आता काय करावं? नसत लचांड... :(
लेखनप्रकार
अगदी अनपेक्षितपणे एका वेगळ्याच समस्येत फसलोय. साधारण दोन वर्षापुर्वी मारुती ट्रू-व्हॅल्यू मधून सेकंड-हँड कार घेतली आणि ती चांगली चालली आहे . काल रजिस्टर पोस्टाने कोल्हापुरच्या हातकणंगले (? गावाचे नाव नक्की महित नाही) गावाहून पोलिसांकडून पत्र आले -- त्यात एका अपघाताचा उल्लेख आहे (तारीख आणि नक्की काय झाले त्याचा उल्लेख पत्रात नाही) आणि त्यासंदर्भात कागदपत्रे आणि गाडी घेऊन हातकणंगले इथे बोलावले आहे. मी गाडी कधीही पुण्याबाहेर नेली नाही, तसेच मी घेतल्यापासून तिला कुठलाही छोटा-मोठा अपघात झाला नाही. अर्थात मी घ्यायच्या आधी झाला असेल तर काही माहित नाही. कारचे रजिस्ट्रेशन कोल्हापूरचे (MH-09) आहे.
त्या पत्रातील तक्रार क्रमांकावरून (XX/०८) ही या वर्षातील तक्रार वाटते आहे. जर मी गाडी विकत घ्यायच्या आधीचा प्रॉब्लेम असेल तर मग ट्रान्सफर पेपर आणि गाडीचे कागदपत्र दाखवून प्रकरण संपेल असे वाटते. पण जर गेल्या २ वर्षातील अपघात असल्यास काय करू? तिथे मी कधी गेलोच नाही हे कसे सिद्ध करता येईल (केलेली गोष्ट एक वेळ सिद्ध करता येईल, पण न केलेली?) काहिही न करता फुकटच गळ्यात लचांड पडले आहे, मी हे गाव हातकणंगले कधी पाहिलेही नाही. माझी पुढच्या महिन्यात परिक्षा आणि कामही खूप आहे त्यामुळे तिथे जाणे शक्य नाही (आणि गाडी तिथे नेणे तर शक्यच नाही), आधीच डोक्याला भरपूर व्याप, ताप आहेत...काय करावे? कोणाला अशा प्रकरणाचा अनुभव आहे का? कोल्हापूरला पोलीसात कोणाची (जुजबी चौकशी करण्याइतपत) ओळख आहे का? आत्तापर्यंतचा पोलिसांचा अनुभव चांगला नाही, त्यामुळे पत्रात दिलेल्या नंबरवर अजून फोन केला नाही. अशा वेळी काय करता येईल? मला हे लवकरात लवकर संपवायला आवडेल, विनाकरण मनस्ताप होतोय....डोक्याला नुसता त्रास! :(
कोणी ह्या संदर्भात मदत केल्यास फार, फार आभारी राहीन.
वाचने
3778
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
ह्म्म
अरे
लचांड आहे खरे.
माझ्या
मनीष,
वकिलामार्फत
वकिलाशी बोलतो...
घाबरू