ज्यूलीची श्रद्धा
" मी एक साधारण माणूस आहे.फक्त मी ज्याच्यावर विश्वास ठेवते,ज्यांच्यावर माझी श्रद्धा आहे त्यांवर मी लक्ष ठेवते."
"ज्युली तू किती ग्रॆट आहेस " असं मी तिला म्हणालो.
त्याचं असं झालं,
माझी मोठी वहिनी गोव्याची.पेडण्याला तिचे आईवडिल राहायचे.लहानपणी माझ्या वहिनी बरोबर मी उन्हाळ्याच्या सुट्टीत तिच्या माहेरी अनेक वेळा गेल्याचं आठवतं.
उन्हाळ्यात विशेष करून गोव्यात फळफळावळ,फुलं आणि मासे यांची लयलूट असायची.मांडकूर आंबा मला खूपच आवडायचा.तसं पाहिलं तर आंब्यांचा राजा हापूस आणि त्यात वाद नाही.हापूस आंबा नीट पिकल्यावर त्याचा जो गंध दरवळतो तो कुणाकडून लपून राहणार नाही.तसंच हा हापूस आंबा नीट पिकल्यावर कापला की त्
मिसळपाव