ज्यांच्या कुंडलीत प्रथमस्थानी (लग्नस्थानी) एकटा शुक्र आहे ( मग तो वेगवेगळ्या राशीत असु शकतो) अशा व्यक्तींची स्वभाव वैशिष्ट्ये काय असतात? हा या चर्चेचा उद्देश आहे.
एकटा शुक्र म्हणजे शुक्रासोबत आणखी एखादा ग्रह नसणे. युती नसणे. मग त्यावर दृष्टी असेल तर हरकत नाही.
माझ्या कुंडलीत प्रथमस्थानी (लग्नस्थानी) मीन राशीतील एकटा शुक्र आहे व माझी रास ही योगायोगाने वृषभच आहे. (वृषभ राशीत चंद्र).
मला चित्रकला चांगली जमते. तसेच माझी व्यंगचित्रे ही प्रकाशित झालेली आहेत. संगीत, अभिनय, कॉमिक्स लिहिणे, विनोदी कथा लिहिणे मला आवडते.
आपल्या पैकी कुणाच्या कुंडलीत प्रथमस्थानी शुक्र आहे का? विषेशकरून मीनेचा शुक्र?
कारण माझ्या पाहाण्यातील एकाही नातेवाईकाच्या किंवा मित्राच्या कुंडलीत असा योग नाही.
कुणाच्या कुंडलीत तसा योग असल्यास सांगावा. तसेच जे ज्योतिष जाणतात, त्यांनी उपयुक्त माहिती याबाबत द्यावी, ही विनंती...!! धन्यवाद.
---- निमिष सोनार, पुणे
वाचने
5174
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझ्या
शुक्र
हे सगळे असते म्हणजे काय असते
कुंभेचा
In reply to हे सगळे असते म्हणजे काय असते by विजुभाऊ
मला चार वर्षाचा मुलगा आहे.
माझ्या मुलाच्या