Skip to main content

शिवाजी राजे मराठा कि राजपुत ...?

लेखक पान्डू हवालदार यांनी शनिवार, 29/03/2008 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
राजे शिवाजी ... मुळचे सिसोडिया ...रजपुत ... मराठा नव्हेत ..... आपल्याला काय वाट्त ... चर्च्या फक्त लेखा वर लेखकावर नको ...म्हन्जे चच्र्चे ला मजा येइल ...

एप्रिल फ़ूल

लेखक सुधीर कांदळकर यांनी शनिवार, 29/03/2008 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
एक एप्रिल. एक जादुई दिनांक. या दिवशी असे काय घडले असेल की आपली बुद्धि गायब होते? याचा संबंध बहुदा कालगणनेशी असावा. ग्रेगोरियन कॅलेंडर आस्तित्त्वात येण्यापूर्वी बहुधा दहाच महिने आस्तित्त्वात होते. मी इतिहासज्ञ नसल्यामुळे मला तपशील अचूक ठाऊक नाही. पण आपल्या संकेतस्थळावर लिहिणारे तज्ञ वस्तुस्थिती लिहितीलच. (प्रियालीताई बोरू सरसावा बरे.) तर नव्या महिन्यापैकी एप्रिल हा एक असावा. आणि दिनांक लिहितांना नवीन महिना ज्ञात नसल्यामुळे किंवा सवईमुळे एक एप्रिल ऐवजी एक मे अशी तारीख लोक लिहीत असवेत. जसे आपण जानेवारीच्या आठदहा तारखेपर्यंत जुनेच वर्ष टाकतो. चूक झाली तर खिल्ली उडविण्याचा लोकांचा हक्कच आहे.

जे घुसळे रवी

लेखक अजय जोशी यांनी शनिवार, 29/03/2008 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो दही घुसळून लोणी काढणारी रवी असतो कवीला माहीत घुसळणे फक्त स्निग्धता लोण्यात मिसळणे फक्त स्वत: मात्र फिरुन फिरुन बुडत असतो कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो स्निग्धतेच्या अंशासाठी जग सारं धावतंय रवीचं चाक गरागरा फिरतंय तरंगणा-या गोळ्यापासून अलिप्त जो असतो कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो

'केशवा' अजब तुझे अवतार!

लेखक चतुरंग यांनी शनिवार, 29/03/2008 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
मि.पा.चे विडंबनाचार्य केशवसुमार ह्यांनी दोन दिवस मि.पा.करांना अत्यवस्थ करुन सोडले आणि नंतर पुन्हा झकास विडंबनाने एंट्री मारुन एक सुखद धक्का दिला त्याबद्दल त्यांना हे विडंबन सादर! शब्दप्रभू गदिमांचे शब्द 'उध्दवा अजब तुझे सरकार' ही आमची प्रेरणा! 'केशवा', अजब तुझे अवतार!

ब्रेकिंग न्यूज

लेखक सृष्टीलावण्या यांनी शनिवार, 29/03/2008 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
अजिबात वेळ घालवू नका. तडक टीव्ही लावा. राष्ट्रव्यापी समस्या.
तुम्ही ह्या बाबतीत काही करणार आहात की नाही?
break सौजन्य = ई-ढकल.

धर्म-शिक्षणाचे धडे द्या.........

लेखक संजीव नाईक यांनी शनिवार, 29/03/2008 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
धर्म-शिक्षणाचे धडे द्या......... जून महिना उजाडला की, आपल्या पाल्याला शाळा- कॉलेजात प्रवेश मिळविण्यासाठी पालकांची एकच धांदल उडते. त्यातल्या त्यात पाल्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याची वाढती फॅशन अलिकडे पालकांमधे, विशेषतः शहरामधील पालकांमध्ये वाढलेली आहे. परंतु हे पालक एक गोष्ट विसरतात की, शिक्षणाबरोबर संस्कार हे ही महत्वाचे असून हे संस्कार धर्माद्वारेच मुलाबाळांमध्ये उतरु शकतात. धर्मासंबंधी शाळांमध्ये हल्ली फक्त सुरवातीला प्रार्थना म्हणण्यापलिकडे मुलामुलींचा धर्माशी संबंध येत नाही. या पलिकडे आपल्या धर्मग्रंथाचे वाचन, पाठांतर, निरुपण वगैरेसाठी काहीही शिक्षण दिले जात नाही.

शिकवा नही किसीसे...

लेखक फटू यांनी शनिवार, 29/03/2008 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
शुक्रवार होता तो... विक एण्ड तर दुपारीच चालू झाला होता. संध्याकाळी काम आटपून मी निवांत रमत गमत घरी आलो. पाठीला अडकवलेली सॅक जवळ जवळ फेकुनच दिली. सोफ्यावर कम्फर्टर तसंच पडलेलं दिसलं म्हणून ते उचललं. आणि मी आश्चर्यचकित झालो. अपूर्व, माझा रूम मेट एकदम अवघडल्या अवस्थेत सोफ्यावर कम्फर्टर अंगावर ओढून झोपला होता. तो असा कधीच झोपत नसे. काही तरी बिनसलं होतं. कदाचित कामाचा थकवा असेल म्हणून झोपला असेल असा विचार करून मी फ्रेश होण्यासाठी निघून गेलो... रात्रीचे साडे नऊ वाजले होते. पोटात कावळे ओरडू लागले होते. जेवण तर सकाळचच होतं. फक्त गरम करायचं होतं. आता मात्र अपुर्वला जागं करायलाच हवं होतं.

नवे भन्नाट अर्थ

लेखक मनापासुन यांनी शनिवार, 29/03/2008 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मराठीमधे अनेक उपदेश कथा आहेत्...उपदेश सोप्या भाषेत कसा द्यायचा हे त्या कथा लिहीणाराला सहज जमुन जाते. या कथा केवळ आपणाला ठाउक असणारा उपदेश सांगतात असे नव्हे. त्यातुन आपणाला माहीत नसणारा नवा उपदेश ही तेवढाच मोलाचा असु शकतो. तो कळण्या साठी फक्त आपण आपला द्रुष्टीकोन बदलणे जरुरीचे आहे... इथे एक गोष्ट सांगतो..पहा तुम्हाला अशा इतर गोष्टी आठवता का? तुमच्या बुद्धी साठी हा एक नवा खेळ / चॅलेन्ज समजा.... हितोपादेश या पुस्तकात एक चिमणीची आणि माकडाची गोष्ट आहे... एक माकड पावसात भिजले होते.. त्याला थंडी वाजत होते.

हा माझा जीव तिच्या...

लेखक केशवसुमार यांनी शनिवार, 29/03/2008 04:30 या दिवशी प्रकाशित केले.
१ एप्रिल जसा जवळ येऊ लागला तसे मिपाकरांना कसे फुल करवे ह्या विचारत होतोच, तेव्हड्यात चतुरंगशेठचे निवेदन वाचले... आणि डोक्यात किडा आला...१ एप्रिलला अजून ४-५ दिवस बाकी होते.. पण डोक्यात आलेला किडा गप्प कसा बसून देईल.. म्हणलं सगळे जण १ एप्रिलला एप्रिल फुल करतील आपण जरा आधीच करावे..आणि मग आमचा निर्णय प्रकाशित केले.. पण धडाधड आलेल्या प्रतिसादामुळे घाबरलो..म्हणलं जस्त नको ताणायला..फुकटचा मार बसयचा तात्याचा..काय भरोसा नाही हो ह्या माणसाचा.. विडंबन लिहिणे बंद करणे म्हणजे..तात्याने शिव्या बंद करतो..