दहा अंगुळे उरला
अभंगाची मूळाक्षरे
ध्यानी मनी घोटताना
"वि"ठ्ठलाच्या "वेलांटीत"
"का"न्हा रेखाटतो "काना"
वेचुनिया मूळाक्षरे
घडवितो शब्द तुका
गहनाचा अंतर्नाद
झंकारतो त्यात, ऐका
शब्द चोखट, रोकडे
जोडे तुका, रचे ओळ
ओळी ओळीत गर्जती
वीणा, मृदंग नि टाळ
एका एका अभंगाचा
शब्द शब्द जो जगला
तुका आभाळ व्यापून
दहा अंगुळे उरला
मिसळपाव
मंडळी
मी आज एक फार मोठा स्टंट केला.
ही कल्पना माझ्या डोक्यात स्वतंत्रपणे चमकली असली तरी पूर्णपणे माझी नाही. असे तुरळक प्रयोग जगात काही ठिकाणी चालु आहेत. या प्रयोगाचे दुरगामी परिणाम एआय २.० च्या स्वरूपात आपल्याला लवकरच दिसतील.
समजा दोन ए०आय०ना विशिष्ट विषयावर चर्चा करायला सांगितलं तर?
या मागचा विचार असा की दोन स्वतंत्रपणे विकसित केलेल्या मॉडेल्सच्या ट्रेनिंग/ज्ञानाचा फायदा मिळून चर्चेत जास्त खोली आणि सजीवपणा येईल.
ही कल्पना मी ए०आय०च्याच मदतीने तात्काळ प्रत्यक्षात उतरवली.