चोचले
(प्रस्तावना - प्रा.डॉ. बिरूटे सरांनी उपक्रमावर "मराठी साहीत्यातील स्त्रीवाद" चर्चाप्रस्ताव मांडला तो व त्यातील प्रतिसाद वाचून हे स्फूट. वाटल्यास आधी मूळ चर्चा वाचून घ्या. "मध्यमवर्गीय पांढरपेश्या" मनाला अश्लील वाटू न देता "प्रौढांसाठी" लेखन करता येईल का? हा स्वत:ला दिलेला चॅलेन्ज. भावना दुखावल्या असतील तर माफी तसेच हा संवैधानीक इशारापण समजा. आगे आपकी मर्जी. शुध्दलेखन तुमच्या मनासारखे जमले असते तर आम्हालाही आवडले असते, पण तेवढ घ्या सांभाळून.)
मित्रपरीवारासाठी लिखाण करताना कशाला हवाय काटेकोरपणा? सांभाळून घेतील, काही कमी जास्त असेल तर सांगतील. रोज जाणवतय, वाचनभूकेने सगळेजण येतात, पण डबा फारच थोडेजण आणतात. बाकीचे एकच का होईना, घास खात असतात.
भूक रोजच लागते, संगणक सूरू केला रे केला तिकडे जायची उबळ तर विचारू नका, पावले आपोआप वळतात. आपण पण काहीतरी नेले पाहीजे, नेहमीच कसे मोकळ्या हाताने जायचे. वा वा! छान झालेय म्हणून बोटे चाटतो. पण मस्त डिश करून काही पूढे मांडत नाही. सगळे देखते रह जायेंगे असा काही तरी पदार्थ हा नेलाच पाहीजे. माझ्या कल्पनाशक्ती आईने काही तरी मला छान पदार्थ करूनच दिला पाहीजे असा की सगळ्यांना आवडला पाहीजे. म्हणजे सर्वसमावेशक, सर्व भावना असलेला "यू" सर्टीफीकेटवाला सिनेमा सारखा का? . नाही "यू/ए" असा चालेल, बरेच जण म्हणत असतात की त्यांच्याकडे असा बघत नाहीत पण त्यांना कोणी "यू/ए" किंवा "ए" जरी लावला तरी हरकत नाही. मागे घाटपांडयांनी नाही का एक कलात्मक एकपात्री नमकीन आणला होता. चांगला होता असे सगळेजण म्हणाले, सगळ्यांनी चाखला.
त्याच अस आहे, आमच्याकडे नेहमी साखर, गूळ असलेलाच स्वयंपाक होतो पण वेळ आली की झाडून सगळ्यांना चमचमीत पदार्थ कसे काय आवडतात/ हवे असतात बुवा. पण आधीच सांगतो, मला जास्त तिखट खायची सवय नाही, पोटाला दुसर्या दिवशी त्रास होतो. मला स्वतःला आवडते गोड म्हणजे बहूतेक आजवर तेच खात आलोय, आम्हाला तेच वाढल गेलय, पण चमचमीतचे आर्कषण काही औरच!
ठीक आहे नेहमी सारखा लाडू, शिरा, शेवयाची खीर, शिक्रण, शंकरपाळ्या नाहीच अगदी चॉकलेट, के़क, आइस्क्रीमपण (बाहेरून विकत आणलेले) नाही. आपण नॉनवेज डीशच स्वतः बनवायची व न्यायची. बाहेर खातोच की फक्त आता घरी बनवून न्यायची. कल्पनाशक्ती आई म्हणाली की बघ आता तू मोठा झाला आहेस, यापूढे तुझा तूला स्वै:पाक जमायला हवा. मला जेवढे येते तेवढे शिकवले मी. तूच रेसीपी बघ, तुला तुझ्या मित्रांना काय आवडते ते तूलाच माहीती आहे तर तसे बनव. सांभाळ हो, आता मी ह्या स्वयंपाकघरातून निवृत्ती घेणार. सांभाळ.
