Skip to main content

मौनाला फुटली वाणी!..

लेखक स्वाती फडणीस यांनी मंगळवार, 19/08/2008 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
मौनाला फुटली वाणी!.. . एक ना स्फुरला शब्द.. एक ना ओळ सुचली.. हसले रडले ओठांनी..! एक ना कविता रचली. शब्द पाखरे भवताली, सुर गुंफून भिरभिरली.. तार तार झंकारुनी... कंपने कंपनांत विरली..!!! अनाहतसा नाद छेडूनी.. मौनाला फुटली वाणी!.. अगम्य अशा बोलांची.. नकळत जुळली गाणी..!!! हसले रडले ओठांनी... नकळत जुळली गाणी..!!! ================== स्वाती फडणीस....... १७-०८-२००८
Taxonomy upgrade extras

कोशिंबीर

लेखक मुन्नाभाई एम बी बी एस. यांनी मंगळवार, 19/08/2008 16:43 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : ४ मध्यम आकाराचे पांढरे कांदे, दही, मिठ, साखर,पाव चमचा मिरेपुड,चिमुटभर कोथिंबिर कृती : कांदे सोलुन चिरुन घ्या. त्यात चविप्रमाणे मीठ ,साखर घाला. मीरेपुड घाला. वरुन हवी असल्यास कोथिंबिर पेरा. दही. सरसरित करुन घाला. कोशिंबीर तय्यार. टिप : दही आयत्या वेळेला घाला म्हणज़े पाणी सुट्णार नाही. कोणत्याहि पराठ्याबरोबर ही कोशिंबीर छान लागते.

प्रथमस्थानी (लग्नस्थानी) एकटा शुक्र असलेले व्यक्ती आणि त्यांचे स्वभाव

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 19/08/2008 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
ज्यांच्या कुंडलीत प्रथमस्थानी (लग्नस्थानी) एकटा शुक्र आहे ( मग तो वेगवेगळ्या राशीत असु शकतो) अशा व्यक्तींची स्वभाव वैशिष्ट्ये काय असतात? हा या चर्चेचा उद्देश आहे. एकटा शुक्र म्हणजे शुक्रासोबत आणखी एखादा ग्रह नसणे. युती नसणे. मग त्यावर दृष्टी असेल तर हरकत नाही. माझ्या कुंडलीत प्रथमस्थानी (लग्नस्थानी) मीन राशीतील एकटा शुक्र आहे व माझी रास ही योगायोगाने वृषभच आहे. (वृषभ राशीत चंद्र). मला चित्रकला चांगली जमते. तसेच माझी व्यंगचित्रे ही प्रकाशित झालेली आहेत. संगीत, अभिनय, कॉमिक्स लिहिणे, विनोदी कथा लिहिणे मला आवडते. आपल्या पैकी कुणाच्या कुंडलीत प्रथमस्थानी शुक्र आहे का? विषेशकरून मीनेचा शुक्र?

आता काय करावं? नसत लचांड... :(

लेखक मनिष यांनी मंगळवार, 19/08/2008 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी अनपेक्षितपणे एका वेगळ्याच समस्येत फसलोय. साधारण दोन वर्षापुर्वी मारुती ट्रू-व्हॅल्यू मधून सेकंड-हँड कार घेतली आणि ती चांगली चालली आहे . काल रजिस्टर पोस्टाने कोल्हापुरच्या हातकणंगले (? गावाचे नाव नक्की महित नाही) गावाहून पोलिसांकडून पत्र आले -- त्यात एका अपघाताचा उल्लेख आहे (तारीख आणि नक्की काय झाले त्याचा उल्लेख पत्रात नाही) आणि त्यासंदर्भात कागदपत्रे आणि गाडी घेऊन हातकणंगले इथे बोलावले आहे. मी गाडी कधीही पुण्याबाहेर नेली नाही, तसेच मी घेतल्यापासून तिला कुठलाही छोटा-मोठा अपघात झाला नाही. अर्थात मी घ्यायच्या आधी झाला असेल तर काही माहित नाही.

