Skip to main content

मुलीनेच का नेहमी सासरी जायचं ? - कविता

लेखक यशोदेचा घनश्याम यांनी सोमवार, 31/03/2008 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
एका ई-मेल मधून आलेली कविता - कवी / कवयित्री माहित नाहित. ती एकदा आजीला म्हणाली... मुलीनेच का गं नेहमी सासरी जायचं ? आपली माणसं सोडून तीनेच का परकं घर आपलं मानायचं? तिच्याकडूनच का अपेक्षा जूनं अस्तित्व विसरायची? तिच्यावरच का जबरदस्ती नवीन नाव वापरायची? आजी म्हणाली अगं वेडे हा तर सॄष्टीचा नियम आहे नदी नाही का जात सागराकडे आपलं घर सोडून! तो येतो का कधीतरी तिच्याकडे आपली वाट मोडून! तीचं पाणी किती गोड...

आईस्क्रीम वडे

लेखक मनापासुन यांनी सोमवार, 31/03/2008 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
नवी पाक क्रुती: बेसन पीठ बाटावड्या साठी बिजवतात तेवढे पातळ भिजवावे.त्यात चवीसाठी मीठ जिरे टाकावे , त्यात हवे असल्यास काजु /बदाम कापुन टाकावेत. गोडे तेल कढईत उकळत ठेवावे. आईस क्रीम ( वॅनीला) स्कूप ( गोळा)घेउन तो बेसन पीठात वड्याप्रमाने बुडवुन घ्यावा.व तो पटकन तळुन घ्यावा. आईस क्रीम तेवढ्याच पटकन खावे...गरम वडा- गार आइस क्रीम झकास कॉम्बीनेशन होते सू:..हा पदार्थ दिल्लीत "नुरूलाज" ची स्पेशालीटी आहे.लोक रांगा लाउन खाण्यासाठी उभे असतात. उ.सु: वडे तळुन काढणे आणि खाणे यात अंतर असु नये.

जन्म चारोळीचा.....

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 31/03/2008 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
मला तिष्ठत उभे ठेऊन तू नाही नाही ते बोललीस तू गेलीस आणि भानावर येत मनाची आरोळी आली तू दिलेल्या वेदनामय शब्दांना ओळीत उभे करून माझ्या "वांझोट्या" प्रेमाची चारोळी झाली !

गाण्यांच्या शोधात

लेखक ॐकार यांनी सोमवार, 31/03/2008 02:30 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी बर्‍याच गाण्यांचा विचार डोक्यात घोळत असतो. विचार घोळवावा लागतो. गाणी एकरूपच असतात, ती घोळवावी लागत नाहीत. एखाद्या गाण्याचे शब्द, लय, ताल, राग, सुरावट लक्षात राहण्यामागे कारण काय असेल? जास्त विचार केला तर अनेक शास्त्रीय कसोट्या सांगता येतील. त्या कसोट्यांची रसिकतेला मात्र काही गरज नाही. अंतर्बाह्य असतं ते गाणं. त्यात शब्द , ताल , सूर , लय काहीच वेगळं नसतं. सगळं एकजीव असतं. उदाहरणं अनेक आहेत . असा बेभान हा वारा हे गाणं ऐकताना मी नेहमी मला एका चित्राचा कोपरा समजत आलो आहे. ते चित्र इतकं सजीव आहे की मला ते अगदी तसंच शब्दात बांधणं जमत नाही.

उत्तर शोधायचे आहे!

लेखक ॐकार यांनी सोमवार, 31/03/2008 01:31 या दिवशी प्रकाशित केले.
ओशो रजनिश यांच्या संत कबीरांवरील प्रवचनांचे भाषांतर वाचण्याचा योग आला. त्यात ओशोंनी पुढील दाखला दिला आहे - एकदा चार बायका एक प्रसिद्ध सूफी संताकडे ज्ञानप्राप्तीकराता जातात आणि त्याने गुरू बनावे अशी विनवणी करतात. त्यांना त्याच्याकडून ज्ञान म्हणजे काय हे समजून घ्याअय्चे असते. परंतु सूफी संत मात्र तयार होत नाही. त्या बायका तश्याच दाराशी भुकेल्या तहानलेल्या बसून राहतात. अखेर त्याला त्यांची दया येते. तो त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवतो. परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍या स्त्रीला शिष्या करून घेण्यास तो तयार होतो.

