Skip to main content

प्रवास (भाग 9) (खरा शेवट....)

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 27/02/2021 02:53 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास भाग 9 (खरा शेवट) पवारने भिकुला गाडीत बसवलं आणि गाडी वाड्याकडे वळवली. भिकू गाडीतून उतरत असताना पवार म्हणाला;"बाकी सगळे सुटणार भिकू.... तुझं तू बघ. कारण जोपर्यंत तू अडकला आहेस; तोपर्यंत ते चौघे सेफ आहेत." पवारने गाडी वळवली आणि निघून गेला. वाड्याच्या दिशेने पाऊल उचलत भिकू म्हणाला;"धाकटे मालक.... तुम्ही आणि मी!!!!! आलो मी......" जाता जाता पवारने भिकू जे बोलला ते ऐकलं होतं. 'येड लागलं बहुतेक या राक्षसाला....' पवारच्या मनात आलं. *** भिकू शांतपणे चालत होता वाड्याच्या दिशेने. पण त्याचे कान दूर जाणाऱ्या गाडीचा मागोवा घेत होते. गाडी नक्की निघून गेली याची भिकुला खात्री झाली.

अध्याय ३ श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचे सादरीकरण

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 27/02/2021 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
३ ३ या अध्यायातील विषयवस्तू प्रबंधात सविस्तर लिहिली आहे म्हणून इथे संक्षिप्त रूपात सादर केली आहे.

एका तळ्यात होती...

लेखक शब्दसखी यांनी शुक्रवार, 26/02/2021 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
खूप लहान असल्यापासून एका तळ्यात होती बदके पिले सुरेख हे गाणं सतत कानावर पडत आलंय. हळूहळू त्याचा अर्थसुद्धा समजायला लागला. बदकाच्या पिल्लांपेक्षा वेगळ्या किंवा कुरूप दिसणाऱ्या राजहंसाच्या पिल्लाला एकटेपणाचा आणि अवहेलनेचा सामना करत अखेर स्वतःच्या राजहंस असण्याची आणि पर्यायाने त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असण्याची जाणीव होण्याचा हा प्रवास. त्यावेळी हे गाणं संपताना त्या राजहंसासाठी छान तर वाटायचंच पण बदकांची बरी जिरली असं पण वाटायचं. आता मात्र प्रश्न पडतो की त्या राजहंसाचं पुढे काय? म्हणजे तो इतरांपेक्षा जास्त सुंदर, डौलदार आहे म्हणून आता त्याला रुपावरुन कोणी हिणवणार नाही हे ठीक.

लाइक द फ्लोइंग रिव्हर (ऐसी अक्षरे....मेळवीन १)

लेखक Bhakti यांनी शुक्रवार, 26/02/2021 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
लाइक द फ्लोइंग रिव्हर (ऐसी अक्षरे....मेळवीन) लेखक –पाउलो कोएलो अनुवाद –चंद्रकांत सहस्रबुद्धे अल्केमिस्ट वाचल्यानंतर पाउलो यांच दुसरेच पुस्तक हाती पडले.वाचायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आले पाउलो यांची ही २०१०-२०१२ या कालखंडात लिहिलेली दायारीच आहे.नुकतेच त्यांनी लिखाणासाठी संगणक वापरायला सुरुवात केली आहे,अमेरिकेतील ट्रेड सेंटरच अपघात वगैरे समकालीन घटना यात लिहिल्या आहेत.थोड वाचून झाल्यावर स्वत:ला प्रश्न विचारला ..खरच हे बौद्धिक,वैचारिक वाचायची आता गरज आहे का?पण थोडे अजून वाचुया हे ठरवलं. आणि खरोखरच प्रेम,मन:शांती,युद्ध विशेष म्हणजे मृत्यु याबद्दल एव्हढ सुंदर सोप्या भाषेत पा

प्रोफाइलवरती बाई..!!

