Skip to main content

छायाचित्र : पिवळे फुल

लेखक कोलबेर यांनी बुधवार, 20/08/2008 08:14 या दिवशी प्रकाशित केले.
इथल्याच एका बागेत टिपलेले हे पिवळे फुल. नाव कोणते आहे ते बघायचो विसरलो! :(

माझीही काही रेखाटने - लहान बाळे

लेखक सैरंध्री यांनी बुधवार, 20/08/2008 04:24 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर , मी सैरंध्री. मिपाचे नुकतेच सदस्यत्व घेतले आहे. मराठी संकेतस्थळांमधले मिपा हे एक छान संकेतस्थळ आहे. मिपावर वाचण्यासारखे खूप काही आहे पण सध्या मी तेवढा वेळ देऊ शकत नाहीये. पण कोणी चित्रे , रेखाटने टाकली तर आवर्जून बघते. चित्रकला माझा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. मी पेन्सिल स्केचेस काढते आणि २००४ पासून ऑईल पेंटिंग ही करत आहे. येथे बर्‍याच जणांनी काढलेली चित्रे बघून मलाही माझी रेखाटने मिपाकरांबरोबर शेअर करावीत असे वाटले. सुरवात लहान बाळांच्या रेखाटनापासून करते. लहान बाळे किती निरागस, निष्पाप आणि निर्मल मनाची असतात. त्यांच्या बाळलीला बघणे कोणाला आवडत नाही?

(पहा वेळ झाली!)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 20/08/2008 02:54 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ.श्रीकृष्ण राऊत यांची 'कशी वेळ आली?' ही छोटी गजल वाचून आमच्यावर आलेली एक बिकट वेळ अंगावर काटा उभी करुन गेली! :SS :T पहा 'वेळ' झाली! 'ठमा' क्रूर आली! पळे भीत 'रिंकू'; लपेटून शाली. करा बंद गाणी; कुठे ती पळाली? बिछान्यात माती बुटांची मिळाली. कशी ही विचारे; सदर्‍यास लाली? मिळे चोप 'रंग्या'; घरी कोतवाली! चतुरंग

हू एम आय!

लेखक प्राजु यांनी बुधवार, 20/08/2008 02:52 या दिवशी प्रकाशित केले.
"चांगला धुतला त्या शोएब ला धोनी ने" असे उद्गार बर्‍याच वेळेला ऐकायला वाचायला मिळतात. इथे हे उद्गार एक भारतीय एका पकिस्तानी बद्दल बोलत असतो. कित्येक वेळेला सहज गप्पांमधून जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय सिमा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा पाकिस्तान बद्दल वाईटच बोललं जातं. पाकिस्तानातून होणारि घुसखोरी, मुशरर्फ सरकारचा ओसामाबीन लादेन ला असणारा पाठींबा, दाऊद इब्राहिम ला पाकिस्तानात राहण्यासाठी आश्रय देण्याच्या बातम्या यांनी भारतीय मनात पाकिस्ताना बद्दल एक अढी निर्माण झाली आहे. भारतीय सामान्य जनता ही पाक सामान्य जनतेचा विलक्षण तिरस्कार करते.

६१ वा स्वातंत्र्यदिन की ६२ वा?

लेखक भास्कर केन्डे यांनी बुधवार, 20/08/2008 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, हा आपला ६१ वा स्वातंत्र्यदिन की ६२ वा? काही वॄत्तपत्रे म्हणतात एक्सष्टावा तर काही बासष्टावा. माझे मत... एकसष्टावा. का? १५ ऑग. १९४७ ला पहिला स्वातंत्र्यदिन. १५ ऑग. १९४८ ला दुसरा. १५ ऑग. १९५८ ला बारावा. १५ ऑग. १९६८ ला बावीसावा. . . . १५ ऑग. २००८ ला बासष्टावा. मग ६१ च घोळ का? समजा आमचा बब्या एक वर्षाचा झाला... तर तो त्याचा पहिला वाढदिवस. दोन वर्षाचा झाला तर दुसरा. मात्र आपला देश ६१ वर्षाचा झाला तर तो त्याचा ६२ वा स्वातंत्र्यदिन, नव्हे का?