हं एका फटक्यात ती हे म्हणून मोकळी झाली. ती स्वतः स्वतंत्र झाली की मला स्वातंत्र्य देऊन गेली काहीच कळेना. बापरे परीक्षेची घडी म्हणतात ती आलीकी, आता रे काय करायचे? आयुष्यात गृहीत धरलेल्या गोष्टी जेव्हा एका क्षणात नाहीश्या होतात, तेव्हाची ती हतबलता वेळ आल्याशिवाय कळायची नाही. आता मित्रांना चमचमीत पदार्थ कसा द्यायचा. सरळ बाहेरून विकत आणून देऊया ना. कोणाला कळतय, घरातल्या डब्यातून नेऊया. नको एकेक तय्यार खवय्ये आहेत क्षणार्धात ओळखतील कूठल्या हॉटेल, धाब्या, खानवळी, रेस्टॉरंट मधून आणलेय.
काय तू स्वतःला खवय्या समजतोस. वेगवेगळे खाल्ले म्हणतोयस अगदी सर्व प्रकारच्या चवी अनुभवल्या आहेस, एक डिश बनवता येत नाही. सगळ जादा मेहनत न करता अचानक समोर मिळाल की असेच होते. समज की तुला एखाद्या निर्मनूष्य बेटावर टाकलेय व आता तूझे तूला जगायचे आहे. हॉटेल नाही, की ग्रोसरी शॉप नाही. जंगल आहे निर्सग व तू....
आत्ताच दोस्ताला विचारल की काय रे नॉनवेज डीश आवडते ना, आज करशील का तू? तो म्हणतो नाही रे बॉ कूठला प्राणी कधी मारला नाही. तर ते सगळ सोला, कापा नुस्त्या वासानेच भोवळ येते. कसे जमणार. पण राव करायला जमले तर झकासच. सगळे जण चिकन करी, मसाला नेहमीचा आवडीने खातात. मला स्वतःला मासा आवडतो पण कित्येकजण ते काटे, वास ह्याला वैतागून नको म्हणतात. आता सवय झालीय. आपण छान मासाच, मोठा सालमन करून देऊया का? काटे नसलेला फिलेट करूया, हेल्दी असतो. डॉक्टरपण म्हणतात आरोग्याला चांगला. सगळ्यांना आवडेल असा नाही म्हणा, पण मला आवडतो आता.
शुद्ध शाकाहारी लोक, त्यांची तर्हाच वेगळी. आम्हाला नॉनवेज म्हणून नाक मुरडतात पण स्वतः मात्र ते "फॉरबीडन फ्रूट" आहे असे सांगून स्वतःचा तो शाकाहारच समजून घेतात. मांजर डोळे मिटून दूध पिते हाच प्रकार आहे.
हे नॉनवेज आवडणारे पूरूषमंडळीपण बघा फक्त बाजारातून रॉ मटेरीयल सूरवातीला आणतील, नंतर तेही काम पण बाईनेच करावे ही अपेक्षा. बाईने बेत ठरवायचा, लागणारे घटक आणायचे, मुरत ठेवायचे, वेळेवर करून गरमागरम लागेल तेवढे भरवायचे, नंतर आवराआवरीपण. आम्ही फक्त खाणार, ढेकर देणार व परत हक्काने फर्माइश करणार. सगळे ए टू झेड स्वतःचे स्वतः करू शकणारा एखादा असेल पण स्वतः करून नेहमी नेहमी बायकोला भरवणारा आहे कोणी? किती बायकांकडून ऐकायला मिळाले आहे की अहो एकदा केल तरी बास आहे नेहमी नाहीच मागत खरच आम्हाला आवडेल असे अधून मधून एकदा सर्व्ह करून घ्यायला. मनापसून इच्छा असते, ती बर्याचदा रास्त अपेक्षा पण म्हणता येईल. पण हो आता तेवढच बाकी राहीलय महाराणी सरकार, म्हणून परत बोळवण करून तिला आपली जागा, सर्वांसमोर दाखवून दिली जातेच.
