Skip to main content

तुमचं सर्वात आवडतं ड्रिंक कोणतं?

लेखक पिवळा डांबिस यांनी शुक्रवार, 15/02/2008 06:49 या दिवशी प्रकाशित केले.
तुमचं सर्वात आवडतं ड्रिंक कोणतं? कसा झक्कास विषय आहे! सर्वांना भाग घेता येण्यासारखा आहे की नाही? पण थांबा, थांबा! जरा विचार करा. एकदम "बाजीराव-मस्तानी" असं ओरडू नका! हे ड्रिंक असतं हे मला आमच्या एका पुणेरी मित्राकडून समजलं. आम्ही या इतिहासातील व्यक्ति आहेत असं समजत होतो. :) तेंव्हा जरा विचार करा आणि मग सांगा. मात्र चर्चेत सामील होतांना खालील पथ्ये पाळूया, जरा मजा येईल... १. नुसतंच ड्रिंकचं नांव किंवा एकच वाक्य नसावे. जरा अधिक वर्णन द्या. २. ड्रिंक "अल्कोहोलिकच" असायची जरूर नाही. नॉन्-अल्कोहोलिक ड्रिंक्स सुध्धा चालतील. भगिनींना भाग घ्यायला आता हरकत नाही. ३.

लहान मुलांनी विचारलेले प्रश्न

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 14/02/2008 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
लहान मुले प्रश्न विचारून भंडावून सोडतात हे आपल्यापैकी बहुतेकांना माहीत असेलच. आपण चकित होतो की हा विचार ते कसा करतात - जो साधा, सोपा, थेट आणि जिज्ञासेने भरलेला असतो - आपली असा विचार करायची शक्ती कुठे आणि केव्हां बरं हरवली?

आज व्हेलेन्टाईन्स डे :) तुमच्याबरोबर कुणीच नाही ?????

लेखक राजमुद्रा यांनी गुरुवार, 14/02/2008 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
आज व्हेलेन्टाईन्स डे आणि तुमच्याबरोबर कुणीच नाही ????? - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) .....खरच कुणीच नाही........... - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) Then Happy Independence Day -:)

मी राजमुद्रा (नवीन सदस्या)

लेखक राजमुद्रा यांनी गुरुवार, 14/02/2008 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळप्रेमीना राजमुद्राचा नमस्कार, बर्‍याच दिवसापासून विचार करत होते, मिसळपाव वर लिहूया. आज म्हटल दिवस चान्गला आहे, आजच सुरुवात करुया. अपेक्षा ठेवते, सर्व मिसळप्रेमी मला कट्ट्यात सामावून घेतील माझ्याबद्दल सान्गायच म्हणजे मी चित्रकार आहे- व्यवसायाने आणि मनानेही बाकी सर्व माहिती सामन्य माणसाप्रमाणेच. व्हेलेन्टाईन्स डे च्या हार्दिक शुभेच्छा! आज मि. पा. वर लिहून जवळच्या नातेवाईकाला खूप वर्षानी पत्र लिहिल्यासारखे वाटले. आपल्या सर्वाच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे. आपली राजमुद्रा

संततीसंबंधी समस्या -- बीज क्षेत्र विचार

लेखक धोंडोपंत यांनी गुरुवार, 14/02/2008 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, संतती न होण्याचे समाजातील प्रमाण मोठे आहे. आणि गेल्या काही वर्षात विविध कारणांनी ते वाढले आहे. याचे एक कारण म्हणजे प्रेमविवाहाचे वाढते प्रमाण. प्रेमविवाहात जोडिदारांच्या पत्रिका जुळत आहेत की नाही हा मुद्दा पूर्णपणे दुर्लक्षित होतो. आणि त्यानंतर त्याचे दुष्परिणाम संतती न होणे, संतती होऊन जाणे, वारंवार गर्भपात होणे, त्यातून येणारे नैराश्य, जोडीदारांचे एकमेकांशी न पटणे, "तुझ्यामुळे माझे आयुष्य बरबाद झाले" अशा स्वरूपाचे परस्परांवर आरोप प्रत्यारोप, आणि त्याची परिणती म्हणजे घटस्फोट आणि विभक्तता. त्याचप्रमाणे काहीजणांच्या कुंडलीत मुळातचं संततीसौख्य नसतं.