वस्ति वसविली मी अगदी जगावेगळी

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 19/08/2008 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुवादीत. कवी--फारूक जामी) प्रतिमा तुझी माझ्या हृदया जवळी वस्ति वसविली मी अगदी जगावेगळी दैव माझे सजवूनी दिलास तू आकार निष्कामी मला तू बनविलेस मुर्तिकार शब्द नी शब्द ठेविला मी हृदया जवळी वस्ति वसविली मी अगदी जगावेगळी आणूनी स्मरणात केली मी पुजा रात्रंदिनी अचंबीत झालो ततक्ष्णी पाउलांची निशाणी पाहूनी झुकवूनी मस्तक माझे वाहतो फुलांची ओंजळी वस्ति वसविली मी अगदी जगावेगळी करूनी गीतांची माला वाहिली मी तुझ्या गळी दूर राहूनी पुकारले तुला सकाळ संध्याकाळी कोणत्या कारणी दिलीस शिक्षा अशी आगळी वस्ति वसविली मी अगदी जगावेगळी श्रीकृष्ण सामंत

कहानी एक मकान किरायेपर

लेखक गमत्या यांनी मंगळवार, 19/08/2008 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
खाली दिलेले पथनाट्य मि व माझ्या सहकार्र्यांनी ह्या १५ ऑगस्ट आमच्या कंपनी मध्ये सादर केले होते. कहानी एक मकान किरायेपर हैदराबादी आदाब चाचाजान, जनाब सुना है आपके यहा पर कमरा खाली है. मकान मालिक जी हां है. तुम्ही कोन? आप कौन? हैदराबादी चाचा मै हैदराबाद से हूं और यहां पर इंजीनीअरींग कॉलेज मे ऍडमीशन लिया हुं. ओर आपका मकान मेरे कॉलेज से करीब पडता है. मकान मालिक चांगलं आहे. अच्छा है. लेकीन.........

प्रतिबिंब

लेखक पद्मश्री चित्रे यांनी मंगळवार, 19/08/2008 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
तु खरी होतीस किंवा ते तुझे आभास होते वा तुझे प्रतिबिंब तेथे वाहत्या पाण्यात होते गेलो मी ज्या मागे असा वेड्यापरी रात्रंदिनी स्वप्न माझे नभ होवुनी पैलतीरी जात होते वेदनेचा गाव माझा मी तिथे ही पोरका सोबतीची भीक तेथे प्राण हे मागीत होते हासले हे जग मला नव्हतीस तु ही वेगळी हास्य होवोनी कट्यारी चांदणे कापीत होते पापण्यांच्या आड माझ्या सुर्य मी बन्दिस्त केला साद तरि ही मनातुन चन्द्र-तारे देत होते
Taxonomy upgrade extras

एक सुवर्णयोग !!!

लेखक वैशाली हसमनीस यांनी मंगळवार, 19/08/2008 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात थोडेफार तरी सुवर्णयोग येत असतात.... कधी कळत तर कधी नकळत. असे हे योग अपार समाधान देऊन जातात. माझ्याही आयुष्यात १७ ऑगस्टला असाच एक सुवर्णयोग अवतरला. प्रसंग होता आमच्या 'ए. आय. एम. एस. टी(एम्स्ट)'विद्यापीठाच्या औपचारिक उद्घाटनसमारंभाचा. उद्घाटन होणार होते मलेशियाचे पंतप्रधान दातो(माननीय)स्री अब्दुल हजी अहमद बडावी यांच्या शुभहस्ते! आम्हाला सकाळी साडेनऊलाच ग्रेट हॉलमध्ये बोलाविले होते.