Skip to main content

सापेक्षतावादाच्या जनकाची ५३ वी पुण्यतिथी!

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 18/04/2008 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच, 'काळ ही चौथी मिती आहे आणि ती सापेक्ष आहे' असे धक्कादायक प्रतिपादन करुन संपूर्ण जगाला हादरविणार्‍या महान वैज्ञानिकाचे, अल्बर्ट आईनस्टाइनचे १८ एप्रिल १९५५ रोजी अमेरिकेतल्या न्यू जर्सी येथील प्रिन्स्टन इस्पितळात निधन झाले आणि वैज्ञानिक जगतातला एक महान तारा चौथ्या मितीतून लुप्त झाला! तो एक महान शास्त्रज्ञ तर होताच पण त्याबरोबरच तो मानवी आयुष्याचा साक्षेपाने वेध घेणारा विचारवंत, माणसाचे अस्तित्व नक्की कशासाठी आहे ह्याचा शोध घेणारा तत्वज्ञ, एक सहृदय मानवतावादीही होता. शास्त्रातल्या अनेकविध शोधांप्रमाणेच विचारांचेही अनेक मौलिक स्फटिक त्याने त्याच्या आयुष्यात वेचले.

मटाचं मराठी पर्व

लेखक नीलकांत यांनी शुक्रवार, 18/04/2008 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र टाईम्स ने गुढीपाडव्या पासून ते १ मे पर्यंत मराठी पर्व साजरा करायचे ठरवले आहे. या पर्वाच्या प्रत्येक दिवशी महाराष्ट्राच्या संबंधीत माहिती ते देताहेत. सोबतच त्या दिवशी कुणाची जयन्ती किंवा पुण्यातिथी असेल तर त्या व्यक्तीमत्वावर विशेष माहितीचं सदर असतं. त्यानंरचं विशेष आकर्षण म्हणजे, मराठी वॉलपेपर. झकास मराठी रंग असलेले वॉलपेपर ते देताहेत. एकदा नक्की पहावं, वाचवंस सदर आहे हे. दुवे देत आहे. महाराष्ट्र टाईम्स.कॉम मराठी पर्व मराठी - नीलकांत

बतावणी

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 18/04/2008 08:09 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ - विष्णुलोक नारद (क्षीरसागरात प्रवेश करत) : "नारायण! नारायण! देवा, आहात का?" विष्णू (शेषशय्ये वरुन गडबडीने उठत) - "अरे वा! आज रविवारी सकाळी सकाळी इकडे कुठे चरणस्पर्श मुनिवर?" नारद : "समस्याच मोठी बिकट आहे बघा देवा!" विष्णू : "समस्या? बिकट? आणि ती ही तुम्हाला? अहो तुमचा तर त्रिखंडात हिंडण्याचा उद्योग (स्वतःशीच - कळ लावत)! " नारद (चमकून) : "काय म्हणालात?" विष्णू :" नाही, तुम्हाला कशी आली समस्या? म्हणालो मी" नारद : " असं असं. आता पहा, तीन रात्रींपूर्वी मला स्वप्न पडले की माझे सर्व ज्ञान मी विसरुन गेलोय अगदी आत्मज्ञानासकट! आणि दुसर्‍या दिवशी उठतो तर काय खरेच मला काही स्मरणच होईना!

साहेबलोक !

लेखक संदीप चित्रे यांनी शुक्रवार, 18/04/2008 02:05 या दिवशी प्रकाशित केले.
पोटासाठी दाही दिशा, फिरवीशी तू जगदीशा! नोकरीठेप भोगत, देश-विदेश फिरताना, तरतर्‍हेचे मॅनेजर भेटतात / दिसतात. कधी आपले मॅनेजर म्हणून, कधी दुसर्‍या टीमचे मॅनेजर म्हणून, कधी आपल्या मित्र/मैत्रिणींचे मॅनेजर म्हणून तर कधी टी.व्ही, वृत्तपत्रे अशा मिडीयांतील बातम्यांमधून! आपल्या सुदैवाने बरेचजण चांगले असतात पण काही नमुनेही भेटतात !! काहीजण तर नमुनेदार असले तरी मॅनेजर म्हणून चांगले असतात ! तर, ही आहे साहेबलोकांची एक मिष्किल झलक ! थोडं हसायचं आणि सोडून द्यायचं ! गंभीरराव आपण interview देतानाच अंदाज येतो. ह्यांचा चेहरा अतिशय गंभीर आणि आपल्यावर डोळे रोखून बघायची सवय.

