Skip to main content

सारे प्रवासी गाडीचे

लेखक भोचक यांनी सोमवार, 21/04/2008 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
परशुरामची झोप मोडू नये म्हणून भुंग्याने पार मांडी फोडली तरी कर्णाने हु की चू केले नव्हते, असे म्हणतात. तद्वतच मध्य प्रदेश नामे राज्यात सार्वजनिक प्रवास करण्यासाठी कमीतकमी एवढी तरी सहनशीलता हवीच. सहनशीलतेची परीक्षा वा कसोटी पाहणारे प्रसंग आपल्या आयुष्यात अधून मधून येत असतील, पण या बाबतीत आपल्या लोकांना अधिक मजबूत करणेसाठी मध्य प्रदेश सरकारने कायमस्वरूपी सोय केली आहे, ती वाहतुकीच्या खासगीकरणाच्या रूपाने. आपल्याकडे 'यष्टी'च्या खासगीकरणाची आरोळी आली की सगळे कर्मचारी एकत्र येऊन शड्डू ठोकून उभे रहातात.

पापड

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 21/04/2008 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
पापड ही एक साईड डीश. भाजका तळका आणि मसाला हे तीन प्रकार आपल्याला माहीत असतात हे आणखी दोन नवे प्रकार पापड खाण्याचे १) कच्चा पापड त्याला दोन्ही बाजुनी किंचीत तुपाचा हात लावुन घ्यावा. पोळी भाजतो त्याच गरम तव्यावर पापड ठेउन त्यावरुन वाटीची उलटी बाजु फिरवावी..पापड हवा तेव्हढा भाजुन घ्यावा. हा पापड एकदम सपाट भाजला जातो. २)पोळी लाटुन घ्यावी त्यावर कच्चा पापड ठेवावा . त्यावर बारीक चिरलेला कांदा पसरून टाकावा.तिखटपूड आणि हवा असल्यास कांदा लसूण मसाला पेरावा. यावर आता दुसरी पोळी लाटुन ठेवावी.

गझल

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 21/04/2008 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
तेव्हा मुकीच होते आता मुकीच आहे आता मुकेपणाचा झाला सराव आहे जातीच्या प्रेमानं मी चिंब चिंब झाले आता धगीत माझे उद्ध्वस्त गाव आहे बोललेच नाही माझ्या व्यथा कुणाला सोसून सर्व घेणे माझा स्वभाव आहे आम्ही येथे भुकेले तेही तिथे उपाशी प्रत्येक माणसाला आमचीच हाव आहे गावात आम्ही हरलोच बाजी सजा न द्यावी त्यांना ऐसा ठराव आहे पाचोळाच जीवनाचा झाला अखेर माझ्या सांगा मित्रहो, माझा दोष काय आहे
Taxonomy upgrade extras

मिनी स्प्रिंग रोल्स

लेखक स्वाती दिनेश यांनी सोमवार, 21/04/2008 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
वसंतोत्सवाची खासियत असणार्‍या ह्या पदार्थाला सृष्टीमध्ये नवचैतन्य आणणार्‍या वसंतऋतुचेच नाव ह्या पदार्थाला देणारे चिनी रसिकच म्हणायला हवेत,नाही का?ह्या स्प्रिंग रोल्सची मजा घ्यायला दर वेळी 'हाटेल' गाठायची गरज नाही.ही घ्या रेसिपी- साहित्य- कोबी,गाजर,सिमला मिरची (लाल,पिवळी,हिरवी अशा रंगीत असल्यास उत्तम,नसल्यास ज्या असतील त्या),सेलरीपात २ काड्या,पातीचे २कांदे+कांदापात - ह्या सर्व बारीक चिरलेल्या भाज्या १.५ ते २ कप. सोयासॉस,मिरपूड,चिलीगार्ल
Taxonomy upgrade extras

