मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चिझ पावभाजी

प्रभाकर पेठकर · · पाककृती
Taxonomy upgrade extras
साहित्यः बटाटे - १/२ किलो लालबुंद टोमॅटो - १/२ किलो सिमला मिर्ची - १ नग (मोठी) मटार दाणे- १/२ वाटी कांदे :- भाजी साठी २ वरून सजावटीसाठी २ अमूल बटर - ४०० ग्रॅम काश्मिरी मिरच्या - १०-१२ मीठ - चवीनुसार धणे पावडर - २ टेबलस्पून पावभाजी मसाला (बादशहा किंवा एव्हरेस्ट) - २ टेबल स्पून लसूण पेस्ट - १ ते १-१/२ टेबलस्पून कोथींबिर - वाटीभर छेडर चिझ - १०० ग्रॅम कृती: बटाटे उकडून, साले काढून, कुस्करून ठेवावेत. टोमॅटो, सिमला मिरची, कांदे बारीक चिरून ठेवावेत. मटारचे दाणे उकडून ठेवावेत. काश्मिरी मिरच्या गरम पाण्यात अर्धातास भिजवून मिक्सर मधून ग्राइंड करून त्याची मुलायम पेस्ट करून ठेवावी. पेस्ट जितकी मुलायम होईल तितका त्याचा रंग जास्त लाल भडक होत जातो. प्रथम एखाद्या पसरट जाड बुडाच्या पातेल्यात मंद गॅस वर २०० ग्रॅम अमूल बटर गरम करावे. बटर पूर्ण वितळण्याआधीच त्यात बारीक चिरलेला अर्धा कादा घालावा आणि परतावा. (नुसते बटर लवकर जळते) नंतर, सिमला मिरची, उकडलेले मटार घालून परतावे. परतून, शिजून मऊ झाले की पावभाजी करण्याच्या चेपणीने मस्त चेचून घ्यावेत. फायनल चवीत ही पायरी खूप बदल घडवू शकते. शिजलेला कांदा, सिमला मिरची, वाटाणे चांगले चेचून एकजीव झाले पाहिजेत. नंतर, त्यावर बटाटे, टोमॅटो, धणे पावडर, पावभाजी मसाला, लसूण पेस्ट, काश्मिरी मिरची पेस्ट घालून नीट परतावे. थोडे थोडे पाणी घालून चेपणीने चेचत राहावे. गॅस फुल्ल असावा. चेचून चेचून सर्व भाजी एकजीव झाली, बटर किंचीत दिसायला लागले की त्यात अर्धी कोथींबिर आणि पुन्हा १०० ग्रॅम बटर घालून सर्व एकजीव करावे. थोडेथोडे पाणी घालून भाजीचा पोत सांभाळावा. आता गॅस बंद करून भाजी खाली उतरवावी. एखाद्या बाऊल मध्ये भाजी काढून त्यावर थोडी कोथींबिर भुरभुरून वरून १०० ग्रॅम चिझ किसून टाकावे. प्लेट मध्ये तो बाऊल ठेवून शेजारी बारीक चिरलेला कांदा, लिंबू , हिरवी मिरची आणि खरपूस भाजलेले पाव ठेवून सादर करावे. शुभेच्छा....!

वाचन 43799 प्रतिक्रिया 0