द्दावं,द्दावं आणि द्दावं

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 19/08/2008 07:35 या दिवशी प्रकाशित केले.
"हे दातृत्वच मला दुसर्‍यांशी,जगाशी आणि देवाशी दुवा जोडायला मदतीचं होणार आहे" माणसांची आयुष्ये खरोखरंच गोष्टींचा "एनसायक्लोपीडाया" आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होईल असं मला वाटत नाही. प्रत्येक व्यक्तिची आयुष्यातली कथा दुसर्‍या व्यक्तिपासून निराळीच असते.घटना जवळ पास तशाच घडत असतील,पण अनुभव नक्कीच वेगळे असणार.आणि त्या त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टीकोन प्रत्येकाचा निराळाच असणार. मंजूचे अनुभव ऐकून मला वाटलं ही पण एक ऐकण्यासारखी कथा आहे.त्यामुळे ती कायसांगत होती ते मी निमुटपणे ऐकून घेत होतो.फक्त तिची ती दुःखी कहाणी ऐकून थोडा मायुस झालो.पण त्यातुनही काही शिकण्यासारखं तिच्या तोंडून ऐकून काही तरी कमवि

..

लेखक प्रियाली यांनी मंगळवार, 19/08/2008 07:01 या दिवशी प्रकाशित केले.
..

भ्रमणमंडळाची स्थापना !!!

लेखक स्वाती दिनेश यांनी मंगळवार, 19/08/2008 02:45 या दिवशी प्रकाशित केले.
म्युन्स्टर (जर्मनी)दि. १८.०८.०८ (प्रतिनिधी) : जर्मनीतील मिपाकरांची बैठक शनिवार दि. १६ .०८.०८ रोजी श्री. लिखाळ यांच्या म्युन्स्टर ,जर्मनी येथील सदनिकेत घेण्यात आली. सदर बैठकीत मिसळपाव भ्रमणमंडळ,जर्मनी शाखेची स्थापना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. ह्या आनंदाच्या क्षणी विडंबनाचार्य केशवसुमार, स्वाती ,दिनेश ,सौ व श्री लिखाळ उपस्थित होते. त्याचबरोबर श्री.विपिन चिंचाळकर हे मिपाचे पाहुणेही ह्या ऐतिहासिक प्रसंगास साक्षी होते. सौ.

बीस साल बाद

लेखक विकास यांनी मंगळवार, 19/08/2008 01:17 या दिवशी प्रकाशित केले.
आज म्हणजे १८ ऑगस्ट २००८ ला पाकीस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदावरून परवेझ मुशारफची "सालंकृत" उचलबांगडी झाल्याचे वाचले आणि अचानक बरोब्बर वीस वर्षांपूर्वी (१७ ऑगस्ट, १९८८ साली) पाकीस्तानवरील झिया उल हक यांची विमान अपघातात (की घातपातात?) हत्या होऊन अशीच किंबहूना याहूनही अधीक गंभीर हुकूमशाही संपल्याचे आठवले.... जनरल झीया उल हक यांनी १९७७ मध्ये झुल्फिकार अली भूत्तोंना पदच्यूत करून सत्ता काबीज केली... नंतर काही काळातच त्यांनी भूत्तोंना मृत्यूदंडाची सजा देऊन ती आमलात देखील आणली. मग बराच काळ हुकूमशाही टिकली. अर्थातच तेंव्हा अमेरिकेस (रेगन आणि मोठा बूश) त्यांचे सरकार असणे सोयीचे होते.

नफिसा यादव

लेखक स्वाती फडणीस यांनी मंगळवार, 19/08/2008 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
नफिसा यादव राजसच्या शाळेला दिवाळीची सुट्टि.. आणि त्यात शनीवार असल्यामुळे नवरोबाही घरात्..तसा दर शनीवारी मला त्याचा फार हेवा वाटतो पण आज जरा जास्तच वाटत होता. त्यात त्याची शेषशाही मुद्रा.. आणि चिरंजीवांची मस्ती.. त्यांच्या भोवती घुटमळणार्‍या मला टुकटुक करुन वाकुल्या दाखवत होती. ऑफिसल दांडि मारावी अस मनात शंभरदा येताना आवरा-आवर करणारी मी.. घरात सगळेच सैलावलेले.. माझी ही जरा अळम-टळमच चाललेली.. तस फारस काम नव्हत थांबाव का घरी.. म्हणता म्हणता माझी तयारी झालिही..चला आता थांबून चालणार नाही माझ मलाच सांगत समजावत बेटूचा पापा घेऊन निघाले.. तोवर बहाद्दुर दारात हजर झाला..