नशीब एकेकाच

लेखक सुवर्णमयी यांनी सोमवार, 31/03/2008 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
तिने कपाटाचे दार उघडले आणि आत न बघताच हातातले खोके आत भिरकावून दिले. अगदी त्यात काचेची वस्तू आहे अथवा नाही याची एवढीही फिकीर न करता. आत पडताक्षणी मी बघितले तर माझ्यासारखेच काही खोके तिथे होते. काही आपल्या शोभिवंत कागदातून बाहेर आले होते तर काही माझ्याच सारखे रंगीबेरंगी कागदात बंदिस्त. "ए ,ओळखलेस का? " एकदम आलेल्या प्रश्नाने मी जरा बावचळून गेलो खरा. पण लगेचच आठवले की काही महिन्यांपूर्वी त्या खोक्याला मी भेटलो होतो. आमचा अगदी सार्वजनिक पंचनामा झाला होता. वेष्टनातून काढून अगदी आतून बाहेरून लोकांनी आम्हाला बघितले होते.

महाराश्ट्र अन्धरात .. पुण्याचे मात्र लाड

लेखक पान्डू हवालदार यांनी रविवार, 30/03/2008 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
अक्खा महाराश्ट्र अन्धारात बुड्लेला असतान्ना .. पुण्यात झगझगाट ....महावितर् ण मन्त्रि म्ह्ण् ण ता त .. पुणेरी जनतेला काही देणे घेणे नाही ... प्रतिक्रिया ..???

रविवार विशेष

लेखक सृष्टीलावण्या यांनी रविवार, 30/03/2008 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
वैदर्भी बोली खरेतर संस्कृतशी अधिक जवळीक असणारी. मात्र तिची खुमारी पाहायची असेल तर बुवा उपाध्यांची भगवत् गीता वाचावी. भगवत् गीतेशी एव्हढा लडिवाळपणा करण्याची हिंमत दुसर्‍या कोणत्या भाषेची वा बोलीची झाली असेल असे वाटत नाही. बुवा लिहितात - पार्थ म्हणे गा हृषीकेशी, या युद्धाची ऐशीतैशी, बेहत्तर आहे मेलो उपाशी, पण लढणार नाही. धोंड्यात जावो हि लढाई, आपल्या बाच्याने होणार नाही, समोर सारेच बेटे, जावाई, बाप, दादे, काके. अरे लढाई असते का सोपी .. मारे चालते कापाकापी, कित्येक लेकाचे संतापी मुंडकी ही छाटती.

बाबूराव बागुल

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 30/03/2008 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
माणसासाठी लढलेला माणूस. दलित, शोषित, पीडितांच्या सामाजिक सांस्कृतिक चळवळीमध्ये आघाडीवर असणारा आणि मराठी साहित्याला क्रांतिकारी विचारांचं अधिष्ठान प्राप्त करून देणारा लेखक म्हणजे बाबूराव बागुल. 'वेदाआधी तू होतास, परमेश्वराच्याआधीही तू होतास' अशा शब्दातून माणसातील श्रेष्ठत्व सांगणारे बाबूराव बागुल मराठी साहित्यातले एक मोठं नाव. बाबूराव बागुलांचे ' जेव्हा मी जात चोरली होती' हा कथासंग्रह वाचण्यापूर्वी, साहित्य केवळ ललित असते, ते दलित वगैरे नसते आणि साहित्याचे प्रयोजन केवळ मनोरंजन, आनंदच असते. या वाचन परंपरेला या कथासंग्रहाबरोबर नामदेव ढसाळांच्या गोलपीठा वाचल्यानंतर तडा गेला.