Skip to main content

कसं शोधायचं?

लेखक माधवी यांनी सोमवार, 01/10/2007 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
आपण आपल्या संगणकावरून ज्या ज्या वेगळ्या वेगळ्या वेबसाईट्स पाहतो, कधी मित्र मैत्रिणींशी वेगवेगळ्या माध्यमाद्वारे चॅट करतो. या सगळ्या गोष्टींचा विदा (डेटा) संगणकावर साठवला जातो. हा डेटा कसा शोधता येतो? याची माहिती कोणी संगणक शास्त्री येथे असतील तर देतील का?

मुक्काम पोष्ट बेजींग

लेखक कोलबेर यांनी सोमवार, 01/10/2007 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
शिकागो एअरपोर्टचे युनायटेड एअरलाइन्सचे टर्मिनल. आम्हा पाच जणांचा कंपू बेजींगच्या नॉनस्टॉप फ्लाइटच्या प्रतीक्षेत. इतक्यात सर्व प्रवाश्यांना रांगेत उभे करून त्यांच्या व्हिसाची तपासणी सुरू केली.

कोकणचा सुपुत्र हरवला..

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 01/10/2007 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
जेष्ठ रंगकर्मी मच्छिंद्र कांबळी यांना मिसळपाव परिवारार्फे विनम्र आदरांजली! आमच्या कोकणचा, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुपुत्र हरवला! तात्या.

निवडणूका, फिल्डींग लावणे, लोकप्रिय (लेखक) बनणे इत्यादी

लेखक सहज यांनी रविवार, 30/09/2007 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
(कृपया आपापल्या चवीनूसार शूध्दलेखन स्व:ता वाढून घ्यावे) आपण कधीकाळी निवडून येऊ! असे कल्पनेत देखील विचार न केलेली मंडळी, आता मात्र जरा विचारमग्न होऊ लागली आहेत. कारण विचारताय? अहो ह्या गणपतीत, एक नवीन हॉटेल नाही का सूरू झालेय. आपल्या पंसदीचे खाणे पुरवणारे क्षुधाशांतीगृह, च्यामारी कूठेच नव्हते. आता रात्री २ वाजता जर का भूक लागली. काहीतरी चमचमीत खावेसे वाटले तर म्हणे "आत्ता बंद आहे, उघडल्यावर या". चक्क शटर डाऊन करून हो! साध पाणी पण नाही दिल. एकदम पुणेरी** पध्दतीने असे कटवले. तेव्हाच ठरवले, साला २४ तास चोचले पूरवले जातील असे हॉटेल काढतो की नाय बघा.

गणेशस्तोत्र (संस्कृत रचना)

लेखक अशोक गोडबोले यांनी रविवार, 30/09/2007 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी संस्कृत भाषेत एक स्तोत्र रचले होते ते येथे देत आहे. ओमित्येकाक्षरं ब्रह्म I निर्गुंणारंभमूलकम् I पूर्णात्मरूपबोधाय I ओंकाराय नमोनम: II १ II देव त्वं हि गणाधीश I कवीनां कविपुंगव I ईशावास्य महामंत्रे I मनीषी कविरुच्यते II २ II गणेशोऽपि गुणेशस्त्वं I विराट गणनायक I सर्वसिद्धिफलस्वामिन् I ऋद्धिसिद्धिविनायक II ३ II मगलाचरणं नित्यं I वैदिकानां परम्परा I कार्यादौ स्तुवते त्वां च I ऋषयो मूलकारणम् II ४ II भयं कृतान्तकालस्य I एकदन्ताग्रविग्रहात् I विघ्नान्तकाय शान्ताय I प्रणवाय नमोनम: II ५ II ज्ञानाग्निनर्तनालोके I धृवं विश्वार्तिनाशनम् I मूलमध्याग्रपश्यन्तौ I सूक्ष्मोन्मेषा
Taxonomy upgrade extras

चांदोबा

लेखक आजानुकर्ण यांनी शनिवार, 29/09/2007 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी हे कोडे लिहिल्यावर "का रे अजून चांदोबा वाचतोस का?" असं कुणीतरी मला विचारलं होतं. त्यावेळी उगाचच चांदोबाची आठवण येऊन पिसं उधळल्याप्रमाणं झालं. खरंच लहानपणी एका वेगळ्याच दुनियेत नेणार्‍या या अद्भुत पुस्तकाबद्दल अजून कोणी कसं बरं लिहिलं नाही?