घोडा आणि ओझे

लेखक विसुनाना यांनी सोमवार, 21/04/2008 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
दूर कुठेशी धूळ उडवतो घोडा माळावरती टापांखाली स्वप्न उद्याचे, नाकपुड्या फुरफुरती नवीन जीवन, नवीन मानव, सृष्टीही नवनवती नवीन आतुन मनही - सारे नवीन अवतीभवती सोमरसाचे करून प्राशन चढे कुणाला मस्ती देवेंद्राचे सूक्त गाऊनी वज्रच होई छाती करित पाठ ऋग्वेदऋचांचा कुणी आहुती देती मनामनातुन गुंजन करते 'ॐ शांती शांती ' आले कोठुन अंतरिक्ष, जल, - वायु, तेज अन धरती ? - मग्न चिंतनी कुणी शोधतो विश्वाची उत्पत्ती ईश एकला आहे त्यांचा, एकच आहे पाती कुणी जाणतो पूर्णब्रह्म अन कुणी पिकवतो शेती *** *** जिथे वाहिली सिंधुसरिता अगाध पिकवित मोती आमच्या पेशींमधली जनुके तिथे पोसली होती आजमितीला गंजुन गेल

.....बळ दे !

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 21/04/2008 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
.....बळ दे ! दोन हांत जोडून माझं एकंच मागणं देवा , दु:ख दूर करु नकोस , पण ते सोसायचं बळ दे ! कोण तसा जीवनांत सुखासीन असतो? स्वदु:खात आणि परसुखात हसायचं बळ दे ! जीवनाच्या जुगारांत हार्-जीत असणारच , एकदा तरी "सुंदर" शी खेळी "फसायचं" बळ दे ! दिवसा ढवळ्या भले कितीही पापं लपू देत , अंधारातही स्वतःच्या चुका दिसायचं बळ दे ! कुणीतरी जीव लावेलंच ना या वेड्याला? थकून कधी ते अश्रू ढाळील , तर ते पुसायचं बळ दे ! स्वप्नं ऊरी कवटाळून रमी खेळत रहाणारा मी , सरते "शेवटी" "प्लस्" व्हावं , इतकं पिसायचं बळ दे

मैत्री म्हणजे कांय?

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 21/04/2008 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्री म्हणजे कांय? समज तुला तहान लागली आहे. समोर पाणी नाहिये , यावेळी मीही तुझ्यासोबत नाहिये. अशा वेळी समजा तुझी तहान शमलीच , तर खुशाल समज की , मला तुझ्या घशाची कोरड जाणवली आहे आणि ती मी माझ्याकडे ओढून घेतली आहे ! मैत्री म्हणजे कुणीतरी , कुणाची तरी , ओढून घेतलेली तहान आहे. ते नातंच इतकं महान आहे , की , त्याला मैत्री हे शिर्षक खूपच लहान आहे ! मैत्री म्हणजे मला जाणवलेला तुझ्या घशाचा कोरडा आहे ! ज्याला हे समजलं तो शांत आहे , इतरांचा मात्र मैत्रीच्या नावाने ओरडा आहे !

लास वेगास!

लेखक पिवळा डांबिस यांनी सोमवार, 21/04/2008 08:10 या दिवशी प्रकाशित केले.
लास वेगास - सिन सिटी (पापांचं शहर)!!
... ...
गेल्या आठवड्यात लास वेगासला गेलो होतो. तसा मी तिथे पूर्वी गेलो आहे. एकतर ते एल्.ए. पासून जवळ (म्हणजे ड्रायव्हिंग करून जाण्यासारखं) आहे, आणि दुसरं म्हणजे तिथे बर्‍याच कॉन्फरन्सेस होत असतात. यावेळी असाच एका कॉन्फरन्सला तिथे गेलो होतो. परत आल्यावर सहज कुतुहलाने पाहिलं तर मिपावर या शहरावर काही लेखन केलेलं आढळलं नाही. अमेरिकेत रहाणारे बहुतेक भारतीय कधी ना कधी लास वेगासला जातातच.