चिझ पावभाजी

लेखक प्रभाकर पेठकर यांनी गुरुवार, 14/02/2008 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः बटाटे - १/२ किलो लालबुंद टोमॅटो - १/२ किलो सिमला मिर्ची - १ नग (मोठी) मटार दाणे- १/२ वाटी कांदे :- भाजी साठी २ वरून सजावटीसाठी २ अमूल बटर - ४०० ग्रॅम काश्मिरी मिरच्या - १०-१२ मीठ - चवीनुसार धणे पावडर - २ टेबलस्पून पावभाजी मसाला (बादशहा किंवा एव्हरेस्ट) - २ टेबल स्पून लसूण पेस्ट - १ ते १-१/२ टेबलस्पून कोथींबिर - वाटीभर छेडर चिझ - १०० ग्रॅम कृती: बटाटे उकडून, साले काढून, कुस्करून ठेवावेत. टोमॅटो, सिमला मिरची, कांदे बारीक चिरून ठेवावेत. मटारचे दाणे उकडून ठेवावेत. काश्मिरी मिरच्या गरम पाण्यात अर्धातास भिज
Taxonomy upgrade extras

तू (अर्थात त्याच्या नजरेतून ती...)

लेखक सतिश गावडे यांनी गुरुवार, 14/02/2008 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
तू परत येणार नाहीस हे मला केव्हाच कळलं आहे माझं वेड मन मात्र अजून तसं तुझ्यातच गुंतलं आहे माझाच मूर्खपणा होता तो सारं काही गृहीत धरलं मी डोळे मिटून अंधा~या रात्री झणी शिडात वारं भरलं मी कसा दोष तसा देऊ तुला मी तुझं तसं काहीच चुकलं नाही पण मी तरी सांग काय करू पापण्यांवरचं पाणी सुकलं नाही कशीही होवो तशी माझी अवस्था तुझंच भलं असेल मनात माझ्या हसेन इथे मी लपवून आसवाना जखमा असतील जरी मनात ताज्या जगाच्या पाठीवर, कुठेही राहा तू फुलू दे गुलमोहर तुझ्या अंगणीचा पडतील जिथे जिथे पाउले तुझी, असू दे हळूवार मखमलि गालीचा

शुभेच्छा...!

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 14/02/2008 08:06 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव वर प्रेम करणार्‍या सगळ्या सभासदांना आणि वाचकांना व्हॅलेंटाईन्स डे च्या हार्दिक शुभेच्छा...! प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमामध्ये चिंब नहावे जीवन हेच प्रेम असावे प्रेमासाठीच जगत रहावे... - प्राजु

"रजनीकांत" आणि काही "मुक्ताफळे ".............

लेखक छोटा डॉन यांनी बुधवार, 13/02/2008 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
* कांद्यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल पण 'रजनीकांत' कांद्याच्या डोळ्यात पाणी आणू शकतो .... * तुम्ही 'रिसायकल बिन ' मधल्या फाईल डिलिट करू शकत असाल पण तो खुद्द 'रिसायकल बिन' डिलीट करू शकतो ........ * तो तुम्हाला 'कॉर्डलेस फोन' च्या साह्याने गळफास देउ शकतो ........ * तो पीयानो वाजवून त्यामधून 'व्हायोलीन' ची सुरावट काढू शकतो ......... * तो खोलीत प्रवेश केल्यावर तेथील अंधार दूर करण्यासाठी तो लाईट चालु करत नाही , त्याऐवजी तो अंधार बंद करतो ....... * त्याला एकदा 'हार्ट-ऍटॅक' आला होता , तेव्हापासून त्याचे ह

कधी होवो न होवो भेट यापुढे आपली...

लेखक सतिश गावडे यांनी बुधवार, 13/02/2008 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
माझा प्रत्येक निवांत क्षण तसा तुझ्याच आठवणींनी सजलेला मनाचा प्रत्येक कोपरा तसा, तुझ्या आठवणींच्या दव बिंदुत भिजलेला अस कधीच झालं नाही तसं आधी मी मलाच हरवून बसलो आहे आता कळेना मला अशी काय जादू केली तू प्रत्येक चेहरा तसा तुझाच वाटतो आता चाहूल कुणाची जेव्हा कधी लागते मला तू आल्याचा भास होतो मला तसा आता पाना फुलांत, नदी ओढ्यात, सागराच्या फेसाल लाटेतही दिसतेस् मला तू आता कधी होवो न होवो भेट यापुढे आपली तुझा चिवचिवाट कानात गुंजेल माझ्या अवचित मंद झुळुक येता वार्‍याची तुझं निखळ हासू कानात घुमेल माझ्या