एप्रिल फळ (७)

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 17/04/2008 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
द्राक्षे खाण्याची आणखी एक गंमत आहे. त्या घडातला एखादा सुट्टा मणी जो थोडासा मऊ झालेला असतो. एखादा जर्रा वाळलेला असतो. तोंडात टाकला की त्याला अशी जादुई चव आलेली असते सांगताच येत नाही. गोड आणि आंबट एकामागोमाग चव येतच रहाते. द्राक्षाची ही तर्‍हा तर कलिंगडाची तर्‍हा आणखी वेगळीच . काही लोक त्याला टरबूज म्हणतात. म्हणु देत बिचारे पण कलिंगडाला टरबूज म्हणुन आपण त्याची बूज राखत नाही . खरबूज , टरबूज , साखर काकडी, चिबूड हे सगळे एकाच वर्गातले विद्यार्थी. प्रत्येकाचे काही वेगळे वैशिष्ठ्य. खरबूज कसे वाळूच्या सागरातुन थेट उचलून आणले आहे असे दिसते.खरबूजा चा मातकट सोनेरी रंग पटकन डोळ्यात भरत नाही.

मौनखेळ

लेखक पल्लवी यांनी गुरुवार, 17/04/2008 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
ह्रुदयी तव ठेवुनी माथा,हलकेच मी विसावता भिनली ही नीज नयनी,शांत झाली आर्तता ! अवचित मग जाग येता,तुझ्या ह्रुदय्-स्पन्दनी मिटले नेत्र जाणती रे,व्यथा ज्या तुझ्या मनी ! मिठी तुझी का घट्ट झाली,हालता मी उगा जरी जाईन मी कुठे कशाला,स्वर्गसुख हे तुझ्या उरी ! वाटे साद घाली, मज रातराणीचा सुगंध की सुवास हा तव तनुचा,नशीला अन मंद-धुंद ! बघ कसे बिलगुनी जाती,मोरपंखी लुब्ध वारे की श्वास हे तुझेच सखया,केसांतुन मम सळसळणारे ! राहु दे एकांत आपुला,शांत सुंदर अन स्तब्ध मौन हे राहु दे उशाशी,नको बोलबाला अन शब्द ! चांद बघ डोकावला, घ्याया निरोप आपुला पहाटराणी अल्लड आली,मौनखेळ हा संपला ! ~ पल्लवी ~

ह्या गांधींचं करायचं काय ???

लेखक छोटा डॉन यांनी गुरुवार, 17/04/2008 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
ग़ेले दोन दिवस झाले मी ह्या घटनेचा विचार करत आहे. पहिल्यांदा मी नेहमीचच आहे म्हणून दुर्लक्ष करून विसरण्याचा प्रयत्न केला पण काल रात्री "बघूया काय चाललय देशात" म्हणून "टी व्ही" लावला तर तेच नाटक चालू. अशी सणक आली ना मस्तकात कि विचारू नका, म्हणूनच हा लेख लिहण्याचा खटाटोप .... आत ह्यात गांधींचा काय संमंध ? पण मी ज्या लोकांबद्दल बोलतोय ते महात्मा गांधी नसून आजचे ढोंगी गांधी म्हणजे अनुक्रमे "सोनिया ग़ांधी, राहुल गांधी व प्रियंका वढेरा [ सोईसाठी ग़ांधी , कारण त्याशिवाय व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत नाही ]." एकूण दोन घटना आहेत ..... १.