मुलीनेच का नेहमी सासरी जायचं ? - कविता
लेखनविषय:
एका ई-मेल मधून आलेली कविता - कवी / कवयित्री माहित नाहित.
ती एकदा आजीला म्हणाली...
मुलीनेच का गं नेहमी सासरी जायचं ?
आपली माणसं सोडून तीनेच का
परकं घर आपलं मानायचं?
तिच्याकडूनच का अपेक्षा
जूनं अस्तित्व विसरायची?
तिच्यावरच का जबरदस्ती
नवीन नाव वापरायची?
आजी म्हणाली अगं वेडे
हा तर सॄष्टीचा नियम आहे
नदी नाही का जात सागराकडे
आपलं घर सोडून!
तो येतो का कधीतरी तिच्याकडे
आपली वाट मोडून!
तीचं पाणी किती गोड... तरीही ती
सागराच्या खारट पाण्यात मिसळते
आपलं अस्तित्व विसरून ती
त्याचीच बनून जाते
एकदा सागरात विलीन झाल्यावर
तीही सागरच तर होते
पण म्हणून नेहमी तीच्यापूढेच
नतमस्तक होतात लोकं
पापं धुवायला समुद्रात नाही
गंगेतच जातत लोकं!
वाचने
6362
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
सुंदर कविता...
मला वाटतं
In reply to मला वाटतं by ३_१४ विक्षिप्त अदिती
विचार
In reply to मला वाटतं by ३_१४ विक्षिप्त अदिती
संहिताशी सहमत!
बहिणाबाई
स्वावलंबी
मला प्रश्न पडतो
सॄष्टीचा नियम