झटपट स्तोत्ररचना - पहिला धडा (मोफत)

लेखक धनंजय यांनी शनिवार, 29/09/2007 02:43 या दिवशी प्रकाशित केले.
नमाम्यहं सरस्वतीम् ******************* सुशुक्लवस्त्रधारिणीम् सुमन्दहासहासिनीम् । सुतन्तुवाद्यवादिनीम् नमाम्यहं सरस्वतीम् ॥ १ ॥ उमेशसन्निधाम् उमाम् रमेशसन्निधाम् रमाम् । हिरण्यगर्भयोषिताम् नमामि बुद्धिदेवताम् ॥ २ ॥ अगाधवाहिनीम् नदीम् प्रबोधतोयदायिनीम् । मनःसरोजवर्धिनीम् नमामि वेदवादिनीम् ॥ ३ ॥ मुनीन्द्रदेववन्दिते सुबुद्धिदे विशारदे | जडत्वमूढसेवकं हि पाहि देवि शारदे ॥ ४ ॥ ******************* या अखंड स्फूर्ती देणार्‍या विद्यादेवीवर हे इतके स्फूर्तिशून्य गीत कसे रचले त्याचे विच्छेदन सांगतो. झटपट स्तोत्ररचना - पहिला धडा (मोफत) चला मुलांनो, आप

चोचले

लेखक सहज यांनी शुक्रवार, 28/09/2007 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रस्तावना - प्रा.डॉ. बिरूटे सरांनी उपक्रमावर "मराठी साहीत्यातील स्त्रीवाद" चर्चाप्रस्ताव मांडला तो व त्यातील प्रतिसाद वाचून हे स्फूट. वाटल्यास आधी मूळ चर्चा वाचून घ्या. "मध्यमवर्गीय पांढरपेश्या" मनाला अश्लील वाटू न देता "प्रौढांसाठी" लेखन करता येईल का? हा स्वत:ला दिलेला चॅलेन्ज. भावना दुखावल्या असतील तर माफी तसेच हा संवैधानीक इशारापण समजा. आगे आपकी मर्जी. शुध्दलेखन तुमच्या मनासारखे जमले असते तर आम्हालाही आवडले असते, पण तेवढ घ्या सांभाळून.) मित्रपरीवारासाठी लिखाण करताना कशाला हवाय काटेकोरपणा? सांभाळून घेतील, काही कमी जास्त असेल तर सांगतील.

म्हातारी इतुकी न अवघे ७८ वयमान!

लेखक विकास यांनी शुक्रवार, 28/09/2007 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
६६ वर्षे सतत गात चित्रपट सॄष्टीत स्वतःचे नाव कायम ठेवलेली कदाचीत एकमेव व्यकी ठरणार्‍या लता मंगेशकर यांना आज ७८ वर्षे पूर्ण झाली. आता तीच्या आवाजातील (नवीन) गाणे आवडते का नाही हा एक वेगळाच मुद्दा होत असला तरी त्यामुळे त्यांचे महत्व कमी होत नाही.

फाऊंडेशन

लेखक विकास यांनी शुक्रवार, 28/09/2007 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख माझ्या अनेक आवडत्या पुस्तकातील एका पुस्तकाबद्दल आहे. धनंजय यांचा शंकराचार्यांवरील समतोल लेख वाचल्यावर, "फाऊंडेशन" आठवले आणि जरा वेगळे लिहावेसे वाटले ते... माझ्या आवडत्या पुस्तकाची मालीका (त्यातील पाच मुख्य पुस्तके): फांऊडेशन, फांऊडेशन अँड एम्पायर, सेकंड फांऊडेशन, फाउंडेशनज एज आणि शेवटी फांऊडेशन अँड अर्थ (प्रुथ्वी). ही मालीका आयझॅक ऍसिमोव्ह या सुप्रसिद्ध विज्ञान कादंबरीकाराने लिहीली आहे. खाली शक्य तितके थोडक्यात या आवडत्या पुस्तकांविषयी लिहीतो: (आठवणीतून लिहीत आहे, तेंव्हा चु. भू. द्या.