Skip to main content

ऑफीस स्पेस

लेखक व्यंकट यांनी गुरुवार, 13/03/2008 03:50 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफीस स्पेस हा माझ्या असंख्य आवडत्या हॉलिवूडपटांपैकी एक. सिलिकॉन व्हॅलीत घडणारी कथा वाय. टू. के. चा फुगा जेव्हा फुगला होता त्या काळातली आहे. पिटर गिब्बन्स (रॉन लिव्हींग्स्टन) हा एक गाय-नेक्स्ट-क्युब वाटावा असा सॉफ्टवेअर इंजिनीअर इनिटेक नावाच्या कंपनीत चाकरी करत असतो.

त्रुटी....

लेखक अभिज्ञ यांनी बुधवार, 12/03/2008 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
मा.सरपंच मिसळपावग्राम, थोडे आपल्या नजरेस आणू इच्छितो, प्रकार शीर्षक लेखक प्रतिसाद अंतिम लेखन काथ्याकुट तुम्हाला काय वाटते?

पराधीन आहे जगति पुत्र मानवाचा....

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 12/03/2008 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या बर्‍याच दिवसापासून 'संपूर्ण गीतरामायण' आंतरजालावरून डाऊनलोड करत होतो. आज झाले पूर्ण. माझी काही अतिशय आवडीची गाणी आहेत त्या मधे 'पराधीन आहे जगति...' हे गाणे आहे. लगेच ते गाणे सुरू केले. ह्या गाण्या बद्दल काय सांगू मंडळी... काही वेळा 'आधुनिक वाल्मिकी ग.दि.मा.' इतक्या सोप्या शब्दात इतके मोठे तत्वज्ञान सांगून जातात ना... असामान्य, केवळ असामान्य. आणि बाबूजींनी अशी काही म्हटली आहेत ही गाणी... सोने पे सुहागा.

(अधिकार)

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 12/03/2008 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची सुरेख गझल अधिकार किर्र आहे रात्र आणिक केव्हढा अंधार आहे घोरण्याचा हा स्वयंभू लावला गंधार आहे कालवर होते जरी हे वाकडे ह्या अक्षरांचे मस्तकी त्या आज पदव्यांचीच संततधार आहे चार रंगांनी बघा बदले कशी दृष्टी जगाची आज जे ऍटिक ठरले कालचे भंगार आहे भाव थोडे वेगळे डोळ्यात माझ्या पाहिले अन लाज थोडी, घाबरे तो काय ही करणार आहे वाट रुळलेली कशाला चालुया दोघे पुन्हा ही ह्या प्रवासाने जगाचे मोडले संसार आहे मी कशाला आज सोडू सांग ह्या गझलेस सुंदर ? जर विडंबन पाडण्याचा "केशवा" अधिकार आहे

मुकुट परत मिळाला..

लेखक विवेकवि यांनी बुधवार, 12/03/2008 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
आजच पेपर वाचताना बातमी वाचली म॑दीरातला मुकुट परत मिळाला. वाचून आन॑द झाला .. पण चोरणारी व्यक्यी कोण ? काय हेतू चोरण्याचा ? आपले काय मत आहे आपली मते कळवावी...

काही दुर्मिळ फोटू...

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 12/03/2008 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
सदर फोटू मला बाबुजींच्या घरनं मिळालेले आहेत. आमच्या ललितामावशींनी हे फोटू मला दिले आहेत. मिपाकरांसाठी येथे देत आहे! श्रेय : श्रीमती ललिता फडके, श्री श्रीधर फडके. टिप्पणी : तात्या अभ्यंकर... १) दिदी, मन्नादा आणि बाबूजी! कुणाचा गळा अधिक गोड, या प्रश्नाचं उत्तर मला तरी अद्याप मिळालेलं नाही! २) बहुतेक 'ज्योती कलश छलके'च्या आठवणी ताज्या होत असाव्यात!