लेखक चलत मुसाफिर यांनी शुक्रवार, 26/02/2021 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
(टीप: अनाहितांची साष्टांग माफी मागून) प्रोफाइलवरती बाई अशि काही दिसते धासू तो फोटो पाहुन येती झुंडीने चावट वासू कुणी भोजनपृच्छा करतो कुणी थेट घालतो डोळा बाईच्या भवती जमती भुंगे सतराशे सोळा बाईचे आशिक मुबलक कुणि पुतण्या तर कुणि काका रंगेल एकसे एक बाईस मारिती हाका मेसेज पटापट येती गालात हासते बाई पाहता गड्यांची गर्दी तिज हसू अनावर होई ती विचार करुनी लिहिते, पुसते, -अन पुन्हा लिहिते ते 'टायपिंग..' दिसताच वासूंचे भान हरपते डोळ्यात प्राण आणूनी व्याकूळ पाहती वाट कंठाशी येती प्राण वासूंची हालत 'ताठ' दो अशाच घटका जाती मग 'टिंग!' वाजतो फोन वासूंच्या टोळ्या येती तो वाचण्यास धावून उघडता फोनचा प

भगवंत....

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी शुक्रवार, 26/02/2021 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
भगवंत..!! भुकेल्यास देई अन्न, दुर्बलास धीर, आंधळ्याची काठी होई, तोच खरा थोर... दीनजन सेवेसाठी, झिजवी "तो" शरीर, याचकासि कर्ण होई, तोच खरा थोर... तान्हुल्यास क्षीर देई, तृषार्तास नीर, कुणा द्रौपदीस चीर देई, तोच खरा थोर... अनाथांची होई माय, शत्रुपुढे वीर, पतितांना उद्धरुन नेई, तोच खरा थोर... कुणी म्हणती गुरु त्याला, कुणी म्हणे संत, सर्वांतरी तोच आहे, माझा भगवंत.....!!! जयगंधा.. २४-२-२०२१.
काव्यरस

सय...

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 25/02/2021 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
पाहुणचार बरेचदा औपचारिकता,आपली संस्कृती आहे.पण आपल्याच माणसांकडे खेळीमेळीचा पाहुणचार न राहता ती होती आपुलकीची सय..मऊ,कोमल. आत्याच्या गावी निवांत जायचे..

सध्या मी काय पाहतोय ? भाग २

लेखक मदनबाण यांनी बुधवार, 24/02/2021 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
हल्लीच मोदींनी हिंदुस्थानात निर्माण केलेला आणि जगात अव्वल दर्जाचा असलेला अर्जुन एमके- १ ए हा लढाऊ रणगाडा लष्कराला सुपूर्द केला. ११८ अर्जुन एमके- १ ए रणगाड्यांच्या खरेदीचा प्रस्ताव देखील आता क्लिअर झाला आहे.

ट्राईब्स ऑफ युरोपा : नेटफ्लिक्स

लेखक साहना यांनी बुधवार, 24/02/2021 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
गेम ऑफ थ्रोन्स, वॉकिंग डेड इत्यादींच्या अभूतपूर्व यशानंतर अनेकांनी ह्या प्रकारचा मसाला टाकून विविध सिरीस निर्माण केल्या. १०० काय, बेडलँड्स काय, एक्सपांस अनेक ठराविक साच्यातील साय फाय किंवा फँटसी सिरीयल ची चलती आहे. एक वेगळे विश्व् निर्माण करायचे म्हणजे २३०० तील पृथ्वी किंवा दुसरा ग्रह वगैरे. मग त्यांत विविध टोळ्या, राजघराणी वगैरे असतात. ह्यांचात दुश्मनी असते. प्रत्येक टोळीचा जो प्रमुख नेता असतो तो मग काही तरी अवघड निर्णय घेतो, सत्तेसाठी षडयंत्रे, अनेक बरी वाईट पात्रें, भरपूर हिंसा आणि त्याला विनाकारण लावलेला शृंगाराचा तडका.