07/2020 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल एका लेखावर मित्राची प्रतिक्रिया होती "संगमनेर च्या मातीचा हा गुणच म्हणावा की काय जणू एखाद्या साहित्यिकाने त्याच्या शब्द संपदेच्या रक्ताने ही भूमी जणू काही हजारो वेळा शिंपडून तृप्त केली असावी त्यामुळेच तर तिथल्या गल्लीबोळात बालपण जगलेल्या तुमच्या सारख्या मित्रांकडून अशी काही साहित्यिक मेजवानी अनुभवावयास मिळते की....लाजवाबच....खूप सुंदर..." तसं "कला" प्रकरण घरचंच, वडीलांनी हाती ब्रश धरायचं सोडुनही वीस हुन अधिक वर्ष झाली असतील पण शैक्षणिक क्षेत्रात असताना १९८७ ची स्वातंत्र्य सुवर्णमहोत्सव त्यानंतर किल्लारी भुकंपा सिरीजचे लाईफ साईज ऑईल पेंटींग्ज अजुन जसेच्या तसे डोळ्यासमोर आहेत.

बटाट्याची चाळ, बाजीराव आणि मस्तानी

लेखक कुमार जावडेकर यांनी मंगळवार, 21/07/2020 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
चाळकऱ्यांनी एकजुटीने 'बाजीराव मस्तानी' पाहायला जाण्याच्या घटनेची तुलना फक्त मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावण्याच्या बातमीशीच होऊ शकते. भन्साळी यांनी चित्रपट बनवायला एका तपाहून अधिक वेळ घेतला; पण तो एकत्रितपणे बघण्यासाठी चाळकऱ्यांना जी तपश्चर्या करायला लागली तीही काही कमी नव्हती. अनेकांचा अनेक दिवस हे खरं होईल यावरच विश्वास बसत नव्हता. झालंच तरी सर्व संकटांमधून पार होऊन ती वेळ येईपर्यंत हा चित्रपट डब्यात गेला असेल आणि त्यांना भन्साळी यांनी काढलेला दुसऱ्या बाजीरावाच्या प्रेमलीलांवरचा 'सिक्वल' बघायला लागेल अशी शंका ते व्यक्त करत होते.

<<म्हण दादा दादा खोटे>>

लेखक कानडाऊ योगेशु यांनी सोमवार, 20/07/2020 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
To whomsoever it may concern अगदी हात जोडुन माफी मागुन... प्रेरणा गोरज मुहुर्ता वेळी.. मज देत ते वादा होते? हा घोळ मनात चाले.. म्हण दादा दादा खोटे.. साहवे मला ना जेव्हा सत्ता अन पदाचा विरह.. घेऊन येतो म्हणाला.. दणदणीत पाठिंब्यासह.. घेताना शपथ मी मजला. मग चिमटा हळुच घेतो.. रोज मला उठवाया.. हा प्रसंग स्वप्नी येतो..

शब्दखेळ : विरंगुळा (भाग २)

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 20/07/2020 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ नव्या धाग्यावर स्वागत. नवा खेळ : शब्दव्यूह आणि अंताक्षरी खाली ओळीने नऊ अक्षर समूह दिले आहेत. प्रत्येक समूहातून तुम्हाला एक अर्थपूर्ण शब्द ( दिलेल्या अक्षरसंख्येचा आणि शोधसूत्रानुसार काढायचा आहे). आता पुढे अंताक्षरी अशी चालू होईल: • पहिल्या समूहातून योग्य शब्द निघाल्यावर त्याचे शेवटचे अक्षर पहा. • त्या अक्षराने सुरू होणारा सूत्रानुसार योग्य शब्द दुसऱ्या समुहात आहे.