Skip to main content

शेअर बाजार झेपावणार २४ हजारांवर , एप्रिल फूल नाहि

लेखक शरुबाबा यांनी मंगळवार, 01/04/2008 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक येत्या मार्च २००९ मध्ये २४ हजारांपर्यंत झेप घेऊ शकतो. असा अंदाज इकनॉमिक टाइम्सच्या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. दुवा- http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2911790.cms

एक वर्तुळ पूर्ण झालं

लेखक भोचक यांनी मंगळवार, 01/04/2008 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
नाशिकजवळ सिन्नरच्या कुशीत बिलगलेलं डुबेरे नावाचं गाव आहे. अगदी छोटसं गाव. हे दोन गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. एक इथं भोपळ्याचा वेल आहे म्हणून आणि मराठी साम्राज्याचा उत्तर दिग्विजय घडवून आणणारा महापराक्रमी पहिला बाजीराव पेशवा इथे जन्माला आला म्हणून. या गावातच साठेंचं घर आहे. एके दिवशी गाडी काढली आणि बायकोला मागे टाकून थेट डुबेरे गाठलं. साठेंचं घर शोधून काढलं आणि 'त्या' खोलीत प्रवेश केला. जिथे मराठी साम्राज्याचा पराक्रमी सूर्य जन्माला आला होता. अगदी थरारून गेलो होतो आम्ही. या छोट्याशा खोलीत बाजीरावाचा फोटो होता. एक तलवार होती. फार काही नव्हतं.

पाऊस माझ्यासाठी काय आहे?

लेखक उदय सप्रे यांनी मंगळवार, 01/04/2008 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या मोकळ्या केसांत अलगद झिरपतो माझी इच्छा कशी तो आपसुक पुरवतो? तिच्या ओठांवर थांबलेला त्याचा एक थेंब पाऊस.....प्रेमाचं दव नाही तर काय आहे? हिरव्यागार पनांवर टपोरं मोगर्‍याचं फूल फुलत असतं घेवून तिच्याच वेणीची चाहूल अड्खळतं अवचित माझं प्रत्येक पाऊल पाऊस्.....तारुण्य आणि रसिकतेची माय आहे ! कोसळणार्‍या सरी तिला चिंब भिजवतात अबोली साडीला अंगाशी घट्ट सजवतात मनात आपसुक प्रेमाचे अंकूर रुजवतात पाऊस....हुरहुरणार्‍या मनावरची साय आहे ! चहाचा शेवटचा कप शिल्लक आहे थरथरणार्‍या तिला पण तो हवा आहे अर्धा घेवून ती उष्टावलेला अर्धा मला देते हा असा "अमृताचा" क्षण प्रत्येकाला हवा आहे ! पावसामुळेच तर हे सगळं

माझी प्रीत आहे

लेखक उदय सप्रे यांनी मंगळवार, 01/04/2008 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
हार माझी या घडीला , पण उद्याची जीत आहे कौतुकाचा मी भुकेला, आसवांना पीत आहे ! संपले जरी सूर कंठी , जिद्द आहे गायची दाटल्या कंठात माझ्या अन उद्याचे गीत आहे ! जा, सुखाने झोप तू , माझाच हा वनवास आहे सवय नाही भोगण्याची-त्या "सुखाला" भीत आहे ! जिंकला जो या पटावर तो सिकंदर खास आहे "हारलो का?" हे पहाणे , जिंकण्याची रीत आहे ! काय तुम्ही मागुती या जीवनाच्या नाचता? मुक्ती जे देहास देई, "मरण" माझी प्रीत आहे !

अहं मुर्खास्मि

लेखक भोचक यांनी मंगळवार, 01/04/2008 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
जग हा वेड्यांचा पसारा असे कुणीतरी म्हटलेय, म्हणे. पण माझ्या मते जग हा मुर्खांचा पसारा असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. माझ्या या विधानाने बरेच लोक नाराज होतील, याची मला कल्पना आहे. पण मी मांडलेले स्पष्टीकरण वाचल्यानंतर ते किती योग्य आहे, हेही तुम्हाला पटेल. आणि स्वतःला मुर्ख म्हणवून घेण्याचा तुम्हालाही आनंदच वाटेल. वास्तविक समर्थ रामदासांनी 'मुर्खांची लक्षणे' सांगितली, असली तरी त्यात बरीच कमतरता आहे. आम्ही शोधून काढलेली लक्षणे आणि त्याचे फायदे वाचल्यानंतर तुम्हीही नक्की आमचे 'दास' होऊन आमचा 'बोध' मान्य कराल याची खात्री आहे.

हैद्राबादी मटण बिर्याणी

लेखक मनस्वी यांनी मंगळवार, 01/04/2008 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो काल पॅराडाईज (हैद्राबाद) मध्ये हैद्राबादी मटण बिर्याणी खाल्ली! काय चव होती सांगू... काही केल्या डोक्यातून जात नाहीये. मस्त गरम गरम बिर्याणी... त्यावर अंड्यांचे काप... आत लुसलुशीत चमचमीत लज्जतदार मटण... जोडीला रायते... वा वा वा! माझ्या नॉनव्हेजीटेरिअन मित्र-मैत्रिणींसाठी खास पाककृती देत आहे... नक्की करून बघा. साहित्य : मटण (मध्यम तुकडे केलेले) - १/२ कि. बासमती तांदुळ (१/२ तास पाण्यात भिजवून) - १/२ कि. कांदा (उभा चिरून) - १५० ग्रॅ.

आयुष्य

लेखक जयवी यांनी मंगळवार, 01/04/2008 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य म्हणजे काय असतं देवाने जन्माला घातलं म्हणून काय जगायचं असतं....? खरं तर....