Skip to main content

मराठेशाहीचे अखेरचे सेनापती - बापू गोखले

लेखक kvponkshe यांनी शुक्रवार, 19/02/2021 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर नजीक तळेखाजण येथे पिरंदवणे (तळेखाजण वाडी) येथे गोखले घराणे वसले होते. लष्करी पेश्याची कोणतीही परंपरा असण्याची शक्यता नसलेल्या या घराण्यात १७७१ मधे नरहर उर्फ बापू गोखले याचा जन्म झाला. बापुंचे वडील गणेशपंत, चुलते मोरोपंत व लक्ष्मणपंत हे शेतकरीच असावेत. बापूंच्या आई विषयी माहिती मिळत नाही.पितृसहवास बापुना किती लाभला&nbsp

प्रवास (भाग 8) (शेवटचा)

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 19/02/2021 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास भाग 8 पोलीस स्टेशनमध्ये शिरताच राठींनी भिकुला लॉक अप मध्ये टाकले आणि अनघा-मनाली-मंदार-नवीन यांना घेऊन ते त्यांच्या केबिनमध्ये आले. त्यांनी एका हवालदाराला या मुलांसाठी पाणी आणायला संगितले आणि त्यांना समोर बसवत म्हणाले;"तुम्हाला जे माहीत आहे ते सगळं सांगा आता." नवीन बोलायला सुरवात करणार होता; इतक्यात अनघाने इन्स्पेक्टर राठींना विचारलं;"इन्स्पेक्टर, आनंद कुठे आहे? मला एकदा त्याला बघायचं आहे." राठी शांतपणे म्हणाले;"तुम्ही अनघा न? आनंद...." राठींना बोलू न देता मनाली एकदम म्हणाली;"इन्स्पेक्टर, त्यानेच तुम्हाला पाठवलं नं आमच्यासाठी. मला वाटलंच.

अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांचे सादरीकरण अ २ पान १ ते २

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 19/02/2021 00:40 या दिवशी प्रकाशित केले.

अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांचे सादरीकरण अ २ पान १ ते २

1 2

जेव्हा अदम्य ऐसी

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 18/02/2021 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा अदम्य ऐसी निद्रा कवेत घेते आकाशभाषितांना ध्वनिचित्ररूप येते अंधार भिनत जाता भवताल स्तब्ध होते संवेदनांस अवघ्या व्यापून साक्षी उरते दिग्बंध सैल होती तर्कास काम नुरते कालौघ थांबतो अन् आभास सत्य होते अज्ञातशा स्वरांचा अनुनाद ऐकू येतो एकेक जाणिवेचा अस्पष्ट बिंदू होतो निद्रा अशी कृृृृपाळू अंकी तिच्या मी क्लांत मी शून्य एरवी, पण निद्रेत मी अनंत
काव्यरस

"पोंक्शा ~~~~ येतोस का डबा खायला ?"...

लेखक kvponkshe यांनी गुरुवार, 18/02/2021 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
आम्हा मुलांचे दहावीचे वर्ष असते .... आम्हा सगळ्यांना प्रिलिम चे आणि नंतर च्या SSC परीक्षेचे वेध लागलेले असतात ... शाळेय जीवन अगदी काही आठवड्यांचे राहिले असते... अभ्यास करूच , पण उरलेल्या दिवसात खूप मजा करून घेऊ अशी भावना असते सगळ्यांची .... पण शालेय जीवन निरागस असते अशी एक फसणूक करणारी समजूत आहे ... वर्गात एक मुलगा असतो .... गोरा ... घाऱ्या डोळ्यांचा ... काटकुळा ... संवादिनी वर काळी दोन च्या स्वरात पण नाकात बोलणारा ... त्याची ती "पोंक्शा ~~~~ येतोस का डबा खायला ?" अशी खर्जातील पण सानुनासिक हाक मला चांगलीच आठवते ... त्याच्या आजी बरोबर तो एका वाड्यात राही ...

सांगली येथे राहणारे कुणी मिपाकर आहेत का?

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 18/02/2021 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, दिनांक, 23-24-25 फेब्रुवारी, 2021, ह्या दरम्यान, मी आणि आमची सौ. सांगलीला येत आहोत. 24 तारखेला, संध्याकाळी 5-7 ह्या दरम्यान, एखादा छोटासा कट्टा करता येईल का? सांगलीत पहिल्यांदाच येत असल्याने, ह्या शहराविषयी खूप काही माहिती नाही. कळावे, लोभ आहेच, तो वाढावा ही विनंती ....

गाठोड

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 18/02/2021 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
खतपाणी घातलं निगा राखली झाडाची बिज होत चागंल तरी फळे मीळाली विषाची वाटल झाड आहे दुबळं त्याला द्यावी साथ देणार्‍याचा अदांज चुकला तुटायला आले हाथ जरी ऋणानुबंधाच्या गाठी तरी प्रारब्धाचा खेळ कर्मच नाही चांगल तर जुळणार कसा मेळ आपल घर आपणच बाधांयचे पेरललं तेच उगवायचे क्षणभराची विश्रांती घेऊन पुन्हा इथेच यायचे कोण कुणाला पुरायचं म्हणूनच आतल्या देवाला निरंतर जागवायचं आयुष्याच गाठोडे आपण आपलच पेलायचं १६-२-२१

Ford vs Ferrari हा सिनेमा जरूर बघा ...

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 17/02/2021 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
मी रोज रात्री, एक तरी सिनेमा बघतोच...पण कधी कधी चांगला चित्रपट मिळाला नाही तर, Avengers जिंदाबाद... मी Captain Marvel बघत होतो, तितक्यात मुलगा म्हणाला, की हा सिनेमा किती वेळा बघणार? कालच मी, Ford vs Ferrari बघीतला.जबरा पिक्चर आहे.मुलांना, Tenet, Inception,.वगैरे सिनेमे आवडतात.आम्ही कुणीच, खानावळीत जेवत नाही. मुलांची आवड माहिती असल्याने, लगेच सिनेमा बघीतला.संवाद हिंदीतून असल्याने, सिनेमा समजायला पण सोपा गेला. Fordच्या गाड्यांची मागणी घटत असल्याने,मागणी वाढवायची असेल तर, फोर्डने गाड्यांच्या शर्यतीत उतरावे, असा सल्ला, ली आयकोका देतो.

'असेल घडले' आज काही इतिहासात :(

लेखक उपयोजक यांनी मंगळवार, 16/02/2021 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
असेल घडले आज काही इतिहासात पकडून का ऐकविले पाहिजे ते प्रत्येकास? असेल घडले आज काही इतिहासात लेखांची माळ का लावली मिपाच्या शेतात? असेल घडले आज काही इतिहासात आदळते डोळ्यांवर मिपा उघडताच असेल घडले आज काही इतिहासात घडू द्या तिकडे चला आपण जगू वर्तमानात असेल घडले आज काही इतिहासात स्क्रोलचा पर्याय आहे अजूनी हातात