आपण मान्य करतो की स्वयंपाक करायला आवडेल. बायकोला खूश बघायला तर नक्कीच आवडेल. पण मग आहे तसे खायचे हा!, जास्त अपेक्षा ठेवायच्या नाही, मला थोडीतरी मदत पाहीजे. असा करारनामा का लगेच मागायचा? इतर पुरुषांसारखे हेच नको, असेच पाहीजे, हे नको मला, असे बाईने का बरे म्हणायचे नाही? बाईने केले तर ती डोक्यावर चढून बसली, स्वःता कमवते म्हणून इतका माज? इतकी वर्षे आजूबाजूचे पुरूष असे करत असताना, का बर नाही एकदाही मित्राला सांगावेसे वाटले की बाबारे तू पण जरा मदत करत जा घरी. कचेरीतून तू घरी येतोस पण तिला दिवा मालवला तरी काम असते व सकाळी तुझ्या आधी ती तिच्या कामावर हजर असते. गंमत आहे बघा, लहानपणा पासून आईने लाडावून ठेवलेले हे पुरूष झणझणीत अंजन घातल्या शिवाय ताळ्यावरच येत नाहीत. बाईदेखील माणूस आहे कीती सहन करणार, मग ती पण आपल्या परीने शॉर्टकट मारायला बघणार. परफॉरमन्स बिघडणार. ती काय मशीन नाही आहे, त्यामूळे तर जास्त कॉम्प्लीकेशनस पण होऊ शकतात. हे सगळ व्हायच्या आधीच दोघांनी मिळून, आपापल्या चवी सांभाळून, एकत्र स्वयंपाक उत्तम केला की कायमच चोचले पुरवले जातील.
डोक्यात विचारचक्र चालू आहे आपण कूठली डिश करायची, परत तिकडे जायची वेळ आली आहे. फटकन कल्पना सूचली की परिक्षेची वेळ संपली की झाला असेल नसेल तेवढा पेपर परत करावाच लागतो ना. तर आज ही वरची आपली घालमेल, स्वयंपाकाबद्दलची कल्पना देऊ या. खात्री आहे की आमच्या स्फूटावरून, आधीच चांगला स्वयंपाक येणारी लोक अजून समजून छान डिश करतील. कसे?
बाकी वेळ आली की आणीनच एक झणझणीत पदार्थ!
तोवर ह्या बडीशेपेच्या गोळ्या. मी आणी बायको नेहमी गोड पदार्थ खाताना एकमेकांना हे वाक्य टाकत असतो.
Just think of all those men & women on the Titanic who said, "No, thank you," to dessert that night. And for what!
वाचने
21189
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
संजीव कपूरही नसावा!
वा ! उत्तम प्रगती !
वा!
सहजराव
:-) बस
In reply to :-) बस by राजे (verified= न पडताळणी केलेला)
हं
व्वा!
मी मी
सहजराव,
मस्त
आवडला
मला आवडत नाही
In reply to मला आवडत नाही by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
हं
In reply to मला आवडत नाही by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
:)
छान.....!
In reply to छान.....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
हा हा हा
In reply to हा हा हा by गणपा
+१
आयुष्यात
In reply to आयुष्यात by इंटरनेटस्नेही
+१
मस्त...
मस्त
मस्त...आवडल
प्रकाटाआ
छान लिहिले
नॉनव्हेज
In reply to नॉनव्हेज by राजेश घासकडवी
सहजकाका,
In reply to सहजकाका, by ३_१४ विक्षिप्त अदिती
(राजेश आणि
In reply to (राजेश आणि by राजेश घासकडवी
(विषय दिलेला नाही)
कोण सहज का ?